অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

व्होल्गा

व्होल्गा

व्होल्गा

युरोप खंडातील सर्वांत लांब व रशियातील सर्वांत महत्त्वाची नदी. व्होल्गाचा संपूर्ण प्रवाह रशियातूनच गेलेला आहे. लांबी ३,७०० किमी. व्होल्गा व तिच्या उपनद्यांचे पश्चिम रशियातील एकूण जलवाहनक्षेत्र १४,५८,९०० चौ. किमी. आहे.

मॉस्कोच्या वायव्येस ३६५ किमी.वर, तर सेंट पीटर्झबर्गच्या (लेनिनग्राडच्या) आग्नेयेस ३२० किमी.वर असलेल्या व्हल्दाई टेकड्यांमधील दलदलयुक्त प्रदेशात ही नदी उगम पावते. उगमाजवळच एक लहानसे चर्च आहे.

उगमापासून कामा नदी मिळेपर्यंतचे व्होल्गाचे खोरे मिश्र जंगलांचे आहे, तर ओका नदी मिळेपर्यंतच्या खोऱ्याचे भूमिस्वरूप हिमनद्यांच्या गाळाने आच्छादलेले आहे.

उगमापासून ओका नदी मिळेपर्यंतचा वरचा टप्पा, तेथपासून कामा नदी मिळेपर्यंतचा मधला टप्पा, तर त्याच्या खालील मुखापर्यंतचा खालचा टप्पा असे व्होल्गा नदीचे तीन टप्पे पडतात.

 

 

 

 

 

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate