অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यावाता

यावाता

याहाता. जपानच्या फुकुओका प्रांतातील कीटाक्यूशू या शहराचे औद्योगिक उपनगर.

पान सरकारने औद्योगिक व लष्करी अशा दोन्ही दृष्टींनी देशाला समर्थ व बलवान करण्यासाठी १८९६ मध्ये यावाता येथे देशातील सर्वांत मोठा पोलाद कारखाना उभारला. या कारखान्यामधून उत्पादन १९०१ सालापासून सुरू झाले. दुसऱ्या महायुद्धात शस्त्रास्त्रे व रेल्वेसामग्री यांच्या उत्पादनावर विशेषत्वाने भर देऊन जपानच्या वाढत्या युद्धविषयक गरजांची परिपूर्ती करण्यात या कारखान्याने महत्त्वाची कामगिरी बजावली. १९३४ मध्ये यावाता कारखाना व इतर पाच खाजगी कंपन्या यांचे विलीनीकरण करण्यात येऊन ‘निप्पॉन स्टील कंपनी’ अशी एक नवीनच कंपनी स्थापण्यात आली. दुसऱ्या महायुद्धानंतर (१९५० मध्ये) दोस्त राष्ट्रांद्वारे या कंपनीचे पुन्हा ‘यावाता स्टील कंपनी’ व ‘फूजी स्टील कंपनी’ अशा दोन कंपन्यांत विभाजन करण्यात आले. १९७० मध्ये पुनश्च या दोन्ही कंपन्यांचे विलीनीकरण करण्यात येऊन ‘निप्पॉन स्टील कॉर्पोरेशन’ हा प्रचंड निगम स्थापण्यात आला.

लोखंड व पोलाद उद्योगाशिवाय यावातामध्ये रसायने, सिमेंट, काच इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत.

गद्रे, वि. रा.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate