অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

अप्साला

अप्साला

अप्साला

स्वीडनचे प्रमुख सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र. लोकसंख्या १,३०,०९७ (१९७१). हे फ्यूफ्सान नदीवर, स्टॉकहोमच्या वायव्येस ६६ किमी. आहे. अस्ट्रा आरॉस हे याचे प्राचीन नाव. येथून ३·२ किमी. वर असलेले गाम्ला अप्साला(जुने अप्साला) हे सहाव्या शतकापासून राजधानीचे शहर होते. अप्साला येथे ११६४ पासून आर्चबिशपचे पीठ होते. स्वीडनमधील सर्वांत मोठे गॉथिक कॅथीड्रल येथे १२८७ ते १४३५ यांदरम्यान बांधले गेले.

कॅथीड्रलमध्ये थोर गस्तेव्हस, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा वनस्पतिशास्त्रज्ञ लिनीअस, धर्मवेत्ता व शास्त्रज्ञ स्वीड्‌नबॉर्ग आदींची थडगी आहेत. ल्यूथरन धर्मपंथाचे प्रमुख केंद्र याचा शहरी काढण्यात आले. १४७७ मध्ये येथे अप्साला विद्यापीठाची स्थापना झाली. जगातील नामांकित विद्यापीठांत याची गणन होते.

विद्यापीठातील ग्रंथालय समृध्द असून त्यात दहा लाख ग्रंथ व वीस हजार दुर्मिळ हस्तलिखिते आहेत. सोळाव्या शतकात गस्तेव्हस वासाने बांधलेला किल्ला, आर्चबिशपचा बरोक शैलीचा राजवाडा, लिनीअस वनस्पति-उद्यान व इतर संग्रहालये, वेधशाळा इ. प्रेक्षणीय स्थळे शहरात आहेत. येथे कातीव व कोरीव कामास चांगले; शेतीची अवजारेही करतात. साल ज्वरनाशक म्हणून वापरतात; तिच्या चूर्णाचा लेप हाड मोडल्यास लावतात.

 

हार्डीकर, कमला श्री.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate