অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फ्रिझियन बेटे

फ्रिझियन बेटे

यूरोपच्या वायव्येस उत्तर समुद्रात पसरलेली द्वीपमालिका . ही नेदर्लंड्समधील नॉर्थ हॉलंड प्रांताच्या उत्तर टोकापासून डेन्मार्कच्या मांदर बेटापर्यंत पसरली आहे . नेदर्लंड्स , प . जर्मनी यांच्या उत्तर व डेन्मार्कच्या प .किनाऱ्याला ही रांग समांतर असून किनाऱ्यापासून तिचे अंतर सु .  ५ ते ३२ किमी . आहे . या रांगेचे पश्चिम , पूर्व व उत्तर फ्रिझियन बेटे असे तीन भाग अनुक्रमे नेदर्लंड्स , प. जर्मनी व डेन्मार्क यांच्या  आ धिपत्याखाली येतात .

सागरी लाटा आणि वादळ यांच्या सतत होणाऱ्या क्षरण - क्रियेमुळे मुख्य भू मीची वाळूची किनारपट्टी वेगळी होऊन ही बेटे निर्माण झाली .यां तील पश्चिम व पूर्व फ्रिझियन बेटांचा विस्तार इ . स .चौथ्या शतकापासून तेराव्या शतकापर्यंतच्या काळात झाला .

या बेटांचा पृष्ठभाग समुद्रसपाटीपासून फार उंच नसल्याने समुद्राच्या लाटांमुळे त्यांचे बरेच नुकसान होते . १३६२ , १५७० व १६३४ मध्ये झालेल्या वादळांमु ळे यांतील बऱ्याच बेटांचे आकार खूपच बदलले व बराचसा भूभागही नष्ट झाला .

ही द्वीपमालिका प्रथम नेदर्लंंड्सच्या वायव्य किनाऱ्यापासून बहिर्गोलाकृती वळण घेऊन पूर्वेस प .जर्मनीच्या किनाऱ्याने एल्ब नदीमुखापर्यंत सलगपणे पसरते व नंतर उत्तरेस वळून तुटकतुटक भागांनी प .जर्मनीच्या श्ले स्विग - होल्‌स्टाईन प्रांताच्या किनाऱ्याने पुढे डेन्मार्कच्या जटलंड द्वीपकल्पाच्या किनाऱ्यापर्यंत पसरते .

बेटांवरील हवामान थंड पण सतत ढगाळ पावसाळी असते . प श्चि मी वाऱ्यांमुळे वर्षभर पाऊस पडतो . वाळूमिश्रीत जमीन व जोरदार वारे यांमुळे बेटांवर मोठ्या वनस्पतींची वाढ होत नाही .  उत्तम प्रतीची चराऊ कुराणे मात्र भरपूर आहेत ,  त्यांमुळे गुरांची पैदास मोठ्या प्रमाणावर होते .‘ फ्रिझियन गाई ’ जगप्रसिद्ध आहेत .काही भागांतील अल्पशा सुपीक जमिनीत राय , ओट , बटाटे इ .पिके घेतली जातात .

यांशिवाय येथे मासेमारी , मेंढ्या पाळणे हेही मुख्य व्यवसाय आहेत . काही बेटांवर पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने सुधारणा केल्या जात आहेत . बहुतेक बेटांवर जाण्यासाठी लहान बोटींचाच वापर करावा लागतो .

हेल्गोलॅंड बेटावरील बंदाराचे विहंगम दृश्य

पश्चिम फ्रिझियन बेटे

 

 

 

 

नेदरर्लंड्च्या उत्तरेस पूर्व - पश्चिम दिशेने पसरलेल्या या द्वीपसमूहातील बऱ्याच बेटांवर लोकवस्ती आढळते . लोकसंख्या २० , ८००  ( १९७२ अंदाज ). या बेटांमुळे निर्माण झालेल्या नैसर्गिक बांधामुळे नेदर्लंड्सचा मुख्य भूभाग व ही बेटे यांदरम्यान ‘ व्हाडंझी ’  हा उथळ समुद्र निर्माण झाला आहे .

या द्वीपसमूहात टेसल  ( क्षेत्रफळ १६६ चौ . किमी .) , व्ह्‌लीलांट  ( ३१ चौ . किमी .) , टेर्स्कहेलिंग  ( ९६ चौ .  किमी .) ,  आमलांट ( ५७ चौ .  किमी .) , स्खी र्माॅ निकोख ( २६ चौ .  किमी .) इ . महत्त्वा ची बेटे असून रॉटमरोख  ( ३· ८ चौ .  किमी .) , सीमोन्सांट ,  बोस्प्लाट , रॉटमेरप्लाट इ . निर्मनुष्य बेटांचाही यात  समावेश होतो . यांपैकी टेसल ह्या सर्वांत मोठ्या बेटाच्या उत्तरेकडील आयर्लांट पोल्डर हा भाग समुद्रपक्ष्यांचे पोषणकेंद्र आहे .

डेन बर्ग हे येथील प्रमुख शहर असून बेटावरील एकूण वसाहतीच्या एक - तृतीयांश लोकसंख्या या शहरात आहे .  आउडेस्‌चाइल्ड हे या बेटावरील छोटे मच्छीमारी बंदर असून नेदर्लंड्सच्या मुख्य भूमीशी तेथूनच छोट्या बोटींतून वाहतूक चालते .

यांत्रिक मच्छीमार बोट, उत्तर समुद्र, फ्रिझियन बेटे.

पूर्व फ्रिझियन बेटे

 

 

 

 

प .  जर्मनीच्या उत्तर किनाऱ्यालगत एम्स नदीमुखखाडीपासून पूर्वेस एल्ब नदीमुखापर्यंत पसरलेली बेटे . लोकसंख्या १९ , ७००  ( १९७० अंदाज ).  ही बेटे प . फ्रिझियन द्वीपसमूहातील बऱ्याचशा बेटांपेक्षा आकाराने लहान आहेत . यांतील बॉर्कुम  ( क्षेत्रफळ ३६ चौ .  किमी .) , यूस्ट  ( १७ चौ .  किमी .) , नॉर्डर्नाई  ( २३ चौ . किमी .) , बाल्टुम ( ७ · ७ चौ .  किमी .) ,  लांगओक  ( १८ चौ .  किमी .) , स्पी करोक  ( १४ चौ . किमी .)  व व्हांगरोग  ( ७ चौ .  किमी .)  या प्रमुख सात बेटांवरच थोड्याफार प्रमाणात शेती केली जाते व तेथेच लहान गावे आढळतात .  नॉईव्हेर्क  ( २ · ५ चौ .  किमी .)  या बेटावर दीपगृह असून त्याची देखभाल करणारे व नावाडी यांचीच तेथे वस्ती आहे .

शा र्ह र्न ( ५ चौ .  किमी .)  हे निर्मनुष्य बेट आहे .  उन्हाळ्यात यांतील मुख्य बेटांना पर्यटक भेट देतात .  बॉर्कुम व नॉर्डर्नाई ही बेटे उत्तर  समुद्रातील महत्त्वाची पर्यटनस्थळे म्हणून प्रसिद्ध आहेत . या बेटातील अंतर्गत वाहतुकीसाठी छोट्या रेल्वेचा व जर्मनीच्या मुख्य भूभागाशी दळणवळणासाठी लहान बोटींचा उपयोग केला जातो .

उत्तर फ्रिझियन बेटे

एल्ब नदीमुखखाडीच्या उत्तरेस ट्रिशन बेटापासून मांदर बेटापर्यंत पसरलेली ही बेटे प .जर्मनी व डेन्मार्क यांच्या त विभागलेली आहेत .  लोकसंख्या जर्मन ३८ , ४००  ( १९७० अंदाज ) ;  डेन ३ , ७०० ( १९६५ ).  १६३४ पर्यंत या समूहातील नॉर्टश्ट्रांट व पेल्‌व्हॉर्म ही दोन्ही बेटे एकमेकांस जोडलेली होती .

या बेटांच्या उत्तरेकडील इतर बेटेही एका अखंड भूभागाचे अवशेष आहेत . आम्‌रुम  ( क्षेत्रफळ २१ चौ . किमी .) , फर  ( ७८ चौ .  किमी .) ,  नॉर्टश्ट्रांट  ( ४५ चौ .  किमी .) ,  पेल्‌व्हॉर्म  ( ३६ चौ .  किमी .) ,  झिल्ट  ( ९३ चौ .  किमी .) ,  हेल्गोलँड  ( ६० हेक्टर ) , ट्रिशन इ . प . जर्मनीच्या ताब्यातील व फान  ( ५७ चौ .  किमी .) ,  मांदर  ( ६ चौ .  किमी .) ,  रम ( १०१ चौ .  किमी .) इ . डेन्मार्कच्या ताब्यातील बेटांचा या द्वीपसमूहात समावेश होतो .

१९२० पूर्वी यांतील डेन्मार्कची बेटे प्रशियाच्या ताब्यात होती .डेन लोकांनी समुद्र हटविण्याची जोरदार मोहीम हाती घेतली असून ही बेटे व मुख्य भूभाग यांदरम्यान ‘ व्हाडं  ’ ( पोल्डर  - समुद्र हटवून तयार केलेली जमीन ) तयार करण्याचे प्रयत्न चालू आहेत . रम आणि झिल्ट ही बेटे मुख भूभागाशी बंधाऱ्याने जोडण्यात आली आहेत . त्यामुळे झिल्ट बेट व मुख्य भूभाग यांच्यात रेल्वेवाहतूक शक्य झाली आहे .

या बेटावर अनेक पर्यटनस्थळे असून काइटुम हे त्यांतील प्रमुख शहर आहे

येथील रहिवासी मूळच्या जर्मानिक वंशाचे आहेत .  या तीनही द्वीपसमू हां तील बोलीभाषांचे इंग्रजी भाषेशी बरेचसे साम्य आढळते .

 

डिसूझा ,  आ .  रे . ;  चौंडे ,  मा .  ल .

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate