অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाडांग

पाडांग

इंडोनेशियाच्या सुमात्रा बेटातील प. सुमात्रा प्रांताचे मुख्य ठिकाण व प्रमुख सागरी बंदर. लोकसंख्या १,९६,३०० (१९७१). हे १° द. अक्षवृत्तावर पाडांग नदीमुखाशी वसले आहे. डचांची सर्वात जुनी वसाहत येथे होती. १७८१-८४ व १७९५-१८१९ यांदरम्यान हे ब्रिटिशांच्या, तर दुसऱ्या महायुद्धात जपानच्या ताब्यात होते. शहराच्या परिसरात खनिज संपत्तीचे साठे असून, शहरात कापड व सिमेंट यांशिवाय इतरही अनेक उद्योग चालतात. हे महत्त्वाच्या शहरांशी रस्ते, लोहमार्ग व हवाई मार्ग यांनी जोडले आहे. बंदरातून रबर, खोबरे, चहा, कॉफी, कोयनेल, तंबाखू, दालचिनी, कोळसा, सिमेंट, चामडी वगैरेंची निर्यात होते. येथे पंचशिला विद्यापीठ आहे. रुंद रस्ते, सुबक घरे व रम्य उद्याने ही येथील ठळक वैशिष्ट्ये होत.

 

 

लेखक -लिमये, दि. ह.

स्त्रोत - मराठी विश्वकोश

 

अंतिम सुधारित : 6/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate