অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना

हवामानावर आधारित फळपिक विमा योजना

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शासनाने हवामानावर आधारित फळपिक योजना सुरु केली आहे. या अंतर्गत आंबा, काजू, केळी या फळ पिकांचा समावेश आहे. ही योजना कर्जदार शेतकऱ्‍यांसाठी सक्तीची असून बिगर कर्जदार शेतकऱ्‍यांना ऐच्छिक आहे.

कमी/ जास्त पाऊस, सापेक्ष आर्द्रता, वेगाचे व गारपीट यापासून आंबा, काजू व केळी या फळपिकांना निर्धारित कालावधी विमा संरक्षण व आर्थिक सहाय्य देणे. नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीत शेतकऱ्‍यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ही याची उद्दिष्टे आहेत. यासाठी एचडीएफसी - ॲर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी, सहावा मजला, लिला बिझीनेस पार्क, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी (पूर्व), मुंबई-400059. ही विमा कंपनी आहे. कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना सक्तीची व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक राहील.

विमा संरक्षण कालावधी पिक निहाय पुढीलप्रमाणे आहे. आंबा कालावधी- गारपीट - 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018, अवेळी पाऊस 1 जानेवारी 2018 ते 1 मे 2018 व 16 एप्रिल 2018 ते 15 मे 2018, कमी तापमान 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018, जास्त तापमान 15 मार्च 2018 ते 31 मे 2018.

काजू कालावधी - गारपीट 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018, अवेळी पाऊस 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018, कमी तापमान 1 डिसेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018.

केळी कालावधी - गारपीट 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018,कमी तापमान 1 नोव्हेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018, जास्त तापमान 1 मार्च 2018 ते 31 मे 2018, वेगाचे वारे 1 मार्च 2018 ते 31 जुलै 2018.

विमा हप्त्यापोटी योजनेत भाग घेणा-या सर्व शेतक-यांना 50 टक्के अनुदान देय राहील. प्रति हेक्टरी शेतकऱ्याने भरावयाची विमा हप्ता रक्कम पुढीलप्रमाणे आहे. आंबा 5 हजार 500 रुपये, (1 लाख 10 हजार), व गारपीट या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी भरावयाचा विमा हप्ता 1 हजार 835 रुपये (36 हजार 700), काजू 3 हजार 800 रुपये (76 हजार) , व गारपीट या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी भरावयाचा विमा हप्ता 1 हजार 265 रुपये (25 हजार 300) कंसातील आकडे संरक्षित रक्कम दर्शवितात, केळी पिकासाठी 6 हजार रुपये (1 लाख 20 हजार) व गारपीट या धोक्यापासून संरक्षण मिळण्यासाठी भरावयाचा विमा हप्ता 2 हजार रुपये (40 हजार) असा आहे.

विमा हप्ता भरण्याची अंतिम तारीख पुढीलप्रमाणे आहे. आंबा- बिगर कर्जदार 31 डिसेंबर 2017 - कर्जदार 31 डिसेंबर 2017 अशी राहील. विमा हप्ता नजीकच्या सहकारी बॅकेच्या, राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेमध्ये विहीत कालावधीत व वेळेत भरता येईल. विमा कालावधी संपल्यापासून 45 दिवसांत निवडलेल्या हवामान घटकांची आकडेवारी वेळेत मिळण्याच्या अटीचे अधिन राहून विमा कंपनी शेतकऱ्यांना बँकामार्फत परस्पर नुकसान भरपाई अदा करेल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत राज्यात पुर्नरचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजना 2017-18 साठी आंबा, काजू व केळी पिकासाठी अधिसूचित महसूल मंडळे व तालुके पुढीलप्रमाणे आहेत.

