অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ब्रॉडबँडचे महाजाल

यामध्ये तीन उपघटकांचा समावेश होतो, ते आहेत सर्वांसाठी ब्रॉडबँड - ग्रामीण, सर्वांसाठी ब्रॉडबँड - शहरी व राष्ट्रीय माहिती पायाभूत सुविधा (एनआयआय).

सर्वांसाठी ब्रॉडबँड- ग्रामीण

२,५०,००० ग्रामपंचायतींना डिसेंबर २०१६ पर्यंत राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर जाळ्यांतर्गत (एनओएफएन) आणले जाईल. याWireless प्रकल्पासाठी दूरसंचार विभाग (डीओटी) हा केंद्रीय विभाग आहे.

सर्वांसाठी ब्रॉडबँड- शहरी

 

नवीन शहरी घडामोडींमध्ये व्हर्च्युअल नेटवर्क संचालकाचा उपयोग सेवा वितरणासाठी व दळणवळण पायाभूत सुविधांसाठी केला जाईल व इमारती बांधण्याचे अधिकार दिले जातील.

राष्ट्रीय माहिती पायाभूत सुविधा (एनआयआय)

एनआयआय विविध सरकारी विभागांपासून ते पंचायत पातळीपर्यंत अतिवेगवान जोडणी व क्लाउड प्लॅटफॉर्म देण्यासाठी देशातील नेटवर्क व क्लाउड पायाभूत सुविधा एकत्र करेल. या पायाभूत सुविधा घटकांमध्ये राज्य व्यापी क्षेत्र नेटवर्क (स्वान), राष्ट्रीय ज्ञान नेटवर्क (एनकेएन), राष्ट्रीय ऑप्टिकल फायबर नेटवर्क (एनओएफएन), सरकारी वापरकर्ते नेटवर्क (जीयूएन) व मेघराज क्लाउड यांचा समावेश होतो. स्वान, एनकेएन, एनओएफएन, गन व जीआय क्लाउड यासारखे आयसीटी पायाभूत घटक एकत्रित करणे हे एनआयआयचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये राज्य, जिल्हा, गट व पंचायत पातळीवरील अनुक्रमे १००, ५०, २० व ५ सरकारी कार्यालये/सेवा केंद्रांना आडवी जोडणी देण्याची तरतूद असेल. या प्रकल्पासाठी डीईआयटीवाय केंद्रीय विभाग असेल.


 

 

 

स्त्रोत : ब्रॉडबँड हायवे, (एक डिजिटल इंडियाचा उपक्रम )

संकलन : छाया निक्रड

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate