অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

वर्धा जिल्हा

बेरार

वर्धा जिल्ह्याच्या इतिहासाबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे. पण वर्धा नदीचा उल्लेख ई.पु. २ शताब्दी मध्ये आढळतो. विदर्भाचा राजा बेरार च्या संबंधाने वर्धा नदीचा उल्लेख आढळतो. विदर्भ (बेरार) प्रदेश हा वर्धा नदीने विभागल्या जाऊन बेरार आणि त्याचा भाऊ माधवनसेना यांच्यात वाटला गेला.

चालुक्य आणि राधात्रकुट राजा

वर्धा आणि उर्वरित बेरार प्रांतात चालुक्य राजपूत घराण्याने ई.स. ५५० ते ७५० मध्ये राज्य केले. त्याची राजधानी आधुनिक बिजापूर येथे होती व नंतर ती नाशिक ला हलविण्यात आली.
या राजघराण्याशी सबंधित ताम्र पत्रे बैतुल जिल्ह्याच्या मुलताई आणि वर्धा जिल्ह्याच्या देवळी येथे सापडली. देवळी येथे सापडलेली पत्रे ई. ९४० ची असून त्यात नागापूर-नंदिवार्धाम जिल्ह्यातील तलपुरुम्शक हे गाव काणारेसे ब्राह्मणाला दान केल्याचा उल्लेख आहे.

बहमनी साम्राज्य

वर्धा तदनंतर सोलापु आणि बिदर जवळील गुल बर्ग च्या राजाच्या प्रांतात सामील करण्यात आला. या राजाने मुहम्मद तुघलक शी बंडखोरी केलेली होती आणि तो एक ब्राम्हण किवा ब्राम्हण सेवक होता. सर ए. लिअल म्हणतात "बेरार चे बहमनी साम्राज्य सातपुडा ते दक्षिणेकडे गोदावरी पर्यंत आणि खानदेश व दौलताबाद ते पूर्वेकडे गोदावरी पर्यंत पसरलेले होते.

इमाद शाही राजवंश

इ.स. 1437 मध्ये गुजरातच्या राजानी बेरार वर आक्रमण केल्याचा प्रारंभिक उल्लेख आहे ज्यात गोंडवाना च्या राजाने (वर्धा ओलांडून) मदद केली व तो चांदा येथील होता. इ.स. 1518 मध्ये बहमनी साम्राज्याच्या पतनानंतर काही काळ बेरार वर इमाद शाही राजपुत्राने इल्लीचपुर येथून राज्य केले.

मुघल साम्राज्य

नव्वद वर्षांच्या स्वतंत्र अस्तित्व नंतर 1572 मध्ये अहमदनगर राजानी इल्लीचपुर साम्राज्य नष्ट केले आणि १५९४ मध्ये बेरार अहमदनगर पासून सम्राट अकबर च्या साम्राज्याला जोडण्यात आले.

मराठा स्वारी

1822 मध्ये भोसल्याद्वारे वर्धा नागपूर मध्ये समाविष्ट करण्यात आला त्याचबरोबर गवळीगड आणि नरनाळा हे किल्ले व काही भूभाग निझामच्या ताब्यात देण्यात आला.

जिल्हा निर्मिती

ब्रिटीश्‍शांच्या काळात 1862 पर्यंत वर्धा हा नागपूरचाच एक भाग होता.प्रशासकिय कारणाने वर्धा वेगळा करण्यात आला. पुलगाव जवळील कवठा येथे जिल्हा मुख्यालय उभारण्यात आले पण नंतर 1866 मध्ये वर्धा हे पालकवाडी जवळ वसविण्यात आले. जिल्हयाला वर्धा हे नाव वर्धा नदीवरुन देण्यात आले.

 

भौगोलिक स्थान

वर्धा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या उत्तर पूर्व बाजूस स्थीत आहे. 1962 पर्यंत जिल्हा नागपूर जिल्ह्यातील भाग होता; कालांतराने तो एक स्वतंत्र जिल्हा करण्यात आला.

Wardha district lies between 20o18’ North and 21o21’ North latitudes and 78o4’ East to 79o15’ east longitudes.

वर्धा जिल्ह्याच्या पश्चिम आणि उत्तर कडे अमरावती जिल्ह्या आहे तर दक्षिणेकडे यवतमाळ जिल्हा आहे, दक्षिण पूर्वेकडे चंद्रपूर जिल्हा असून पूर्वेकडे नागपूर जिल्हा आहे. अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यासोबतच्या सीमारेषा वर्धा नदी ठरवते.

क्षेत्र आणि प्रशासकीय विभाग

वर्धा जिल्ह्या नागपूर महसूल विभागातील एक भाग आहे. भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आणि नागपूर इत्यादी जिल्हे नागपूर महसूल विभागात समाविष्ट आहे.

जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्राच्या 2% आहे जे 6309 चौ किमी, क्षेत्र समाविष्टीत आहे.

प्रशासकीय सोयीसाठी वर्धा जिल्हा तीन उप विभागात विभाजीत पोट केले गेले. प्रत्येक उपविभागात २ ते ३ तहसील आहेत.

उप विभागाचे नावसमाविष्ट तहसील
वर्धा वर्धा, सेलु, देवळी
हिंगणघाट हिंगणघाट, समुद्रपूर
आर्वी आर्वी, आष्टी, कारंजा
स्त्रोत : वर्धा जिल्हा

 

अंतिम सुधारित : 6/25/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate