অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मलखांबची जन्मभूमी कोठुरे

मलखांबची जन्मभूमी कोठुरे

वेशीवरच्या पाऊलखुणा : मलखांबची जन्मभूमी कोठुरे

इतिहासाच्या अनेक घडामोडी अन्‌पाऊलखुणांनी सजलेले गाव आपल्याआजूबाजूला असूनही, आपण अनेकदात्यापासून अनभिज्ञ असतो. तेथील मोठालेवाडे, बांधणीच्या बारवा, दगडातीलनदीकाठची सुंदर मंदिरे, वीरगळ अन्असंख्य ऐतिहासिक आठवणींनी निफाडतालुक्यातील हे एक गाव सजले आहे.निजामशाहीशी कुरबुरी, पेशवाईचा थाट,स्वातंत्र्ययुद्धातील लढवय्यांची भूमी अन्‌पिळदार अंग बनवायला सज्ज असलेलामलखांबची जन्मभूमी म्हणजे कोठुरे गाव.कोठुरे भावते ते निसर्गरम्यतेने अन्‌ऐतिहासिक घडामोडींच्या आठवणीने. हीसफर अनोखीच नाही तर झुंजारही ठरते.

ऐतिहासिक पण, अज्ञात गावांचा शोधप्रवासाशिवाय सुरू होत नाही. तसाच प्रवासकोठुरेचाही आहे. कोठुरेला जायचे असेल तरऔरंगाबाद रस्त्याने नाशिक-सायखेडा २५किलोमीटर व सायखेडा-करंजगाव सातकिलोमीटर व करंजगाव-कोठुरे हे अंतर तसेगोदावरीवरील एक पूल ओलांडण्याइतकेचआहे. करंजगाव अन्‌ कोठुरेमध्ये गोदा वाहते.हा पूल ओलांडला की, आपण कोठुरेतपोहचतो. अन्यथा औरंगाबाद हायवेवरूननिफाडकडे निघाले की, पिंपळस गावापूर्वीडाव्या हाताला कोठुरेकडे जाण्यासाठीउजवीकडे वळण्याची पाटी दिसते. तेथूनपाच किलोमीटरवर कोठूरे गाव लागते.कोठुरे म्हणजे काय? याचा अर्थ उलगडतनाही. मात्र निजामाच्या मुस्लिम सरदाराच्यावतनदारीत हे गाव होते. तेव्हाही या गावाचेनाव कोठुरे असेच होते. गोदावरीरामकुंडानंतर कोठुरेत दक्षिण वाह‌िनी होत असल्याने कोठुरे हे पवित्र ठिकाण मानलेजाते.

कोकणातील गणपतीपुळे जवळील नेवरे गावचे वतनदार मल्हारराव बर्वे (म्हणजेबाजीराव पेशव्यांचे पणजोबा.) कुटुंबछत्रपती शिवाजींचे नातू छत्रपती शाहूंच्यामाध्यमातून सिन्नरला दाखल झाले. त्यांनाडुबेरे, पिंपळस, पांढुर्ली व कोठुरे ही गावेइनाम मिळाली. सरदार मल्हारराव बर्वेलढवय्ये असल्याने छत्रपती शाहूंनीदख्खनची सुभेदारी त्यांना सोपविली.बर्वेंकडून आपल्याला त्रास होऊ शकतो हेलक्षात घेऊन निजामाने मल्हारराव बर्वेंनाजहागिरी देऊ केली. निजामाने कोठुरेतूनआपल्या मुस्लिम वतनदाराला मागेबोलावले. तेव्हापासून कोठुरे बर्वेंकडे आले.मल्हाररावांना गोदाकाठी वसलेले कोठुरेविशेष भावले. त्यांनी कोठुरे गावचीपाटीलकी विकत घेतली व गावची मुकादमीहीबर्वेंकडे आली. मल्हाररावांनी गावातकोकणातून ७० कुटुंब येथे स्थायिक केली वपरिसरात हजार चिंचेची झाडे लावली. हीझाडे आजही इतिहासाची साक्ष देतात.दरम्यान, मल्हाररावांनी डुबेरेमध्ये वाडाबांधला अन्‌ कोठुरेमध्ये गोदाकाठच्याबाणेश्वर मंदिराचा जिर्णोद्धार करीत नदीवरघाट बांधला.

येथे प्रभू रामचंद्र आल्याचे ही म्हटले जाते. बाणेश्वर मंदिर शिव पंचायतन पद्धतीने बांधलेले आहे. आजूबाजूला अनेकलहान लहान मंदिरे आहेत. मंदिरासमोर योगीराज यशवंत महाराजांचे मंदिर आहे. तेथे तीन दगडी दीपमाळी आहेत. बाणेश्वरमंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव भरतो.मंदिरावरील शिलालेखावर मल्हारराव कदमअसे म्हटले आहे. मात्र ते मल्हारराव मुकादमाने असे लिहायचे असेल. त्यामुळेअनेकांना मल्हारराव कदम कोण असा प्रश्नपडतो मात्र ते कदम नसून, मल्हारराव बर्वेमुकादम असे आहे. मल्हाररावांना अंतोजी, राधाबाई व मल्हारबाबाजी ही तीन मुले झाली. राधाबाईंचा विवाह श्रीवर्धन गावातीलबाळाजी विश्वनाथ पेशवे यांच्याशी झाला.बाळाजीरावांना दोन मुलगे व दोन मुलीझाल्या. त्यातील मोठा बाजीराव, दुसराचिमाजी आप्पा. पहिले बाळंतपणासाठीराधाबाई डुबेरेत आल्या. त्यामुळे बाजीरावपेशव्यांचे जन्मगाव डुबेरे, अशी माहिती मल्हारराव बर्वेचे वंशज माधवराव दत्तात्रेय बर्वे यांनी दिली. कोठुरेला दोन वेशी होत्या.त्यातील उत्तर वेस म्हणजे दिल्ली वेस वदुसरी गंगा वेस. यातील गंगावेस अजूनहीअनुभवता येते. गंगावेशीला लागून भलामोठाकिल्ल्यासारखा बर्वे वाडा आहे. वेशीतूनआत गेल्यावर आणखी एक बर्वे वाडा आहे.हा बर्वे वाडा पूर्वी मल्हाररावांची कचेरी होती.तेथे मल्हाररावांचे सिंहासनही होते. वाड्याचे काम सुंदर अन् अनुभवण्यासारखे आहे.

कोठुरे आणखी एका ऐतिहासिक पाऊलखुणेचे साक्षीदार आहे. ते म्हणजेमलखांबचा शोध ज्यांनी लावला ते बाळभट्टजनार्दन देवधर कोठुरे गावचेच. जनार्दन देवधर हे बरव्यांच्या आश्रयाने रहात होते.१७९५-१७९६ च्या सुमारास जनार्दनपंतआपले चिरंजीव बाळंभट्ट (१७८० ते १८५२)यांच्यासह पुण्यास वस्तीस आले व पेशव्यांच्या आश्रयास राहिले. या काळात निजामाने विस्तारवादी धोरण स्वीकारले होते. याचात्रास मराठा साम्राजालाही आवाहन देत होता.असे म्हंटले जाते की, निजामाने ‘मराठासाम्राज्य ताब्यात द्या, अन्यथा आक्रमणस्वीकारा’ अशी चिथावणी दिली. आवाहनम्हणून ‘निजामाचे अली व गुलाब या मल्लांनाहरविल्यास मराठा साम्राज्याला हातलावणार नाही,’ अशी ग्वाही दिली. यावेळीपेशवे दरबारातील सर्व मल्लांनी अली वगुलाब विरोधात लढण्यास नकार दिल्याने पेशव्यांची इभ्रत पणालालागली. यावेळी पेशव्यांकडे भिक्षुकीकरणारा कोठुरेचा सतरा-अठरा वर्षाचाबाळंभट्ट देवधर यांने काही दिवसांची मुदतमागत हे आव्हान स्वीकारले.

बाळंभट्ट कोठुरेत आले. आईचा आशीर्वाद घेऊन ते वणीगडावरील सप्तशृंगी देवीच्या आराधनेसाठी गेले. यावेळी माकडांनीझाडाच्या फांदीभोवती केलेल्या कसरतीतूनबाळंभट्ट देवधरांना मलखांबाच्या कसरतीचेदेवीने वरदान दिले, अशी अख्यायिकासांगितली जाते. तेव्हा एक लाकडी खांबदेवीच्या डोंगराखाली लावून तेथे देवधरांनीशरीर बळकट केले. पेशवे दरबारात बाळभटदेवधरांनी स्वत:पेक्षा वयाने, अनुभवाने,वजनाने, मातब्बर असलेल्या अलीला गळखोड्याच्या डावांनी चीतपट केले. हाडाव पाहून निजामाचा गुलाब हा मल्ल भरदरबारातून पळाला. तेव्हापासून पेशव्यांनीभारतभर मलखांबाचा प्रसार केला. मात्र,कोठुरेत बाळंभट्ट देवधरांची ‘ना चीरा आहेना पणती.’ त्यांची तालीम; मात्र आजहीमलखांबपटू घडविण्यासाठी धडपडत आहे. दरवर्षी असंख्य विद्यार्थी येथे प्रशिक्षण घेतात, असे तालमीचे मलखांब प्रशिक्षकसुनील डोंगरे यांनी सांगितले. ज्या मातीत,ज्या नाशिकमध्ये मलखांबाचा शोध लागलातेथेच बाळंभट्ट देवधर दुर्लक्षित आहेत.गावातील ही तालीम भारतभरासाठी आदर्शतालीम व्हावी, यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा होण्याची गरज आहे.

सावरकरांच्या आई मनोहर आडनाव असलेल्या कुटुंबातील होत्या. सावरकरांच्या पत्नी चे मामा बरवे होते. कोठुरे स्वातंत्र्यचळवळीतील महत्त्वाचे केंद्रही होते. जॅक्सनच्या खुनानंतर कोठुरेत मोठीधरपकड झाली होती. जॅक्सनच्याखुनादरम्यान कोठुरेतील बर्वे वाडा बॉम्ब वशस्त्र बनविण्याचे ठिकाण होते. इंग्रज धाडटाकणार हे कळाल्यावर गावातील पंचमहाभूत विहिरीत पेटारे भरून शस्त्र टाकलीहोती. इंग्रजांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्नकेला; मात्र त्यांना ती सापडली नाहीत. याप्रकरणात ४५ लोकांवर खटला भरला वदोघांना शिक्षा झाली. दत्तात्रेय नरहर बर्वेयांना १८ महिने तुरूंगवास झाला. हरिजनसेवक संघाचे अध्यक्ष विनायक नरहर बर्वेकोठूरचेच, अशी माहिती माधवराव बर्वे वराजेंद्र डोखळे यांनी दिली.

स्वातंत्रचळवळींच्या आठवणींनीही कोठुरेशहारलेले आहे. मलखांब अन्‌ पेशवाईच्यापराक्रमांनी गजबजळेले कोठुरे विस्मृतीतजाणे कठीणच. पण, या आठवणींनापर्यटनाची जोड मिळाल्यास कोठुरेच्याऐतिहासिक पैलूंना जगण्याचे बळ मिळेल. बाळभट देवधरांची तालीम एक स्मारकम्हणून खेळाडूंसमोर उभे राहिले, तर यामातीत येऊन मलखांब शिकण्याची नवीउमेद खेळाडूंमध्ये निर्माण होईल अन्‌ कुठेतरीमलखांबच्या या जन्मभूमीला माहेर गवसेल.ही प्रतीक्षा कधी संपेल माहिती नाही. पण,कोठुरे अनुभवायला नक्की जा. कारण हीमलखांबची जन्मभूमी आहे, पेशव्यांचेआजोळ अन्‌ सावरकरांचे क्रांतीस्थळ आहे.

लेखक : रमेश पडवळ

अंतिम सुधारित : 7/28/2023



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate