Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 08:45:38.935793 GMT+0530
मुख्य / शेती / धोरणे व योजना / लस आणि लसीकरणाबाबत
शेअर करा

T3 2019/10/14 08:45:38.940705 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 08:45:38.972645 GMT+0530

लस आणि लसीकरणाबाबत

संक्रामक रोगांचा प्रसार लसीकरणाव्दारे रोखणे शक्य होते. सर्वसाधारणपणे रोग प्रादुर्भावाच्या ब-याच आधी लसीकरण करण्याची पध्दत आहे.


पार्श्वभुमी

श्री एडवर्ड जेन्नर यांनी प्रतिकार क्षमता शास्त्रामध्ये विज्ञानावर आधारीत पहिले प्रगतीचे पाऊल टाकल्याची बाब आपणास विदित आहे. पशुवैद्यकीय शास्त्राशी निगडीत असणारी या क्षेत्रातील पुढील वाटचाल श्री लुईस पाश्चर यांनी केलेली आहे. त्यांनी पाश्चुरेल्ला मल्टोसिडा, काळपुळीचा बॅसीलस इ. सुक्ष्म जीवांचा रोगकारक शक्ती विरहीत कुक्कुट आणि इतर जनावरांमधील प्रजाती निर्माण केल्या आहेत. त्यांनी विकसीत केलेली श्वान दंश लसीकरणाची पध्दत हे त्यांचे मानविय रोग उपचार पध्दती मधील महत्वाचे योगदान आहे. श्री सालमन आणि थियोबाल्ड स्मिथ यांनी मृत पावलेल्या रोग संक्रामक सुक्ष्म जीवांपासुन देखील लस निर्मिती करणे शक्य असल्याचे दाखवून दिले आहे. सुक्ष्म जीवांपासुन निर्माण होणा-या विषारी पदार्थां पासून संरक्षक प्रतिकारक क्षमता निर्माण करता येत असल्याचा शोध श्री रुक्स आणि येरसिन यांनी लावलेला आहे.

लसींचे प्रकार

लसी या मुख्यत्वे खालील नमुद प्रकारांमध्ये मुख्यत्वे विभागल्या जातात- जिवंत सुक्ष्म जीव असणा-या लसी, रोग संक्रमण क्षमता कमी करण्यात आलेल्या सुक्ष्म जीवांपासुन निर्मिती केलेल्या लसी, मृत सुक्ष्म जीवांपासुन तयार केलेल्या लसी, एकाच प्रकारचे सुक्ष्म जीव असणा-या लसी, अनेक प्रकारचे सुक्ष्म जीवांचे एकत्रिकरण केलेल्या लसी किंवा मिश्र प्रकारच्या लसी.

लसींचे उपयोग

संक्रामक रोगांचा प्रसार लसीकरणाव्दारे रोखणे शक्य होते. सर्वसाधारणपणे रोग प्रादुर्भावाच्या ब-याच आधी लसीकरण करण्याची पध्दत आहे.

पुनर्घटन

लसीचे पुनर्घटन करण्यासाठी वापरावयाचे द्रावण थंडगार असावे. लसीचे पुनर्घटन करण्यासाठी लसीबरोबर पुरवठा करण्यात आलेल्या द्रावणाचा वापर करावा. पुनर्घटीत लसीची साठवणूक सुर्यप्रकाश विरहीत ठिकाणावर बर्फावर करण्यात यावी. पुनर्घटीत लसीचा वापर लसीचे पुनर्घटन केल्यापासून दोन तासांच्या करण्यात यावा.

क्षेत्रीय स्तरावर लसीची साठवणूक आणि परिवहन

लसीची साठवणूक सुर्यप्रकाश विरहीत ठिकाणी शीत तापमानावर करण्यात यावी. द्रव स्वरुपातील लस साठवणूकी दरम्यान गोठल्यास लसीची क्षमता नष्ट होते, या कारणास्तव अशी लस गोठणार नाही याची काळजी घ्यावी. सर्व प्रकारच्या शीतशुष्कीत लसींची साठवणूक शीत पेटीमधील बर्फाच्या कप्यात करण्यात यावी. वाहतुकी दरम्यान विषाणू लसींची साठवणूक उष्णता नियंत्रक बाटली (थर्मास फ्लास्क) अथवा थर्माकाँलच्या डब्यामध्ये बर्फावर करण्यात यावी.द्रावणांची साठवणूक सुर्यप्रकाशविरहीत ठिकाणावर करण्यात यावी.

लसीकरण अपयशी होण्याची कारणमीमांसा

एकाच वेळी अनेक प्रकारची लसीकरण्यात येऊ नयेत. शक्यतो दोन लसीकरणांमध्ये काही आठवडयांचे अंतर ठेवण्यात यावे. गर्भधारणा झालेल्या जनावरांमध्ये लसीकरणाचा प्रतिरक्षित प्रतिसाद सामान्य असला तरी अशा जनावरांमध्ये गर्भपात न होण्याची काळजी घेण्यात यावी. अनुवांशिकतेमुळे देखील लसीकरणाद्वारे निर्माण होणा-या प्रतिकार क्षमतेच्या प्रतिसादात फरक पडू शकतो. लसीकरण करण्यात आलेल्या गटामधील काही जनावरांमध्ये रोग प्रतिकार क्षमतेची निर्मिती अत्यंत कमी अथवा निरंक असु शकते.जीवाणू लसी सोबत प्रतिजैविकांचा वापर करण्यात येवू नये.आईकडून पिल्लाला/बछडयाला प्राप्त होणा-या मातृक प्रतिपिंडामुळे प्रतिकार क्षमता निर्मितीचा प्रतिसाद कमी होतो. रोग प्रतिकार क्षमता निर्मितीला मारक ठरणा-या रोगांमुळे (गंबोरो इ.) देखील प्रतिकार क्षमता निर्मितीच्या प्रतिसादात अपयश येते. जनावरांच्या खाद्यात कधी कधी आढळुन येणा-या बुरशीजन्य जीवविषामुळे देखील या प्रतिसादास घट येते. उपरोक्त नमूद प्रतिसादाच्या निर्मितीमध्ये घट होण्यास आरोग्याची स्थिती, कृमी, खराब हवामान, लसमात्रा कमी प्रमाणात टोचणे इ. घटक कारणीभूत होतात.

 

स्त्रोत: पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

3.09090909091
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 08:45:39.772564 GMT+0530

T24 2019/10/14 08:45:39.779824 GMT+0530
Back to top

T12019/10/14 08:45:38.830423 GMT+0530

T612019/10/14 08:45:38.847395 GMT+0530

T622019/10/14 08:45:38.925199 GMT+0530

T632019/10/14 08:45:38.926017 GMT+0530