देवगड तालुक्यामध्ये - देवगड, पडेल, पाटगांव, मिठबांव, बापर्डे, शिरगांव - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 6 आहे. कुडाळ तालुक्यात - वालावल, कुडाळ, कडावल, कसाल, माणगांव, पिंगुळी - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 6 आहे. मालवण तालुका- आंबेरी, पेंडूर, पोईप, श्रावण, आचरे, मालवण, मसुरे - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 7 आहे. सावंतवाडी - आजगांव, सावंतवाडी, बांदा, मडुरा, आंबोली - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 5 आहे. वेंगुर्ला- वेंगुर्ला, शिरोडा, म्हापण, वेतोरे - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 4 आहे. कणकवली - कणकवली, फोंडा, नांदगाव, सांगवे, तळेरे, वागदे - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 6 आहे. दोडामार्ग- तळकट, भेडशी - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 2 आहे. वैभववाडी- वैभववाडी, एडगांव, भुईबावडा - मंडळ संख्या (आंबा व काजू पिकाकरिता) 3 आहे. केळी पिकाकरिता सावंतवाडी तालुक्यातील बांदा व मडुरा ही महसुल मंडळे व दोडामार्ग तालुक्यातील तळकट व भेडशी ही महसूल मंडळे निश्चित करण्यात आली आहेत.

विमा संरक्षण प्रकार व प्रतिहेक्टरी मिळणारी नुकसान भरपाई रक्कम पुढीलप्रमाणे आहे. विमा संरक्षण प्रकार अवेळी पाऊस झाल्यास कमाल देय 22 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई आंबा दैनंदिन पाऊस 5 मिली मीटर किंवा त्यापेक्षा जास्त (1 जानेवारी 2018 ते 15 एप्रिल 2018) 1 दिवस झाल्यास 9 हजार रुपये, सलग 2 दिवस झाल्यास 13 हजार 300 रुपये, सलग 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाल्यास 22 हजार रुपये राहील. अवेळी पाऊस झाल्यास कमाल देय 22 हजार रुपये (16 एप्रिल 2018 ते 15 मे 2018 ) कोणत्याही दिवशी दैनंदिन पाऊस 10 मिली मीटर पेक्षा जास्त झाल्यास 1 दिवस झाल्यास 8 हजार 900 रुपये राहील, सलग 2 दिवस झाल्यास 13 हजार रुपये, सलग 3 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त झाल्यास 22 हजार रुपये राहील. कमी तापमान झाल्यास कमाल देय 22 हजार रुपये (1 डिसेंबर 2017 ते 28 फेंबुवारी 2018) दैनंदिन किमान तापमान 13 डि. सें. किंवा त्यापेक्षा कमी कोणत्याही सलग 3 दिवस राहिल्यास 3 हजार 900 रुपये, सलग 4 दिवस राहिल्यास 7 हजार 800 रुपये, सलग 5 दिवस राहिल्यास 11 हजार 100 रुपये राहील, सलग 6 दिवस राहिल्यास 15 हजार रुपये, सलग 7 दिवस राहिल्यास 22 हजार रुपये राहील. जास्त तापमान झाल्यास कमाल देय 44 हजार रुपये (15 मार्च 2018 ते 31 मे 2018) दैनंदिन कमाल तापमान 37.5 डि. सें. किंवा त्यापेक्षा जास्त कोणत्याही सलग 2 दिवस राहिल्यास 11 हजार 100 रुपये, सलग 3 दिवस राहिल्यास 22 हजार 200 रुपये, सलग 4 दिवस राहिल्यास 33 हजार 300 रुपये, सलग 5 दिवस राहिल्यास 44 हजार रुपये. गारपीट झाल्यास कमाल देय 36 हजार 700 रुपये (1 जानेवारी 2018 त 30 एप्रिल 2018) या कालावधीत गारपीट झाल्यास 36 हजार 700 रुपये राहतील. आंबा विमा संरक्षण प्रकारासाठी एकूण विमा संरक्षित रक्कम (प्रति हेक्टर) 1 लाख 46 हजार 700 रुपये राहील.

