অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

टिटवाळा - सिद्धिविनायक मंदिर

सिध्‍दी विनायक महागणपती

कल्याण-कसारा मार्गावर काळूनदीच्या काठावर असलेल्या टिटवाळा येथे श्री महागणपतीचे जागृत मंदिर आहे. चिमाजीअप्पा यांनी वसई येथे पोर्तुगिजांवर विजय मिळविल्यानंतर श्रीमहागणपतीचे हे मंदिर बांधले. महागणपती मंदिर व विठ्ठल मंदिर यामुळे माहात्म्य प्राप्त झालेले एक यात्रास्थान आहे. टिटवाळा येथील गणपती मंदिर हे महाराष्ट्रातील आठ प्रसिध्द गणपती मंदिरापैकी एक आहे. येथे पूर्वी कण्वऋषींचा आश्रम होता.

शकुंतलेने याच महागणपतीची पुजा केली असे सांगितले जाते आणि म्हणुनच या श्री महागणपतीस'विवाहविनायक' असे म्हटले जाते.

मंदिराचा जाण्‍याचा मार्ग

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्मिनस रेल्वे स्थानकावरून सूटणा-या कसारा, आसनगाव व टिटवाळा ह्या गाड्यांनी या प्रसिद्ध मंदिरात जाता येते. स्टेशनपासून हे गाव थोडे दूर आहे. तेथे बससेवा उपलब्ध आहे. सदरचे मंदिर टिटवाळा स्टेशनपासून 3 कि.मी. अंतरावर आहे. मंदिराकडे जाण्यासाठी स्टेशनपासून रिक्षा किंवा घोडागाडीचा उपयोग होतो.

स्त्रोत : http://www.thane.nic.in/htmldocs/m_place.html

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate