Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/05/20 10:21:52.323835 GMT+0530
मुख्य / शेती / मत्स्यव्यवसाय / मत्स्यव्यवसाय विभाग - विस्तार
शेअर करा

T3 2019/05/20 10:21:52.328888 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/05/20 10:21:52.358825 GMT+0530

मत्स्यव्यवसाय विभाग - विस्तार

या योजनेत मच्छिमार युवकांना गोडया पाण्यातील मत्स्यव्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे लघु प्रशिक्षण देण्यात येते.

अ) भूजल

या योजनेत मच्छिमार युवकांना गोडया पाण्यातील मत्स्यव्यवसायाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचे लघु प्रशिक्षण देण्यात येते. विशेष केंद्रिय अर्थसहाय्यांतून ठाणे, रायगड, यवतमाळ व गडचिरोली जिल्ह्यातील आदिम जमातितील मच्छिमारांना प्रशिक्षण देण्यात येते.
 • प्रशिक्षणाचे ठिकाण - शासकिय मत्स्यबीज केंद्र.
 • प्रशिक्षण कालावधी - १ महिना.
 • प्रशिक्षण सत्रे - २ (प्रमुख कार्प प्रजनन हंगाम व सायप्रिनस प्रजनन हंगाम).
 • प्रशिक्षणार्थी क्षमता - २० प्रतिसत्र.
 • विद्यावेतन - रू. ३००/- अधिक जाण्यायेण्याचा प्रवासखर्च.प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यावर प्रमाणपत्र देण्यात येते.

पात्रता

 • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
 • प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
 • प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा.
 • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.

ब) सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व सागरी इंजिन देखभाला व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम

यांत्रिकीकरणाद्वारे प्रगत मच्छिमारी तंत्राचा अवलंब करून मत्स्योत्पादन कसे वाढवावे याचे मच्छिमार युवकांना सर्वांगिण प्रशिक्षण देण्याचे उद्देशाने महाराष्ट शासनाने सातपाटी व वसई (ठाणे), वर्सोवा (मुंबई), आलिबाग (रायगड), रत्नागिरी (रत्नागिरी) व मालवण (सिंधुदूर्ग) येथे मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्रे स्थापन केली आहेत.
 • प्रशिक्षण कालावधी - ६ महिने.
 • प्रशिक्षण सत्रे - २ (१ जा नेवारी ते ३० जुन व १ जुलै ते ३१ डिसेंबर).
 • प्रशिक्षार्थी क्षमता - २२ प्रतिसत्र
 • दारिद्रय रेषेखालील प्रशिक्षार्थीस दरमहा रू. १००/- प्रशिक्षण शुल्क.
 • दारिद्रय रेषेवरील प्रशिक्षार्थीस दरमहा रू. ४५०/- प्रशिक्षण शुल्क.

पात्रता

 • प्रशिक्षणार्थी क्रियाशील मच्छिमार असावा.
 • प्रशिक्षणार्थीस मासेमारीचा किमान वर्षाचा अनुभव असावा.
 • प्रशिक्षणार्थी १८ ते ३५ वयोगटातील असावा.
 • प्रशिक्षणार्थीने शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थी किमान ४ थी पास असावा.
 • प्रशिक्षणार्थीस पोहता येणे आवश्यक.
 • प्रशिक्षणार्थीस मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस आवश्यक.

क) प्रशिक्षण शुल्क आकारून घेण्यात येणारे प्रशिक्षणक्रम.

कृषि व पदुम विभागाचा शासन निर्णय क्र. मत्स्यआ/२००२/प्र.क्र.१०/पदुम-१२, दि. ३०.३.२००२ नुसार ९ विविध लघुप्रशिक्षण विभागामार्फत राबविण्यात येतात.
प्रशिक्षण कालावधी दिवस शुल्क रू. प्रशिक्षार्थी क्षमता सत्रे
मरिन डिझेल इंजिन व त्याची देखभाल ३० ७५०/- २५
नौकानयन शास्त्र ३० १,०००/- २५
सार्वजनिक मत्स्यालय व्यवस्थापन १५ २,०००/- २०
मासेमारी नौकांवर संदेशवहन मत्स्यशोधन उपकरणांचा उपयोग ५००/- २५
गोडया पाण्यातील मिश्र मत्स्यशेती १० १,०००/- २०
गोडया पाण्यातील कोळंबी संवर्धन १० १,०००/- २०
प्रमुख कार्प मत्स्यबीज उत्पादन १५ १,०००/- २०
जिताडा व तिलापिया मत्स्य शेती १० १,०००/- २०
शोभिवंत मत्स्यालय व्यवस्थापन २५०/- १५

 

माहिती स्त्रोत : मत्स्यव्यवसाय विभाग

3.01369863014
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/05/20 10:21:52.617105 GMT+0530

T24 2019/05/20 10:21:52.624247 GMT+0530
Back to top

T12019/05/20 10:21:52.261123 GMT+0530

T612019/05/20 10:21:52.279926 GMT+0530

T622019/05/20 10:21:52.312944 GMT+0530

T632019/05/20 10:21:52.313770 GMT+0530