विमा संरक्षण प्रकार अवेळी पाऊस झाल्यास कमाल देय 50 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई काजू- कोणत्याही दिवशी 5 मिली मीटर किंवा त्यापेक्षा जास्त मिली मीटर पाऊस झाल्यास (1 डिसेंबर 2017 ते 28फेबुवारी 2018) 1 दिवस झाल्यास 10 हजार रुपये, सलग 2 दिवस झाल्यास 20 हजार रुपये, सलग 3 दिवस झाल्यास 35 हजार रुपये, सलग 4 दिवस झाल्यास 50 हजार रुपये राहील. कमी तापमान झाल्यास कमाल देय 26 हजार रुपये (1 डिसेबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018) दैनंदिन किमान 13 डि. सें. तापमान किंवा त्यापेक्षा कमी कोणत्याही सलग 3 दिवस राहिल्यास 10 हजार 400 रुपये, सलग 4 दिवस राहिल्यास 15 हजार 600 रुपये, सलग 5 दिवस राहिल्यास 26 हजार रुपये राहील, गारपीट झाल्यास कमाल देय 25 हजार 300 रुपये ( 1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018) या कालावधीत गारपीट झाल्यास 25 हजार 300 रुपये. काजू विमा संरक्षण प्रकारासाठी एकूण विमा संरक्षित (प्रति हेक्टरी) 1 लाख 1 हजार 300 रुपये राहील.

विमा संरक्षण प्रकार कमी तापमान झाल्यास कमाल देय 30 हजार रुपये प्रति हेक्टरी नुकसान भरपाई केळी (1 नोव्हेंबर 2017 ते 28 फेब्रुवारी 2018) सलग 3 दिवस किमान तापमान 8 डि.सें. किंवा त्यापेक्षा कमी राहिल्यास रुपये 30 हजार रुपये. जास्त तापमान झाल्यास कमाल देय 30 हजार रुपये ( 1 मार्च 2018 ते 31 मार्च 2018 व 1 एप्रिल 2018 ते 31 मे 2018 ) मार्च महिन्यात सलग 3 दिवस 40.5 डि. से. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान व एप्रिल, मे महिन्यात सलग 3 दिवस 44 डि. सें. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान गेल्यास 12 हजार रुपये राहील. मार्च महिन्यात सलग 4 दिवस 40.5 डि. से. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान व एप्रिल, मे महिन्यात सलग 4 दिवस 44 डि. सें. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान गेल्यास 18 हजार रुपये राहील. मार्च महिन्यात सलग 5 दिवस 40.5 डि. से. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान व एप्रिल, मे महिन्यात सलग 5 दिवस 44 डि. सें. किंवा त्यापेक्षा जास्त तापमान गेल्यास 30 हजार रुपये राहील. वेगाचा वारा वाहून नुकसान झाल्यास कमाल देय 60 हजार रुपये (1 मार्च 2018 ते 31 जूलै 2018) 40 कि.मी. प्रति तास अथवा त्यापेक्षा जास्त वेगाने वारे वाहील्यास व त्याची नोंद संदर्भ हवामान केंद्रावर झाल्यास विमा धारकांनी नुकसान झाल्यापासून 48 तासांत माहिती कृषि विभाग/ विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे. संबंधित विमा कंपनी, महसूल, जिल्हा परिषद, कृषि विभागाच्या मदतीने वैयक्तिक पातळीवर नुकसानीचे प्रमाण निश्चित करेल. फक्त तापमान हवामान केंद्रावरील नोंद ही नुकसान भरपाईसाठी पात्र होणार नाही. गारपीट (1 जानेवारी 2018 ते 30 एप्रिल 2018) याकालावधीत गारपीट झाल्यास 40 हजार रुपये राहील. केळी विमा संरक्षण प्रकारासाठी एकूण विमा संरक्षित (प्रति हेक्टरी) 1 लाख 60 हजार रुपये. अधिक माहितीसाठी संबधित तालुक्याच्या पंचायत समिती कार्यालयाशी किंवा तालुका कृषि अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.

-स्वप्नाली कुंभार

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate