Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/26 17:56:57.860300 GMT+0530
मुख्य / शेती / पिक उत्पादन वाढीचे तंत्रज्ञान / तृणधान्य / उशिराच्या बागायती गव्हाचे नियोजन
शेअर करा

T3 2019/06/26 17:56:57.869243 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/26 17:56:57.918158 GMT+0530

उशिराच्या बागायती गव्हाचे नियोजन

राज्यातील गव्हाची उत्पादकता देशातील गव्हाच्या उत्पादकतेच्या केवळ ५o टक्के एवढीच असते.

राज्यातील गव्हाची उत्पादकता देशातील गव्हाच्या उत्पादकतेच्या केवळ ५o टक्के एवढीच असते.

गव्हाच्या कमी उत्पादकतेची कारणे

  1. अनेक शेतक-यांकडून शिफारस नसतानाही गहू लागवडीसाठी हलक्या जमिनीचा वापर केला जातो. गव्हाच्या वाढीसाठी तसेच दाणे भरण्याच्या कालावधीत आवश्यक तापमान आणि थंडीचा पुरेसा कालावधी या पिकास उपलब्ध होत नाही.
  2. गव्ह्यासाठी विकसित केलेल्या सुधारित तंत्राचा वापर शेतक-यांकडून केला जात नाही. सुधारित तसेच जास्त उत्पादनक्षम गव्हाच्या चाणाचे बियाणे शैतक-यांना सहजासहजी उपलब्ध होत नाही.
  3. गन्ह्याच्या पिकाला आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी दिले जाते व योग्य खतांचा वापर केला जात नाही. वेगवेगळ्या कारणांमुळे राज्यातील शेतकरी शिफारशीपेक्षा उशिरा गव्हाची पेरणी करतात.

उशिरा बागायती गव्हाची पेरणी

ऊसतोडणीनंतर, कापसाचे पीक काढल्यानंतर किंवा सोयाबीन व खरिपातील इतर पिकांच्या काढणीस उशीर झाल्याने शेतक-यांना गव्ह्याची उशिरा पेरणी कराची लागते. बागायती उशिरा पेरणीची शिफारस १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरनंतरही गन्ह्याची पेरणी करतात. वास्तविक, १५ नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरावड्यात गव्हाची पेरणी केल्याने गव्हाचे हेक्टरी २.५ क्रॅिटल किंवा एकरी १ किंटल कमी उत्पादन मिळते.

गहूपिकाचे उत्पादन हे पिकास मिळणा-या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहूपिकाच्या वाढीसाठी ७° ते २१° से. तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी २५° से. इतके तापमान असल्यास दाण्याची वाढ चांगली होऊन दाण्याचे वजन वाढते. मात्र, उशिरा पेरणी केलेल्या गव्हास अनुकूल वातावरण मिळत नसल्याने उत्पादनात घट येते. खालीलप्रमाणे उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट काही प्रमाणात भरून काढता येते.

उत्पादनातील घट कमी करण्यासाठीचे उपाय 

  • गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी उपलब्धतेनुसार एनआयएडब्लू३४ किंवा एकेएडब्लू-४६२७ तसेच एनआयएडब्लू १९९४ (समाधान) या सरबती चाणांचा वापर करावा.
  • उशिरा पेरणीसाठी गव्ह्याच्या दोन ओळींत १८ सेंमी. अंतर ठेवून पेरणी ५ ते ६ सेंमी. खोल पाभरीने शक्यतो दक्षिणोत्तर करावी.
  • हेक्टरी रोपांची संख्या जास्त ठेवण्यासाठी विथाप्याचे हेक्टरी प्रमाण १२५ चे १५० केिली एवढे ठेवावे. पेरणी करताना हेक्टरी ४० कि. नत्र (८० कि. युरिया), ४० कि. स्फुरद (२४० केि. सिंगल सुपरफॉस्फेट) व ४० कि. पालाश (७५ कि. म्युरेट ऑफ पोटॅश) ही खते द्यावीत.
  • पेरणीनंतर १५ ते २o दिक्सांनी पहिल्या पाण्याच्या अगोदर प्रति हेक्टर ४० कि. नत्र (८० कि. युरिया) द्यावे
  • जमिनीत ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवामान राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने म्हणजे १५ दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्याचे. पीक क्षेत्रात तापमान कमी राहण्यासाठी तुषार सिंचनाचा वापर करावा. तुषारने शेवटचे पाणी पेरणीनंतर ८० ते ८५ दिक्सांदरम्यान द्यावे.
  • गहूपिकास तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यानंतर काही वेळा गव्ह्यच्या दाण्यावर काळा डाग पडण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दाणे भरताना तुषारवरील क्षेत्रात मॅन्कोझेब आणि काँपर ऑक्सिक्लोराईड प्रत्येकी २० मिलेि. १० लिटर पाण्यातून फवारावे.

 

स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन

 

2.82926829268
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/06/26 17:56:58.428419 GMT+0530

T24 2019/06/26 17:56:58.436576 GMT+0530
Back to top

T12019/06/26 17:56:57.748871 GMT+0530

T612019/06/26 17:56:57.771370 GMT+0530

T622019/06/26 17:56:57.844672 GMT+0530

T632019/06/26 17:56:57.846139 GMT+0530