Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/06/16 17:47:47.782196 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना
शेअर करा

T3 2019/06/16 17:47:47.786760 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/06/16 17:47:47.811079 GMT+0530

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना

पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.

 

शेती हा व्यवसाय अधिक फायदेशीर व्हावा, शेतकऱ्यांची जोखीम कमी व्हावी तसेच आधुनिक कृषी तंत्राला प्रोत्साहन मिळण्यासाठी खात्रीपूर्वक व संरक्षित सिंचन व्यवस्था निर्माण करणे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेमध्ये सन 2015-16 पासून ‘प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना’ या समाविष्ट केली आहे. प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतास पाण्याची उपलब्धता करणे आणि पाण्याची कार्यक्षमता वाढवून पाण्याच्या प्रत्येक थेंबातून जास्तीत जास्त पीक उत्पादन मिळविणे (more crop per drop) हा या योजनेचा उद्देश आहे.

सन 2014-15 पर्यंत केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजना 80:20 (केंद्र 80 टक्के व राज्य 20 टक्के) या प्रमाणात राबविण्यात येत होती. केंद्र शासनाने केंद्र पुरस्कृत सूक्ष्म सिंचन योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र व राज्य हिश्श्याच्या अर्थसहाय्याचे प्रमाण 60:40 निश्चित केलेले आहे.

योजनेची व्याप्ती

राज्यातील सर्व 34 जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत सूक्ष्म सिंचन योजना राबविण्यात येत आहे.

योजनेची उद्दिष्ट्ये

  • आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुक्ष्म सिंचनाखालील क्षेत्रात वाढ करणे.
  • जलवापर कार्यक्षमतेत वाढ करणे.
  • कृषी उत्पादन आणि पर्यायाने शेतकऱ्यांच्या एकूण उत्पन्नात वृद्धी करणे.
  • समन्वयित पद्धतीने विविध योजनांची अंमलबजावणी करणे.
  • आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कृषि व फलोद्यानाचा विकास करण्यासाठी सूक्ष्म सिंचन पद्धती विकसित करणे, त्याची वृद्धी व प्रसार करणे.
  • कुशल व अर्धकुशल बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे.

योजनेत अंतर्भूत घटक

ठिबक सिंचन: इन लाईन, ऑन लाईन, सबसरफेस, मायक्रोजेट, फॅनजेटस.
तुषार सिंचन: मायक्रो स्प्रिंकलर, मिनी स्प्रिंकलर, पोर्टेबल स्प्रिंकलर व रेनगन.

अनुदान मर्यादा

  • अवर्षणप्रवण क्षेत्रातील अल्प व अत्यल्प भूधारक- 60 टक्के
  • अवर्षणप्रवण क्षेत्रातील सर्वसाधारण भूधारक- 45 टक्के
  • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील अल्प व अत्यल्प भूधारक-45 टक्के
  • अवर्षणप्रवण क्षेत्राबाहेरील सर्वसाधारण भूधारक-35 टक्के

लेखन - संकलन - गजानन पाटील

स्त्रोत : महान्युज

3.02564102564
नवनाथ किसनराव पाटील Sep 02, 2016 08:18 PM

ही योजना 100अनुदानावर आहे काय? 60:40 असा केंद्र व राज्य हिस्सा म्हणताय कळावे

गजबसिंग बमनावत मो.न.7588794003 Jul 19, 2016 03:09 PM

सन जुन २०१५ मधली अनुदान कधी मिळणार

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन
Related Languages

T5 2019/06/16 17:47:48.203351 GMT+0530

T24 2019/06/16 17:47:48.209546 GMT+0530
Back to top

T12019/06/16 17:47:47.678630 GMT+0530

T612019/06/16 17:47:47.700643 GMT+0530

T622019/06/16 17:47:47.771954 GMT+0530

T632019/06/16 17:47:47.772826 GMT+0530