इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र हे देशातील सर्वात वेगवान उदयोन्मुख क्षेत्र तयार होत आहे. त्यामुळे या क्षेत्रात खूप रोजगाराच्या संधी आहेत. माननीय पंतप्रधान यांनी डिजिटल भारत कार्यक्रम सुरु केला, या कार्यक्रमांतर्गत भारत सरकारच्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागांने या योजनेंतर्गत देशातील सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेश कव्हर करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक प्रणाली डिझाईन आणि निर्मिती (ESDM) क्षेत्रात कौशल्य विकास योजना दिनांक ९-१२-२०१४ ला मंजूर केली.
या कार्यक्रमांतर्गत कौशल्य विकासासाठी सर्व सामान्य वर्गातील नागरिकांना ७५% आणि अनुसूचित जाती व जमाती तसेह इडब्ल्यूएस श्रेणी तील नागरिकांना १००% सरकारकडून सहाय्य प्राप्त होइल. मागासवर्गीयांसाठी यामध्ये ४०% जागा राखीव आहेत.
पुढील 4 वर्षात भारत सरकारने ३,६०,००० तरुणांना (महिला व पुरुष) कौशल्यपूर्ण करण्याची योजना तयार केली आहे. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशभरात कौशल्य विकास केंद्रे स्थापन करण्यात आलेली आहे.
संदर्भ : इएसडीएम (ESDM), माहिती आणि तंत्रज्ञान विभाग, भारत सरकार
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात उतारवयाती...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात कर्करोग म...
दर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात आरोग्य सेवे...
दुरदर्शन सह्याद्री निर्मित या माहितीपटात मानसिक आघ...