অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

काराकुम

काराकुम

काराकुम

रशियामधील विस्तीर्ण वाळवंट. हे तुर्कमेन प्रजासत्ताकात आग्नेय-वायव्य पसरलेले असून, त्याच्या नावाचा अर्थ काळे वाळवंटअसा आहे.

क्षेत्रफळ २,८४,९००० चौ.किमी.; ह्याचे वायव्येस उश्त-उर्त पठार, ईशान्येस अमुदर्या नदी, दक्षिणेस कोपेतदा पर्वत व पश्चिमेस कॅस्पियन समुद्रकिनारा आहे. येथे वाळू अशी फारशी आढळत नाही. वाळूसारखी माती बरीच आढळते.

विहीरींमधून पाणी मिळते, पण तेही खारे असते. येथील भटके लोक शेळया, उंट व सुप्रसिद्ध काराकुल मेंढ्या पाळतात. या वाळवंटात तेद्‌झेन व मुरगाब नावाची मरुद्याने असून ट्रान्सकॅस्पियन लोहमार्ग यातून जातो.

स्येर्नी झव्हॉट व दरवाझा येथे गंधक सापडते. येथे हरिण, लांडगा,रानमांजर, रानउंदीर हे प्राणी बरेच असून हिवाळयात पक्षी पुष्कळच असतात. अमुदर्या व कॅस्पियन यांना जोडणाऱ्या कालव्याचा प्रकल्प स्थगित झाला असला, तरी वाळवंटाच्या आग्नेय भागातून जाणाऱ्या काराकुम कालव्याची बरीच प्रगती झाली आहे.

 

लिमये, दि.ह

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/16/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate