অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ

मोहनलाल सुखाडिया विद्यापीठ

राजस्थान राज्यातील एक विद्यापीठ. ‘उदयपूर विद्यापीठ’ (स्था. १९६३) या नावाने प्रसिद्ध असलेल्या विद्यापीठाचे राजस्थानचे माजी मुख्यमंत्री कै. मोहनलाल सुखाडिया यांच्या स्मरणार्थ १९८३ मध्ये नामांतर करण्यात आले. नियामक मंडळ आणि कार्यकारी समिती रद्द होऊन त्या जागी व्यवस्थापन मंडळ स्थापण्यात आले आहे. कृषी व शिक्षणशास्त्र ह्या शाखांतील महाविद्यालयांसाठी वेगवेगळ्या स्वतंत्र विद्यापरिषदा स्थापन करण्यात आल्या आहेत.

विद्यापीठात एकूण ७,९५३ विद्यार्थी शिकत होते. (१९८३–८४). विद्यापीठाच्या मध्यवर्ती ग्रंथालयात ८६,९५३ ग्रंथ व २२० नियतकालीके होती (१९८३–८४). याच वर्षाचे विद्यापीठाचे उत्पन्न सु. १०·०० कोटी रु. व खर्च १०·९२ कोटी रु. होता.

लेखक: म. व्यं. मिसार

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/5/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate