Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/10/14 06:30:41.678319 GMT+0530
मुख्य / ई-शासन / डिजिटल पेमेंट (डिजिटल देयके ) / डिजिटल फायनानसियल सर्व्हिसेस
शेअर करा

T3 2019/10/14 06:30:41.683138 GMT+0530
Views
 • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/10/14 06:30:41.711747 GMT+0530

डिजिटल फायनानसियल सर्व्हिसेस

डिजिटल वित्तीय समायोजन म्हणजे समाजातील वंचित घटकापर्यंत डिजिटल तसेच औपचारिक वित्तीय सेवांचा वापर करता येण्याची सोय करणे आहे.

 

डिजिटल वित्तीय समायोजन म्हणजे समाजातील वंचित घटकापर्यंत औपचारिक वित्तीय सेवांचा डिजिटली वापर करता येण्याची सोय करणे आहे.  हा हेतू साध्य करण्याकरिता पुरविण्यात येत असलेल्या नवीन सेवांना डिजिटल वित्तीय सेवा (Digital Financial Services - DFS) असे संबोधण्यात आले आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार आणि गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने या सेवांची रचना करण्यात आली आहे. ग्राहकांना परवडणाऱ्या आणि पुरवठादारांनाही शाश्वत ठऱणाऱ्या अशा किमतीत त्या जबाबदारीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अशा प्रकारे असलेल्या कोणत्याही डिजिटल वित्तसेवांचे तीन प्रमुख घटक आहेत : डिजिटल विनिमय व्यासपीठ, किरकोळ एजेंट्स आणि ग्राहक तसेच एजेंट्स कडून वापरण्यात येणारे उपकरण, सामान्यपणे मोबाइल फोन चा वापर मंचामार्फत व्यवहारासाठी केला जातो

बँक व्यवहारापासून वंचित समाज घटकालाही ज्या साधनामुळे डिजिटल मार्गाच्या मदतीने आर्थिक सेवा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होऊन लागल्या आहेत असे हे एक माध्यम आहे,    डिजिटल मार्गांनी त्यांना हे व्यवहार शक्य होत आहेत. बँका, मायक्रोफायनान्स संस्था, मोबाइल ऑपरेटर्स आणि तृतीयपक्ष पुरवठादार हे मोबाइल फोन, पॉइंट ऑफ सेल डिव्हाइसेस  इत्यादींच्या वापरास सहकार्य करत आहेत, त्याचप्रमाणे ते छोट्या पातळीवरील एजेंटसना मुलभूत आर्थिक सेवा अधिक सोयस्कर रीतीने परंपरागत बँकिग पेक्षा कमी खर्चात उपलब्ध करून देत आहेत.

डिजिटल फायनानसियल सर्व्हिसेस खालील प्रमाणे आहेत :

 1. कार्डस
 2. यूएसएसडी (USSD)
 3. एईपीएस (AEPS)
 4. यूपीआय (UPI)
 5. वॉलेट

कार्ड्स

कार्डस काय असतात?

कार्डस हे सहसा बँकांकडून जारी केली जातात. त्यांच्या जारी करण्याच्या प्रकारानुसार, वापरानुसार आणि कार्डधारकाने चुकवलेल्या किमतीनुसार त्यांचे वर्गीकरण केले जाते.  डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रिपेड कार्ड असे तीन प्रकार आहेत.

कार्डांचे विविध प्रकार कोणते?

 1. प्रिपेड कार्डे : ग्राहकाच्या बँक खात्यामधून आधी रक्कम वसूल करून ही कार्डे अदा केली जातात. मर्यादित रकमेच्या व्यवहारासाठी ती वापरता येतात. मोबाइल रिचार्जप्रमाणे हे कार्ड रिचार्ज केले जाऊ शकते. या कार्डांचा वापर सुरक्षित असतो.
 2. डेबिट कार्डे : ज्या बँकेत तुमचे खाते आहे, त्या बँकेकडून हे कार्ड जारी केले जाते. हे कार्ड्स बँक खात्याशी जोडलेले असते. चालू/ बचत/ ओव्हरड्राफ्ट खातेधारकांना डेबिटकार्डे दिली जातात व ज्या वेळी खातेधारक या कार्डाच्या वापराने कोणताही खर्च करतो त्या वेळी तत्काळ त्याच्या खात्यावरून संबंधित रक्कम वजा होते. खात्यावर जेवढी रक्कम जमा आहे तेवढ्या रकमेचा खर्च खातेधारक या कार्डाद्वारे करू शकतो. या कार्डाचा वापर करून एका खात्यावरून दुसऱ्या खात्यावर  देशांतर्गत निधी हस्तांतरण करण्यासाठी येऊ शकतो
 3. क्रेडिट कार्डे : बँका / भारतीय रिझर्व बँकेने मान्य केलेल्या संस्थेकडून ही कार्डे जारी केली जातात. देशांतर्गत तसेच आंतराराष्ट्रीय व्यवहारांतही (कार्ड घेताना जर आंतरराष्ट्रीय वापराचा पर्याय निवडला असेल तर) ही कार्डे वापरता येतात. डेबिड कार्डात जशी खर्च करताना खात्यावरील रकमेची मर्यादा असते, तशी ती क्रेडिट कार्डात नसते. ग्राहक आपल्या बँक खात्यावरील जमा रकमेहून अधिक खर्चही करू शकतो. मात्र हा अतिरिक्त खर्च किती असावा हे त्या त्या कर्डाबाबत निश्चित केले जात असते.

अतिरिक्त खर्च केलेल्या पैशांचा परतावा किती काळात दिला पाहिजे यासंबंधीही मर्यादा घालून दिलेल्या असतात. जर हा काळ मर्यादेपेक्षा लांबला तर पैशांची ही रक्कम त्या बँकेस व्याजाच्या आकारासह परत करायची असते. कार्ड जारी करतानाच याबाबतचा नियम निश्चित करण्यात आलेला असतो.

डेबिट/ क्रेडिट कार्ड कसे वापरावे?

 1. एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डधारकाला आपले क्रेडिट/ डेबिट कार्ड दिलेल्या खाचेमध्ये सरकवून ४ आकडी पिन नंबर टाइप करायचा असतो. बँकेने हा पिन नंबर प्रत्येकास स्वतंत्र आणि एकमेव असा दिलेला असतो. एका दिवसाला एका खात्यावरून जास्तीत जास्त किती रक्कम काढली जावी, हे त्या त्या बँकेने निश्चित केलेले असते.
 2. डेबिट कार्ड वापरून एटीएममधून अन्य आर्थिक तसेच बिगर आर्थिक व्यवहारही करता येतात. उदा. आपल्या बँक खात्यावरील शिल्लक रक्कम तपासणे, चेक किंवा रोख भरणा करणे, नजिकच्या काळात खात्यावरून केलेल्या आर्थिक व्यवहारांचा तपशील (मिनी स्टेटमेंट) मागवणे इ. व्यवहार प्रत्यक्ष बँक शाखेत न जाता करता येतात.
 3. महत्वाच्या रिटेल दुकानांमध्ये खरेदी करताना खालील कृती करा

या कार्डांचा वापर का केला पाहिजे ?

 • किरकोळ कोठेही खरेदी करताना तुमचे कार्ड वापरा.
 • या कार्डावरून दुकानांत पैसे देण्यासाठी, एटीएममध्ये, वॉलेटमध्ये, मायक्रो एटीएममध्ये तसेच ऑनलाइन खरेदीच्या व्यवहारांसाठी वापरता येते.
 • क्रेडिट तसेच डेबिट कार्ड हे एटीएममधून पैसै काढण्यासाठी, वस्तू व सेवा खरेदीसाठी – त्या खरेदीच्या ठिकाणी तसेच ऑनलाइन खरेदीसाठी वापरता येते.
 • दुकानांत  सर्व प्रकारची बिले भरण्यासाठी कार्ड वापरता येते.
 • विमानाचे, रेल्वेचे किंवा बसच्या प्रवासाचे तिकिट कार्डाचा वापर करून आरक्षित करता येते. शिवाय हॉटेलमधील खोली घेण्यासाठी, उपाहारगृहांमधला खर्च भागविण्यासाठीही ही कार्डे उपयुक्त ठरतात.
 • कार्ड रीडर किंवा पीओएस मशीन असेल त्या ठिकामी कोणत्याही सेवेचा मोबदला चुकता करण्यासाठी तुमचे कार्ड वापरा.

कार्ड कसे प्राप्त करावे?

सर्व सरकारी आणि खाजगी बँकांकडे डेबिट/रूपे/ क्रेडिट कार्डासाठी ग्राहक अर्ज करू शकतात..

 • नागरिकांना आपले खाते ज्या बँकेत आहे, त्या बँकेकडे अर्ज करून डेबिट कार्ड मिळवता येते.
 • नागरिक आपले डेबिट कार्ड, रूपे कार्ड मध्ये सुधा बदलवू शकते
 • ज्या नागरिकांचे बँकेमध्ये खाते नाही, अशांना कार्ड मिळवण्यासाठी आधी बँकेत खाते उघडणे आवश्यक ठरते.
 • सरकारी आदेशानुसार, सर्व जन धन खातेधारकांना रूपे कार्ड जारी करण्यात आली पाहिजेत.

USSD यूएसएसडी (अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा)

USSD (यूएसएसडी) म्हणजे काय ?

यूएसएसडी हा ‘अनस्ट्रक्चर्ड सप्लिमेंटरी सर्विस डेटा’ चा संक्षेप आहे. देशातील प्रत्येक सामान्य माणसापर्यंत बँकिंग सेवा नेण्याचे उद्दिष्ट या सेवेने ठेवले आहे. या सेवेमुळे प्रत्येक ग्राहकाला बँकिंग सेवेचा वापर एका नंबरद्वारे करता येतो, जो नंबर मोबाइल हँडसेट वा प्रदेशावरून ठरवला जातो व तो टेलिकॉम सेवा पुरवठादारांकडून मिळणाऱ्या नंबरपेक्षा वेगळा असतो. हा क्रमांक राष्ट्रीय एकात्मिक यूएसएसडी मंचाद्वारे (नॅशनल यूनिफाइड यूएसएसडी प्लॅटफॉर्म- एनयूयूपी) *99# या शॉर्ट कोडवर दिला जातो. एका ग्राहकाला एका दिवसाला रु. पाच हजारपर्यंतची रक्कम चुकती करण्यासाठी हा नंबर वापरता येतो.

यासाठी आपल्यापाशी काय हवे?

 • एखाद्या बँकेमध्ये खाते
 • जीएसम नेटवर्कवरचा कोणताही मोबाइल फोन
 • बँकेकडे ग्राहकांनी आपल्या मोबाईल नंबरची नोदणी केलेली असणे आवश्यक आहे

याचा वापर कसा करावा?

 1. बँक शाखेमध्ये जाऊन बँक खात्याच्या माहितीत आपला मोबाइलचा नंबर नोंदवावा. (एटीएममधून किंवा ऑनलाइनही हे करता येते.)
 2. तुम्हाला मोबाइल मनी आयडेंटीफायर (एमएमआयडी) व मोबाइल पिन (एमपिन) मिळेल.
 3. तुमचा एमपिन लक्षात ठेवा.

यूएसएसडीचे फायदे कोणते?

यूएसएसडी सुविधा वापरण्याचे टप्पे

आपल्या फोनमधला प्रिपेड बॅलन्स तपासण्याइतके हे सोपे आहे! साध्या मोबाइलमधून हा व्यवहार शक्य आहे.

 • आपला मोबाईल नंबर आपल्या बँक खात्याशी लिंक करा
 • मोबाइलवर *99# दाबा.
 • आपल्या बँकेच्या नावाची पहिली तीन अक्षरे किंवा आयएफएससी (IFSC) ची पहिली चार अक्षरे टाइप करा.
 • यानंतर “निधी स्थानांतर - Fund-Transfer-MMID” हा पर्याय निवडा .
 • रक्कम अदाकर्त्याचा मोबाइल क्रमांक आणि एमएमआयडी नमूद करा.
 • रक्कम तसेच तुमचा एमपिन नमूद करून स्पेस द्या  व खाते क्रमांकाचे शेवटचे चार अंक नमूद करा.

वर सांगितल्याप्रमाणे दिलेल्या पायऱ्यांनुसार व्यवहार केल्यास तुमचे पैसे संबंधितास पोहोचतील.

उपलब्ध सेवा

बिगर आर्थिक सेवा

 • शिल्लक तपासणे - मोबाइल क्रमांकाशी जोडलेल्या बंक खात्यावरील शिल्लक रक्कम धारकाला तपासता येते.
 • मिनी स्टेटमेंट  - मोबाइलशी जोडण्यात आलेल्या बँक खात्यावरच्या व्यवहारांचे मिनी स्टेटमेंड धारकाला मिळवता येते.
 • एमएमआयडी जाणणे *(मोबाइल मनी आयडेंटीफायर) - मोबाइल बँकिगची नोंदणी करताना बँकेकडून जो एमएमआयडी पुरवण्यात आला आहे तो धारकाला जाणून घेता येतो.
 • एम-पिन तयार करणे/बदलणे - धारक आपल एम –पिन (मोबाइल पिन) तयार करू किंवा बदलू शकतो. हा पासवर्डसारखाच असतो आणि आर्थिक व्यवहारांच्या अधिकृतीकरणासाठी उपयोगी असतो.

आर्थिक सेवा

 • एमएमआयडी वापरून निधी हस्तांतर - लाभार्थीचा मोबाइल क्रमांक आणि एमएमआयडी वापरून धारकाला निधी हस्तांतर करता येते.
 • आयएफएससी आणि खाते क्रमांक वापरून निधी हस्तांतर – आयएफएस कोड व खाते क्रमांक देऊन ग्राहक लाभार्थीच्या खात्यावर निधी हस्तांतरीत करू शकतो.

अधिक माहितीसाठी आपल्या बँकेच्या संकेतस्थळाला भेट द्या

AEPS एईपीएस (आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम)

एईपीएस म्हणजे काय?

एईपीएस म्हणजे ‘आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम’.  बँकिंग व्यवहार करण्याच्या या सेवेत बँक ग्राहकाला आधार क्रमांक (कार्ड) ओळखपत्र म्हणून दाखवण्याची सुविधा असून हे आधार एनेबल्ड बँक खात्यामध्ये प्राथमिक बँकिंग व्यवहार करू शकते. एका बँकेतून दुसऱ्या बँकेत व्यवहारही याने शक्य होतो. पॉइंट ऑफ स्रविस (मायक्रो एटीएम) मध्ये बँक प्रतिनिधीद्वारे तो करता येतो. बँकेच्या शाखेत जाऊन किंवा या प्रतिनिधीच्या सहकार्याने आपल्या खात्याशी आधार क्रमांक जोडून घ्यावा. पिन व पासवर्डशिवाय ग्राहकाला कोणत्याही एईपीएस पॉइंटवर व्यवहार करता येतो.

एईपीएस सुरू करण्यासाठी काय करावे ?

व्यवहार एईपीएस करण्यासाठी केवळ तीन गोष्टी आवश्यक आहेत

 • ग्राहक ज्या बँकेतून व्यवहार करतो ती बँक निश्चित करणे
 • आधार क्रमांक
 • दाखल करण्याच्या वेळी घेतलेले बोटांचे ठसे

याचा वापर का केला पाहिजे ?

एईपीएसद्वारे व्यवहार करताना पुढील पद्धतीचे बँकिंग करता येते

 • खात्यावरील शिल्लक तपासणे
 • रोख रक्कम खात्यावरून काढणे
 • रोख रक्कम खात्यावर जमा करणे
 • आधार ते आधार निधी स्थानांतर
 • एईपीएसने रेशन दुकानात खरेदी

एईपीएस व्यवहाराकरिता महत्त्वाच्या पायऱ्या


याचा वापर का करावा ?

 • हा वापरण्यास सोपा व सुरक्षित असा पैसे अदा करण्याचा पर्याय आहे. आधार चा वापर करून मिळणाऱ्या लाभांपैकी एक असून आधार क्रमांक व बोटांचे ठसे देऊन तो मिळवता येतो.
 • येथे आपल्या नावावर दुसऱ्याकडून भ्रष्ट व्यवहार होण्याचा धोका नाही कारण व्यक्तीचे लोकसंख्याविषयक ओळखपत्र तसेच बायोमेट्रिक वा बुबुळांची माहिती या ठिकाणी नोंदवलेली असते.
 • नरेगासारख्या सरकारी योजनांतील पैशांचे वितरण, कोणत्याही केंद्र वा राज्य सरकारी संस्थेतून सामाजिक सुरक्षावेतन, अपंगांचे वृधत्ववेतन हेही या सुविधेतून घेता येते.
 • बँकेच्या अंतर्गत व्यवहारांसाठी सुरक्षित पर्याय याद्वारे मिळतो.
 • आतापर्यंत ज्यांनी बँकिंग व्यवहार केलेले नाहीत अशांपर्यंत पोहोचून त्यांना आपले ग्राहक बनवणे याद्वारे बँकानाही शक्य होते. बँक प्रतिनिधी हे खासकरून बँकेत खाते नसलेल्या व्यक्तींचे व्यवहार करत असल्यामुळे बँकेची शाखा नसलेल्या प्रदेशातही बँक आपला विस्तार नेऊ शकते.
 • सध्या कोणतेही व्यवहार आकार लावण्यात आलेले नाहीत.
 • बँक खाते क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज नाही.
 • बायोमेट्रिक उपकरण असलेल्या खरेदीदारांना घरबसल्या व्यवहार करणे शक्य असून संगणक, अँड्रॉइड फोन वा टॅबलेट वापरून तो करता येतो. काही टॅबलेमध्ये बायोमेट्रिक उपकरण असते, तेही या व्यवहारांसाठी उपयुक्त आहेत.

UPI यूपीआय (यूनीफाइड पेमेंट्स इंटरफेस)

यूपीआय म्हणजे काय?

यूपीआय हा ‘यूनीफाइड पेमेंट इंटफेस’चा संक्षेप आहे. उपभोक्त्याच्या स्मार्टफोनमधून पैसे अदा करण्यासारख्या सुविधा साध्य करणारी ही व्यवस्था आहे. बँकेतील खात्यांवरील रकमा ज्या व्यवस्थेद्वारे अन्य खात्यांवर वळवल्या जायच्या त्या इमिजिएट पेमेंट सर्विसचे (IMPS) ते अधिक विकसित रूप आहे. आयएमपीएस प्रमाणेच यूपीआयचा उपयोग दिवसाच्या कोणत्याही वेळी निधी हस्तांतरित करता येतो.

 • या सुविधेमध्ये डेबिट कार्डाप्रमाणे उपभोक्त्याची ओळख अधिकृत केली जाते. येथे त्याकरिता कार्डाऐवजी फोनचा वापर होतो.
 • ही सुविधा वर्षाचे ३६५ दिवस, चोवीस तास वापरता येते.

यासाठी काय पाहिजे ?

 • यूपीआय अॅप्लिकेशन (अॅप) असलेला स्मार्टफोन
 • बँकेमध्ये खाते

याचे काम कसे चालते ?

याची वैशिष्ट्ये आणि लाभ कोणते?

 • वापरकर्त्याचे नाव, बँक खाते क्रमांक, आयएफएससी किंवा बँकेची शाखा नमूद करण्याची गरज यूपीआय व्यवस्थेमुळे राहात नाही.
 • डेबिट कार्डासारख्या उपकरण वस्तू जवळ बाळगण्याची गरज यूपीआयमुळे उरत नाही.
 • नेट बँकिंगसारख्या, लबाडीस काही प्रमाणात वाव देणाऱ्या, अनेक पायऱ्यांची प्रक्रिया असलेल्या सुविधेसही फाटा देता येतो.
 • कोणालाही सहज वापरता येईल असे हे सोपे अॅप्लिकेशन आहे.
 • केव्हाही, कोठेही वापरता येणारी, लगेच हाताशी येणारी ही व्यवस्था असून अधिकृतीकरण सुरक्षित आहे.
 • संपूर्णत: रोख रकमेशिवायचे व्यवहार करणाऱ्या डिजिटल समाजाच्या दिशेने जाणारी वाट या व्यवस्थेमध्ये  आहे.
 • पैशांची मागणी करणारी कागदपत्रे, उदा. कामाच्या मोबदल्याची बिले या व्यवस्थेतून पाठवता येतात.
 • यूपीआयचा वापर ऑनलाइन पैसे अदा करण्यासाठी, बिले भरण्यासाठी व मुलांचे शालेय शुल्क भरण्यासाठी करता येतो.

ई-वॉलेट

ई-वॉलेट म्हणजे काय ?

ई-वॉलेट म्हणजे इलेक्ट्रॉनिक वॉलेट. इलेक्ट्रॉनिक कार्डाचा तो एक प्रकार असून संगणक किंवा स्मार्टफोनने ऑनलाइन व्यवहार करण्यासाठी ते वापरले जाते. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डासारखीच ई-वॉलेटचीही उपयोगिता आहे. ई-वॉलेट बँक खातेधारकाच्या खात्याशी जोडावे लागते आणि त्यानंतर खात्यावरून पैसे चुकते करता येतात. ई-वॉलेटचा प्रमुख हेतू हा कागदाशिवाय पैशांचे व्यवहार सोपा करणे हा आहे.

ई-वॉलेटचे घटक


याचे कार्य कसे चालते ?

सॉफ्टवेअर आणि माहिती हे ई-वॉलेटचे महत्त्वाचे दोन घटक आहेत.

सॉफ्टवेअर हा घटक व्यक्तिगत माहिती साठवून ठेवतो आणि संकलित माहिती सुरक्षित राखतो. तर माहिती हा घटक वापर करणाऱ्याने पुरवलेल्या तपशिलांचा एक डाटाबेस असतो   उदा. नाव, पत्रव्यवहाराचा पत्ता, पैसे अदा करण्याची पद्धत, रक्कम, क्रेडिट/डेबिट कार्डाचा सविस्तर तपशील आदी.

ई-वॉलेट कसे वापरावे?

ग्राहकांसाठी

 • आपल्या मोबाइल उपकरणावर अॅप एन्क्रिप्शन डाऊनलोड करा.
 • योग्य माहिती भरून साइनअप करा. वापरकर्त्याला पासवर्ड मिळेल.
 • क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून किंवा नेटबँकिंगने पैसे टाका.
 • ऑनलाइन खरेदी केली तर ई-वॉलेट खरेदीदाराची माहिती पैसे अदा करण्यासंबंधीच्या तपशिलात आपोआप सादर करते.
 • ऑनलाइन पैसे दिले की ऑर्डर फॉर्म भरण्याची गरज नाही. अन्य वेबसाइटलाही माहिती पुन्हा देण्याची गरज राहात नाही कारण ती एकदा पुरवल्यावर साठवलेली राहाते तसेच नव्याने केलेल्या दुरुस्त्याही आपोआप नोंदवल्या जात राहातात.

व्यापाऱ्यांसाठी

 • व्यापारी आपल्या उपकरणावर  अॅप डाऊनलोड करतात.
 • संबंधित माहिती भरून साइन-अप करतात. उपभोक्त्यास पासवर्ड मिळतो.
 • आपण व्यापारी असल्याचे स्वत:ला घोषित करावे लागते.
 • ग्राहकांकडून आलेले पैसे स्वीकारण्यास सुरुवात करा.

ई-वॉलेट सुरू करण्यासाठी काय आवश्यक आहे ?

 1. बँकेत खाते
 2. स्मार्ट फोन
 3. 2G/3G/4G कनेक्शन
 4. मोफत वॉलेट अॅप

डिजिटल आर्थिक सेवांचा वापर करताना अवश्य करायलाच हवे असे काही 

 • खाते असलेल्या बँकेमध्ये आपला मोबाइल क्रमांक नोंदवा. त्यामुळे आपला प्रत्येक व्यवहार होताना बँक एसएमएसद्वारे आपल्याला त्याची सूचना देऊ शकेल.
 • आपला पिन (PIN) दुसऱ्या कोणालाही सांगू नका
 • विश्वसनीय अशा संस्थांशीच व्यवहार करा
 • एटीएममध्ये असताना आपल्या खांद्यावरून कोणी आपला व्यवहार पाहात नाही ना, याची खात्री करा.

 

स्त्रोत : पोर्टल कन्टेन्ट टीम

3.17948717949
सुशील संजय कसाब Oct 04, 2017 08:08 PM

अतिशय छान लेख, संपूर्ण माहिती!
काही काही ठिकाणी आपण जर मराठी संज्ञा इंग्रजी मधूनही लिहिल्या असत्या तर मला आवडले असते, बऱ्याच लोकांना मराठी संज्ञा लवकर समजत नाहीत. उदा. डिजिटल विनिमय व्यासपीठ (Digital Communication Platform / Internet), किरकोळ एजेंट्स(विक्रेता/व्यापारी) आणि ग्राहक (Seller and Buyer) तसेच एजेंट्स कडून वापरण्यात येणारे उपकरण (card swiping machine) इत्यादी..

आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/10/14 06:30:41.991316 GMT+0530

T24 2019/10/14 06:30:41.997439 GMT+0530
Back to top

T12019/10/14 06:30:41.629316 GMT+0530

T612019/10/14 06:30:41.650466 GMT+0530

T622019/10/14 06:30:41.668077 GMT+0530

T632019/10/14 06:30:41.668905 GMT+0530