অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मिल्टन फ्रीडमन

मिल्टन फ्रीडमन

मिल्टन फ्रीडमन  : (३१ जुलै १९१२ - १६ नोव्हेंबर २००६ ).  प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व  १९७६  च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी. जन्म ब्रुकलिन,  न्यू यॉर्क येथे स्थलांतरीत गरीब ज्यू कुटुंबात. मिल्टन फ्री डमन पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील मृत्यू पावले. फ्रीडमन यांचे शिक्षण रट्‌गर्झ, शिकागो व कोलंबिया विद्यापीठांतून झाले. रट्‌गर्झ विद्यापीठात शिकत असताना ,  फ्रीडमन यांच्यावर ऑर्थर बर्न्स ( फेडरल रिझर्व सिस्टिमचे भावी अध्यक्ष) आणि होमर जोन्स या दोघा प्राध्यापकांचा प्रभाव पडून त्यांना अर्थशास्त्राच्या अभ्यासात रु ची निर्माण झाली. बर्न्स ह्यांनी अर्थशास्त्राच्या अमूर्त सिद्धांताऐवजी अनुभवाधिष्ठित वैज्ञानिक दृष्टीवर अधिक भर देण्यास शिकविले, तर जोन्सनी सनातनी विचारसरणी त्यांच्या मनावर ठसविली .

शिकागो विद्यापीठातून  १९३२  मध्ये पदवी संपादिल्यानंतर अर्थशास्त्राच्या पुढील अभ्यासक्रमासाठी फ्रीडमन शिकागो विद्यापीठात दाखल झाले. शिकागो विद्यापीठातील अध्ययनकाळात फ्रीडमन यांच्यावर फ्रँक नाइट, ॲरन डिरेक्टर, जेकब व्हायनर, हेन्री सिमन्झ, हेन्री शुल्झ या विविध अर्थशास्त्रीय विचारसरणीच्या अध्या प कांचा प्रभाव पडला. या सर्व मंडळींच्या वैचारीक मांडणीतूनच ‘शिकागो संप्रदाय’ ( शिकागो स्कूल ) म्हणून ओळखली जाणारी विचारसरणी विकसि त झाली. फ्रीडमन आजमितीसही या संप्रदायाचे प्रमुख प्रवक्ते मानले जातात .

फ्रीडमन यांच्या लेखनशैलीवर फ्रँक नाइट यांचा प्रभाव विशेष दिसून येतो. छोटी परंतु नाट्यपू र्ण वाटतील अशी विधाने मांडावयाची व लगोलग ती अंशतः कशी चू क आहेत हे दाखवीत असतानाच ती मूलतः कशी सत्य आहेत हे पटवून देत जावयाचे, यावर त्यांचा भर असतो. या त्यांच्या शैलीमुळे व डावपेचांमुळे फ्रीडमन हे सहसा विरोधकांच्या पकडीत न येणारे वादपटू म्हणून प्रख्यात आहेत.

पुढे कोलंबिया विद्यापीठात वेस्ली मिचेल यांच्याजवळ फ्रीडमननी अर्थशास्त्राचे धडे गिरविले. सामाजिक शास्त्रात निगमन पद्धती निरु पयोगी असून आर्थिक निर्णय हे विवेकनिष्ठ असतातच असे नाही ,  असा मिचेलचा वि श्वा स असल्याने त्यांचा भर अमूर्त तत्त्वां पासून सुरुवात करून तार्किक पद्धतीने मांडणी करीत जाण्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षणावर अधिक होता .  मिचेल ह्यांनी फ्रीडमनवर विज्ञाननिष्ठेचे संस्कार केले .

‘नॅशनल रिसोर्सेस कमिटी ’ तर्फे  १९३५  मध्ये अमेरिकेतील सेवनाच्या विविधांगांचा अभ्यास हाती घेण्यात आला ,  त्यात फ्रीडमन सहभागी झाले . १९३७  मध्ये सायमन कुझनेट्स ह्यांनी त्यांना ‘ नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च ’ तर्फे अमेरिकेतील स्वतंत्र व्यावसायिकांचा अभ्यास करण्यासाठी पाचारण केले .  वैद्य ,  दंतवैद्य ,  वकील ,  प्रमाणित हिशेबनीस व अभियंते यांच्या उत्पन्नांचा अभ्यास करून पुढे याच विषयावर प्रबंध लिहून फ्रीडमननी १९४६  मध्ये डॉक्टरेट मिळविली .  ब्यूरोतर्फे फ्रीडमननी स्टडीज इन इन्कम अँड वेल्थ च्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडांचे संपादन केले ,  त्यात त्यांची साक्षेपी दृष्टी जागोजागी दिसते .

फ्रीडमन यांचा विवाह  १९३८  मध्ये रो झ डिरेक्टर  ( शिकागो विद्यापीठातील ॲरन डिरेक्टर यांची भगिनी )  यांच्याशी झाला .  त्या शिकागो विद्यापीठात फ्रीडमन यांच्या सहाध्यायी होत्या व पुढे ‘ नॅशनल रिसोर्सेस कमिटी ’ त त्यांच्या सहकारी होत्या .  कॅपिटॅलिझम अँड फ्रिडम हा ग्रंथ लिहिताना त्यांना आपल्या पत्नीचे बहुमोल सहाय्य झाले .

कार्नेगी कॉर्पोरेशनच्या आर्थिक साहाय्याने  १९४१  मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संभाव्य चलनवाढीचा अंदाज घेण्यात येऊन ती टाळण्याच्या उद्देशाने किती कर आकारणी करावी लागेल ,  हे ठरविण्यासाठी कोलंबिया विद्यापीठातर्फे एक प्रकल्प हाती घेण्यात आला .  त्यात सह निर्दे शक म्हणून काम करीत असताना द्रव्यविषयक प्रश्नांकडे व साकलिक अर्थशास्त्रीय सिद्धांतांकडे फ्रीडमन यांचे लक्ष वेधले .  या विषयावरील त्यांचा दृष्टिकोन टॅक्सिंग टू प्रिव्हेन्ट इ न्फ्ले शन  (१९४३ )  या पुस्तकात ग्रथित झाला आहे.  अंदाजपत्रकातील तूट कोणत्या पद्धतीने भरून काढली जाते व तिचा द्रव्याच्या पुरवठ् यावर कोणता परिणाम घडून येतो ,  यावरच चलनवाढीचे स्वरूप अवलंबून राहील असे फ्रीडमन यांनी प्रतिपादिले आहे. तथापि दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत त्यांची द्रव्यवादी भूमिका तयार झालेली नव्हती .  फ्रीडमन हे द्रव्यवादाचे  ( मॉनेटरिझम )  आद्य प्रवर्तक मानले जातात .  राजकोषीय नीतीवर भर देणाऱ्या केन्सवादाचा विरोध फ्रीडमननी सतत केला आहे .

अमेरिकेच्या वित्तखात्याच्या कर - संशोधन विभागातर्फे  १९४१ - ४३  या काळात करसुधारणा विधेयकांचे आराखडे तयार करण्याचे काम फ्रीडमननी केले . १९४६  मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची शिकागो विद्यापीठात नेमणूक झाली ,  तेव्हापासून आजतागायत स्वतंत्र बाजारयंत्रणेचा पुरस्कर्ता व अर्थव्यवस्थेतील स र कारी हस्तक्षेपाचा कट्टर विरोधक ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे .

ॲना जे .  श्वा र्ट्‌झ यांच्याबरोबर लिहिलेला फ्रीडमन यांचा बहुचर्चित व प्रशंसित ग्रंथ ए मॉनेटरी हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स  १८६७ - १९६७  हा  १९६३  मध्ये प्रसिद्ध झाला .  त्यात  १९३०  ची महामंदी  ( ग्रेट डि प्रे शन )  ही अमेरिकेत द्रव्यपुरवठा कमी झाल्याने उद्‌भवली ,  असे मत मांडले आहे .  परंतु टी काकारांनी त्याचा प्रतिवाद करताना  १९२९  ते  १९३२  या काळात द्रव्यपुरवठ्यात तीन टक्क्यांनी घट झाली ,  तर किंमतींमध्ये मात्र  ३०  टक्क्यांनी घट व बेकारीत  २५  टक्क्यांनी वाढ झाल्याचे दाखवून दिले आहे .

फ्रीडमन यांनी  १९६४  साली अमेरिकन राष्ट्रध्यक्ष्यांच्या निवडणुकीत बॅरी गोल्डवॉटर यांचा व  १९६८  मध्ये रिचर्ड निक्सन यांचा प्रचार केला . १९७२  पर्यंत तरी निक्सन प्रशासनाच्या आर्थिक धोरणावर फ्रीडमन यांच्या विचारांची स्पष्ट छाप दिसते .

फ्रीडमन यांची  १९६७  मध्ये ‘ अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन ’ चे अध्यक्ष म्हणून निवड झाली .  फ्रीडमन यांचा बाजारपेठेच्या यंत्रणेवरील विश्वास हा भांडवलशाहीवरील असलेल्या त्यांच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे . भांडवलशाही भौतिक संपन्नतेची जन्मदात्री तर आहेच ,  परंतु मानवी स्वातंत्र्याची ती एक पूर्वअटही आहे ,  असे त्यांना वाटते .  भांडवलशाहीचा सर्वांत मोठा लाभ संपत्तीचा संचय नसून स्त्री - पुरुषांना आपली क्षमता विकसि त करण्याची मिळवून दिलेली संधी ,  हा आहे ,  असे फ्रीडमनना वाटते .  कॅपिटॅलिझम अँड फ्री डम  (१९६२ )  या ग्रंथात भांडवलशाहीमुळे ज्यांचा सर्वात अधिक फायदा होतो ,  असे अल्पसंख्य गट भांडवलशाहीचे कट्टर विरोधक असतात ,  हा विरोधाभास त्यांनी लक्षात आणून दिला .  परंतु भांडवलशाहीला असलेला धोका हा समाजवादी वा साम्यवादी विचारसरणीकडून नसून भांडवलशाहीनेच निर्माण केलेल्या कल्याणका री राज्यापासून आहे ;  त्यातूनच कमालीची चलनवाढ ,  आर्थिक अव्यवस्था व एकाधिकारशाहीला निमंत्रण मिळते ,  असे त्यांना वाटते .

फ्रीडमनना  १९७६  चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितो षिक मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर चिलीमधील लष्करी उठावात फ्रीडमन यांचा हात असल्याचा आरोप खुद्द नोबेल पारितोषिक समितीच्या काही सदस्यांनी केल्यामुळे मोठेच वादळ निर्माण झाले होते .  फ्रीडमन  –  समर्थकांनी अर्थातच त्या आरोपाचा प्रतिवाद केला .

एसेज इन पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स  (१९५३ ),  ए थिअरी ऑफ द कन्झम्प्‌शन फंक्शन  (१९५९ ),  प्रोग्रॅम फॉर मॉनेटरी स्टॅबिलीटी  (१९५९ ),  इन्फ्ले शन  :   कॉझिस अँड कॉन्सिक्वेन्सिस  (१९६३ ),  द ग्रेट कॉन्ट्रॅक्शन  (१९६५ ), प्राइस थिअरी  (१९७६ ),  इन्फ्ले शन अँड द रोल ऑफ गव्हर्नमेंट  (१९७८ ),  फ्रि टू चूज  (१९८० ) ( सहलेखिका  :  रोझ फ्रीडमन )  हे फ्रीडमन यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत .

फ्रीडमन हे न्यूजवीक या सुप्रसिद्ध अमेरिकन साप्ताहिकाचे स्तंभलेखक म्हणूनही काम करतात .  टेनिस ,  सुतारकाम ,  व्याख्याने हे फ्रीडमन यांचे फुरसतीचे छंद आहेत .

 

लेखक - र. दे . हातेकर

स्त्रोत - मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate