অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

झीमोन श्व्हेंडेनर

झीमोन श्व्हेंडेनर

झीमोन श्व्हेंडेनर : (१० फेबुवारी १८२९ - २७ मे १९१९). स्विस वनस्पतिवैज्ञानिक. त्यांचा जन्म सेंट गेलेनमधील ब्युक्स येथे झाला. त्यांनी१८५६ मध्ये झुरिक विदयापीठाची पीएच्.डी. पदवी संपादन केली. ते १८६० मध्ये म्यूनिक विदयापीठात वनस्पतिविज्ञानाचे प्राध्यापक,१८६७ मध्ये बाझेल येथे शास्त्रीय उद्यानाचे संचालक व प्राध्यापक आणि१८७७ मध्ये ट्युबिंगेन विदयापीठात प्राध्यापक झाले. ते १८७८ – १९१० मध्ये बर्लिन विदयापीठात प्राध्यापक होते.

त्यांनी १८६७ मध्ये प्रथमच असा दृष्टिकोन मांडला की, शैवाक (दगडफूल) ही वनस्पती शैवल व कवक यांच्या सहजीवनाने तयार झालेली संमिश्र वनस्पती आहे. ते पुढील कार्याबद्दल विशेष प्रसिद्ध आहेत. १८७४ मध्ये त्यांनी वनस्पतीच्या शरीरातील आधारभूत घटकांच्या संबंधात शारीर (शरीररचनाशास्त्र) या विषयाचे क्रियावैज्ञानिक दृष्टीने संशोधन केले. १८८१ मध्ये त्यांनी यांत्रिकीय दृष्टीने वल्करंध्राच्या (सालीच्या बाह्य स्तरातील सूक्ष्म छिद्रांच्या ( संरचनेचा अभ्यास केला त्यांनी वनस्पती ऊतक (समान रचना व कार्य असणारे कोशिकासमूह) व पाने यांच्या विकास व रचनेसंबंधी यांत्रिकीय सिद्धांत मांडला. १८९३ मध्ये त्यांनी खोडवलयनी (खोडाला विळखे घालून वाढणाऱ्या) वनस्पती व कोशिकावरणाची स्थितीस्थापकता यांवर केलेले कार्य महत्वाचे आहे.

Vorlesungen uber Mechanidche Probleme der Botanik (१९०८) हा गंथ त्यांनी प्रसिद्ध केला.

 

लेखक - ज. वि. जमदाडे

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/27/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate