Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/18 05:07:56.922984 GMT+0530
शेअर करा

T3 2019/10/18 05:07:56.929025 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/18 05:07:56.959867 GMT+0530

बोरॉन सहनशीलता वाढवणे

जंगली गहू जातीतील बोरॉन सहनशील जनुकांचा घेतला शोध गहू पिकातील बोरॉनच्या सहनशीलतेला नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे.

जंगली गहू जातीतील बोरॉन सहनशील जनुकांचा घेतला शोध

गहू पिकातील बोरॉनच्या सहनशीलतेला नियंत्रित करणाऱ्या जनुकांचा शोध घेण्यात ऑस्ट्रेलियामधील ऍडलेड विद्यापीठातील संशोधकांना यश आले आहे. हे संशोधन ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे. या संशोधनामुळे बोरॉनसाठी अधिक सहनशील जाती विकसित करण्यामध्ये पैदासकारांना मदत होणार आहे.

जागतिक पातळीवर जमिनीमध्ये बोरॉनचे प्रमाण वाढत असल्याने त्याचा परिणाम पिकांच्या उत्पादनावर होत आहे. या समस्येवर मात करण्यासाठी जगभर प्रयत्न केले जात आहेत. ॲडलेड विद्यापीठातील कृषी, अन्न आणि वाइन प्रशालेतील ऑस्ट्रेलियन सेंटर फॉर प्लॅंट फंक्शनल जिनोमिक्स येथील संशोधक डॉ. टीम सट्टॉन यांनी सांगितले, की ज्या मातीमध्ये बोरॉनचे अाधिक्य असते, त्या ठिकाणी पिकांच्या उत्पादनामध्ये घट येते. त्यावर केवळ जनुकीय सुधारणा हाच एक उपाय फायदेशीर ठरू शकतो. जगभरातील सुमारे ३५ टक्के लोकसंख्या ही गहू पिकावर अवलंबून आहे. दुष्काळ, क्षारता आणि मातीतील मूलद्रव्यांचे अाधिक्य ही उत्पादकता कमी होण्याची मुख्य कारणे आहेत. दक्षिण ऑस्ट्रेलियामध्ये धान्यांच्या शेतीखालील सुमारे ३० टक्के जमिनीमध्ये बोरॉनचे प्रमाण अधिक आहे. जिरायती धान्य उत्पादक पट्ट्यामध्ये जगभरामध्ये हीच समस्या सतावत आहे. गहू पिकाच्या संवेदनशील जातींची मुळे बोरॉन अधिक असलेल्या मातीमध्ये चांगल्या प्रकारे वाढू शकत नाहीत. केवळ काही बोरॉन सहनशील गहू जातींची मुळे बऱ्यापैकी वाढू शकतात. बोरॉनच्या अधिकतेशी जुळवून घेणारी काही जनुके आणि त्यातील बदल यांची ओळख पटविण्यात संशोधकांना यश आले आहे. या मूलद्रव्यीय मार्करची ओळख पटल्याने पैदास कार्यक्रमांमध्ये बोरॉन अधिकतेसाठी सहनशील जाती विकसित करणे १०० टक्के अचूक होणार आहे.

अडचणींवर केली जातेय मात 

डॉ. सट्टॉन म्हणाले, की गहू पिकाची जनुकीय साखळी प्रचंड मोठी (म्हणजेच मानवी जनुकीय साखळीच्या सहा पट मोठी) आहे. त्यामुळे जनुकांच्या पातळीवरील गुंतागुंतही अधिक आहे. उत्पादकता वाढ आणि पर्यावरणातील ताणांशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक जनुकांची ओळख पटविणे आव्हानात्मक ठरते. गेल्या काही वर्षांमध्ये मूलद्रव्यीय जीवशास्त्र आणि जनुक तंत्रज्ञानामध्ये आधुनिकता आली आहे. गहू पिकाची जनुकीय माहितीही जमा झालेली आहे. त्यामुळे या अडचणीतून मार्ग निघण्यास मदत होत आहे.

बोरॉन सहनशीलतेचा गुणधर्म मध्यपूर्वेतून ऑस्ट्रेलियात

  • प्राचीन काळी मध्यपूर्वेत शेतीमध्ये असलेल्या जंगली गव्हाच्या जातीतून संशोधकांनी बोरॉन सहनशील जनुक मिळवले आहे.
  • या जातीतील काही जाती शेकडो वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियात आल्या असून, त्याच आता व्यावसायिक रीतीने वाढवल्या जात आहेत.
  • विविध हवामान असलेल्या प्रदेशांतील मातीमध्ये बोरॉनचे प्रमाण कमी-अधिक आहे. त्यामुळे पिकांची सहनशीलतेची पातळीही कमी-अधिक आहे.
  • नव्या गहू जातींच्या पैदाशीवेळी अधिक अचूकता आणण्यासाठी ही माहिती अत्यंत उपयोगी पडणार असल्याचे डॉ. सट्टॉन यांनी सांगितले.

स्त्रोत:अग्रोवन

3.05714285714
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/18 05:07:57.185917 GMT+0530

T24 2019/10/18 05:07:57.193283 GMT+0530
Back to top

T12019/10/18 05:07:56.828094 GMT+0530

T612019/10/18 05:07:56.846404 GMT+0530

T622019/10/18 05:07:56.911294 GMT+0530

T632019/10/18 05:07:56.912361 GMT+0530