অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पोर्ट लूई

पोर्ट लूई

पोर्ट लूई

मॉरिशस देशाच्या राजधानीचे शहर व बंदर. ते मॉरिशस बेटाच्या वायव्य किनाऱ्यावर असून मुंबईपासून ४,०५४ किमी. व कलकत्त्याहून ५,१२१ किमी. अंतरावर आहे. लोकसंख्या १,४१,३४३ (१९७६ अंदाज). केप ऑफ गुड होपला वळसा घालून आशिया व यूरोपला जाणाऱ्यायेणाऱ्या व्यापारी जहाजांचे थांब्याचे ठिकाण म्हणून् बेर्त्रान फ्रांस्वा माए द ला बूर्दाने (१६९९१७५३) या फ्रेंच गव्हर्नरने पोर्ट लूईची १७३५ मध्ये स्थापना केली.

नेपोलियनच्या युद्धांत (१८००१५) ब्रिटिशांनी मॉरिशसचा ताबा घेतल्याने हिंदी महासागरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मोक्याचे ठिकाण म्हणून या बंदराला फार महत्त्व होतेतथापि १८६९ मध्ये सुएझ कालव्यामधून जलवाहतूक सुरू झाल्याने पोर्ट लूईचे महत्त्व कमी होत गेले. येथे साखर चहामद्ये, सिगारेटी लोतंतू तेले साबण काड्यापेट्या हे प्रमुख उद्योग आहेत.

निर्यात व्यापारात साखर व तज्जन्य पदार्थांचा ७६% च्या वर वाटा असतो. साखरेची गुदामेनिर्यात कंपन्याबॅंका व शासकीय कार्यालये यांचे पोर्ट लूई हे केंद्र असून लोहमार्ग,रस्ते यांचे जाळे येथूनच सबंध बेटावर पसरले आहे. येथे एक आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे.

शहराच्या मध्यभागी सिटडेल हा जुना प्रेक्षणीय किल्ला (१८३८) असून येथील मॉरिशस इन्स्टिट्यूटमध्ये (१८८०) मॉरिशस बेटावरील वनस्पती व प्राणी यांचा अभ्यास चालतो. येथे निसर्गेतिहासविषयक व कलाविषयक संग्रहालये आहेत.

यांशिवाय शहरात अश्वशर्यतीचे मैदानकरमणूकगृहे अँग्लिकन व रोमन कॅथलिक कॅथीड्रलशाही महाविद्यालयछोटासा शेअरबाजारही आहे. शहरात प्रसिद्ध होणाऱ्या ५० नियतकालिकांपैकी १३ दैनिके आहेत. पोर्ट लूईहून भारताशी थेट हवाई वाहतूक चालते. शहरातील बहुसंख्य लोकवस्ती भारतीयांची असलीतरी चिनी लोकही बरेच आहेत.

 

डिसूझाआ. रे.

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate