অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गंगा

गंगा

गंगा

भारतातील सर्वांत मोठी व सर्वांत पवित्र नदी. लांबी २,५१० किमी., जलवाहन क्षेत्र ८,३८,२००चौ . किमी., म्हणजे भारताच्या क्षेत्रफळाचा सु. चौथा हिस्सा. गंगेच्या खोऱ्यातील उ. प्रदेश, बिहार वप. बंगाल या राज्यांत भारतातील सु. 3५% लोक राहतात. या तीन राज्यां त मिळून लोकसंख्येची सरासरी घनता दर चौ . किमी. ३४६·३३ आहे.

गंगेचा उगम उ. प्रदेशाच्या प. कुमाऊँ भागात टेहरी-गढवाल जिल्ह्यातील ४,०६२ मी. उंचीच्या गंगोत्री या क्षेत्रापासून सु. २९ किमी., ४,२०६ मी. उंचीवरील गोमुख येथे, गंगोत्री हिमनदीच्या टोकाशी हिमगुहेतून होतो. गंगेला उन्हाळ्यातही पाणी पुरवणारी ही गंगोत्री हिमनदी ३० किमी. लांब व ३ किमी. रूंद आहे. बद्रीनाथ व गंगोत्री मंदिरापर्यंत उतरलेल्या हिमनद्या आता मागे हटल्या आहेत. भागीरथी या नावाने उगमापासून ३५ किमी.

पश्चिमेकडे आणिमग हिमालयाच्या रांगांतून, खोल दऱ्यांतून १४० किमी. दक्षिणेकडे गेल्यावर तिला देवप्रयाग येथे अलकनंदा हा गंगेचा दुसरा शीर्षप्रवाह मिळतो. बद्रीनाथ गावाच्या मागे सतोपंथ व भगीरथ खो रक हिमनद्यांच्या जिव्हेतून नंदादेवीच्या उत्तरेस, तिबेटच्या सरहद्दीजवळ, अलकनंदेच्या शीर्षप्रवाहाचा उगम होतो.

जोशीमठ येथे बद्रीनाथकडून आलेली विष्णु गंगा आणि द्रोणगिरीकडून आलेली धौलीगंगा एकत्र येतात व विष्णुप्रयागनंतर तिला अलकनंदा म्हणतात. तिला कर्णप्रयाग येथे पिंडरगंगा व रूद्रप्रयाग येथे मंदाकिनी मिळते. देवप्रयागनंतर भागीरथी -अलकनंदा संयुक्त प्रवाहाला गंगा हे नाव प्राप्त होते. मग दक्षिणेकडे ७० किमी. जाऊन नाग टिब्बा व शिवालिक रांगातून खडक फोडून, वाट काढून ह्रषीकेशवरून हरद्वा र येथे गंगा मैदा नी प्रदेशात येते.

हरद्वारहून गढमुक्तेश्वरावरून अनूपशहरापर्यंत गंगा दक्षिणेस, तेथून फरूखाबाद, कनौज, कानपूरवरून अलाहाबाद (प्रयाग) पर्यंत आग्नेयीकडे, मग दक्षिणेकडून मोठे चंद्राकृती वळण घेऊन वाराणसीपर्यंत आणि तेथून गाझीपूर, बलिया, पाटणा, मोंघीर, भागलपूर, साहेबगंजवरून प. बंगालच्या सरहद्दी पर्यंत सामान्यत: पूर्वेकडे सु. १२० किमी. वाहत जाते.

बिहारमधील राजमहाल टेकड्यांना वळसा घालून गंगा प. बंगालमध्ये शिरते. प. बंगालमध्ये आग्नेय दिशेने प्रथम त्याच्या प. सीमेवरून, मग त्याचाचिंचोळा भाग ओलांडून पूर्वसीमेवरून व मग त्याच सीमेवरून, दक्षिणेकडे सु. ४० किमी. गेल्यावर पुन्हा आग्नेय दिशेने बांगला देशात जाते.ग्वालंदोजवळ तिला बह्मपुत्रा मिळते व मग ती पद्मा या नावाने वाहते. पुढेफरीदपूरच्या पूर्वेस मेघनेच्या खाडीला मिळून दक्षिण या बेटाजवळ बंगालच्या उपसागरास मिळते.

प. बंगाल व बां गला देश यांत गंगेचे असंख्य शाखाप्रवाह होऊन जगातील सर्वांत विस्तीर्ण ५८,७५२चौ. किमी. क्षेत्रफळाचा त्रिभुजप्रदेश तयार झाला आहे. त्याच्या द. तीरावर अनेक बेटे तयार झाली असून तेथे समुद्रालामिळणाऱ्या प्रवाहांच्या मुखास गंगेची मुखे म्हणतात. गंगेच्या मुखांजवळचा, सु. १६,९०० चौ. किमी. विस्ताराचा, अरण्यमय आणि दलदलीचा, सुंदरबन हा प्रदेश सुप्रसिद्ध शाही बंगाली वाद्यांचे वसतिस्थान होय.

गंगेला फरूखाबादच्यावर नुता तसेच फरूखाबाद व हरदोईयांच्या दरम्यानरामगंगा मिळते. हिमालयात जग्नोत्रीयेथे उगम पावलेली यमुना नदी दिल्ली, मथुरा, आग्रा, इटावावरून गंगेला सु. ८०० किमी.

समांतरवाहून, गंगामैदानाच्या प.सीमेवरून येऊन, माळवा पठारावरील चंबळ, सिंध, बेटवा, केन यांचे तसेच हिमालयातील तोन्स नदीचे व गंगा सिंधूअंतर्वेदीतील काही प्रवाहां चे पाणी गोळा करून अलाहाबाद येथे गंगेला उजवीकडून मिळते. तेथे तिचे स्वच्छ, काळसर पाणी आणि गंगेचे गाळमिश्रित पांढुरके पाणी यांतीलफरक सहज लक्षात येतो.

अलाहाबाद व वाराणसी यांच्या दरम्यान द. तोन्स, छप्रा आणि पाटणा यांच्या दरम्यान शो ण; पाटणा येथे पुनपुन, लखिसराईच्या ईशान्येस गयेवरून आलेली फल्गू, या नद्या व इतर अनेक प्रवाह गंगेला उजवीकडून मिळतात. त्यांना फक्त पावसाच्याच पाण्यांचा पुरवठा होतो; हिमालयात उगम पावलेल्या नद्यांप्रमाणे उन्हाळ्यात वितळणाऱ्या बर्फाचे पाणी मिळत नाही. गंगेला डावीकडून वाराणसी व गाझीपूर यांच्या दरम्यान गोमती; बलियाच्यां पश्चिमेस तमसा किंवा पू. तोन्स; छप्रा येथे घागरा म्हणजेच शरयू किंवा पूर्वीची घर्घरा; सोनपूर येथे गंडकी, मोंघीर जिल्ह्यात बुरी गंडक; मनिहारीघाटाच्या थोडे वर एव्हरेस्ट भागातून आलेली कोसी आणि तिच्या पूर्वेस महानंदा या प्रमुख नद्या व इतर अनेक प्रवाह मिळतात.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate