অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सूंदा बेटे

सूंदा बेटे

सूंदा बेटे

आग्नेय आशियातील द. चिनी समुद्र, सेलेबीझ समुद्र आणि हिंदी महासागर यांदरम्यानची इंडोनेशियातील बेटे. ७° उ. ते ११° द. अक्षांश व ९५° पू. ते १२८° पू. रेखांश यांमध्ये पश्चिम-पूर्व सु. ३,५०० किमी. व दक्षिण-उत्तर सु. १,७५० किमी.पर्यंत ही बेटे पसरलेली आहेत.

ग्रेटर सूंदा व लेसर सूंदा अशा दोन भागांत या बेटांची विभागणी केलेली आहे.

ग्रेटर सूंदामध्ये सुमात्रा, जावा, बोर्निओ, सेलेबीझ व त्यालगतची काही लहान बेटे यांचा समावेश होतो, तर लेसर सूंदामध्ये बाली, लाँबॉक, सूंबावा, सूंबा, फ्लोरेस, तिमोर, आलोर व त्यालगतची काही लहान बेटे यांचा समावेश होतो.

लेसर सूंदा बेटांना १९५४ पासून नुसा तेंगारा असे म्हणतात. भूगर्भशास्त्रीय दृष्ट्या बोर्निओ, पूर्व सुमात्रा व त्यालगतचा काही भाग वगळता सूंदा बेटांचा अन्य भाग अस्थिर आहे.

बोर्निओ बेटातील उत्तरेकडील सारावाक व साबा हे भाग मलेशियाचे, तर ब्रूनाई हा पूर्वाश्रमीचा ब्रिटिशांकित प्रांत असून तो १९८४ मध्ये स्वतंत्र, स्वायत्त देश झाला. त्या बेटाचा दक्षिणेकडील भाग व अन्य बेटे इंडोनेशियाच्या आधिपत्याखाली आहेत. या प्रदेशात मलेशियन संस्कृती व मलेशियन भाषेचा पगडा आहे.

 

पहा : इंडोनेशिया; मलेशिया.

निगडे, रेखा

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/31/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate