অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रिझियन साहित्य

फ्रिझियन साहित्य

फ्रिझियन ही इंडो - युरापिअन भाषाकुटुंबातील जर्मानिक गटाच्या पश्चिम जर्मानिक शाखेतील एक भाषा आहे. ऐतिहासिक दृष्टीने प्राचीन इंग्रजी शी तिचा अगदी जवळचा संबंध आहे.

पूर्व फ्रिझियन, पश्चिम फ्रिझियन आणि उत्तर फ्रिझियन ह्या तिच्या पोटभाषा. त्यांपैकी पूर्व फ्रिझियन ही ओल्डेनबर्गच्या (प.जर्मनी) पश्चिमेकडील झाटरलंड ह्या भागात बोलली जाते, तर पश्चिम फ्रिझियन ही नेदर्लंड्सच्या फ्रीझ्लॅंड नावाच्या प्रांतात प्रचलित आहे. फ्रिझियन भाषा बोलणारे सर्वाधिक लोक (सु .तीन लाख)  ह्या प्रांतात आहेत .  येथील एक अधिकृत भाषा म्हणून नेदर्लंड्स सरकारने जिला मान्यता दिलेली आहे .  श्लेस्विगच्या (प.जर्मनी) पश्चिम किनाऱ्यावरील प्रदेशात, तसेच फर,आम्‌रुम, हेल्गोलँड आणि हालिगन बेटांवर उत्तर फ्रिझियनचा वापर केला जातो .

फ्रिझियन भाषिकांची एकूण संख्या अदमासे साडेतीन लाख आहे .

साहित्य: फ्रिझियन भाषेतील आरंभीच्या साहित्यात राजे आणि वीरपुरुष ह्यांच्या गुणगौरवार्थ रचिलेल्या गीतांचा समावेश होतो. ही गीते चारणांकडून गायिली जात असत आणि अशा चारणांची परंपरा इसवी सनाच्या आठ व्या शतकापर्यंत तरी कमीअधिक प्रमाणात होती, असे दिसून येते. तथापि ही गीते आज उपलब्ध नाहीत. अकरा व्या शतकापासूनच्या फ्रिझियन विधिसंहिता आणि विधिविषयक साहित्य मात्र मिळते. त्यात आढळणारी अनुप्रासयुक्त रचना, तसेच अनेकदा दिसून येणारी काव्यात्मकता ह्यांवरून प्राचीन फ्रिझियन कवितेची थोडीशी कल्पना येऊ शकते .

बहुसंख्य फ्रिझियन भाषिकांचा फ्री झ्‌लँड हा प्रदेश १५७९ मध्ये उत्रेक्त राजाला (यूनियन ऑफ उत्रेक्त) जोडला गेला. परकीय वर्चस्वामुळे फ्रिझियन भाषा - साहित्याची पीछेहाट होणे स्वाभाविक होते. ह्या अवनतावस्थेच्या पार्श्वभूमीवर गिस्‌बर्ट जॅपिक्‌स (१६०३ - ६६) हा कवी उदयाला आला. आपल्या श्रेष्ठ काव्यरचनेने त्याने फ्रिझियनला एक वाङ्‌मयीन भाषा म्हणून पुन्हा प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. उत्कट प्रेमकवितांबरोबर धार्मिक स्वरूपाची काव्यरचनाही जॅपिक्‌सने केलेली आहे. भावनेचा सच्चेपणा त्याच्या कवितेतून प्रत्ययास येत असला, तरी त्याच्या काव्यशैलीत, अत्यालंकरणाची बरोक प्रवृत्ती काही प्रमाणात दिसून येते. अठराव्या शतकात गिस्‌बर्ट जॅपिक्‌स हा अनेक फ्रिझियन कवींचे स्फूर्तिस्थान बनला. अनेकांनी त्याचे अनुकरणही केले; तथापि एकंदरीने कवितेचा हा अवनतकाळच होता.  एकोणिसाव्या शतकातील फ्रिझियन साहित्यावर स्वच्छंदतावादी प्रवृत्तींचा प्रभाव आढळतो.  हार्मेन सिट्रस्ट्रा (१८१७ - ६२) हा ह्या शतकातील एक विशेष उल्लेखनी य कवी. प्राचीन जर्मानिक काव्यप्रकारांचे पुनरु ज्जीवन करण्याचा त्याने प्रयत्न केला .

पहिल्या महायुद्धानंतरच्या काळात ‘ यंग फ्रिझियन कम्यू निटी ’  आणि ‘ क्रि श्च न फ्रिझियन सोसायटी ’ अशा दोन सांस्कृतिक संस्थांची झालेली स्थापना फ्रिझियन साहित्याला उपकारक ठरली आणि एक नवे वाङ्‌ मयीन प्रबोधन अवतरले .  शेक्सपिअर, शेली, मोल्येर आणि सेंट ऑगस्टीन ह्यांचे साहित्य फ्रिझियन भाषेत अनु वादिले गेले .

डाउवी काल्मा  (१८९६  -  १९५३ )  हा विसाव्या शतकातील एक थोर कवी आणि समीक्षक.  ‘किंग आल्डगिलीस ’ (१९२०)  ह्या इंग्रजी शीर्षकार्थ चे त्याचे पद्यनाटक उल्लेखनीय आहे.  ‘ किंग्ज ऑफ फ्रिझ्लँड ’ ( इं .  अर्थ .)  ह्या नावाने,  निर्यमक वृत्तात, त्याने निर्मिलेल्या ऐतिहासिक नाट्यकृतींच्या मालेत ह्या नाटकाचा अंतभाव होतो. ‘डॉन ’ व ‘साँग्ज’ ( इं. अर्थ.)  हे अनुक्रमे १९२७  आणि  १९३६  मध्ये प्रसिद्ध झालेले त्याचे काव्यसंग्रहही उल्लेखनीय आहेत. फेद्देशूरर (१८९८ -)  ह्याने आपल्या कवितेतून धार्मिक आणि राष्ट्रीय स्वरूपाचे विषय समर्थपणे हाताळले.  ‘सॅमसन’ ( १९४५, इं . अर्थ.)  ह्या त्याच्या पद्यनाटकास गिस्‌बर्ट जॅपिक्‌स वाङ्‌मय पुरस्कार देण्यात आला. ‘द चर्न ’ ( इं . अर्थ.) ह्या त्याने काढलेल्या (१९४६ ) वाङ्‌मयीन नियतकालिकाने अनेक महत्त्व पूर्ण फ्रिझियन साहित्यिकांना एकत्र आणले. १९४६ मध्ये बायबल चे फ्रिझियन भाषांतर प्रसिद्ध झाले. मार्टेन बस्मी आणि सिमकी क्लूस्टरमान ह्यांनी कादंबरीलेखन केले .  ऑन वॉडमनच्या कवितेतून प्रयोगशील दृष्टिकोण दिसून येतो. १९६१ मध्ये काव्यरचनेत नवे प्रयोग करणाऱ्या कवींचा एक गट उदयास आला. ‘ऑन फोर विंड्‌स ’ ( इं. अर्थ.) ह्या नावाने त्यांच्या काही कविता संगृहीत आहेत .

लेखक: ना. गो.लेलकर; अ. र .कुलकर्णी

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/19/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate