অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

चित्रांग भुंगेरा (ladybird beetle)

चित्रांग भुंगेरा (ladybird beetle)

कोलिऑप्टेरा गणाच्या कॉक्सिनिलिडी कुलात याचा समावेश होतो. यांच्या ३,००० पेक्षा जास्त जाती असून त्यांचा प्रसार विस्तृत आहे व जवळजवळ वर्षभर ते नेहमी पाहावयास मिळतात. ते अगदी लहान, वर्तुळाकार किंवा अंडाकार, अर्धगोलाकार, चमकदार व रंगाने काळे, पिवळे, तपकिरी, लाल व बहुधा ठिपकेदार असतात. मादी पानांवर पुंजक्या पुंजक्याने पिवळसर अंडी घालते. एक मादी सु. १४० अंडी घालते. ती उबून मऊ व निरनिराळ्या रंगांच्या अळ्या बाहेर पडतात. त्यांच्या शरीरावर निळे, काळे किंवा पिवळे ठिपके असतात. त्या मागील बाजूस निमुळत्या होत जातात. त्या सु. वीस दिवसांत चार वेळा कात टाकून पूर्ण वाढतात व झाडांच्या पानांवरच कोषावस्थेत जातात. कोष रंगीत असून पानांवर असतात.

भुंगेरे मानवाचे मित्र

● हे भुंगेरे व त्यांच्या अळ्या परभक्षक (अन्य प्राण्यावर उपजीविका करणारे) असून त्या मावा, पिठ्या ढेकून, खवले कीटक इ. मृदुकाय कीटक व त्यांची अंडी आणि पिकांना उपद्रवकारक कीटक खातात.

● खाचवाल्या खवले कीटकाच्या (पेरिसेरिया परचँसी ) नियंत्रणासाठी रोडोलिया कार्डिनॅलिस  ही परभक्षक जाती मुद्दाम भारतात आणली आहे.

● पिठ्या ढेकणाच्या नियंत्रणासाठी क्रिप्टोलीमस मॉट्रोसीएरी   ह्या परभक्षक जातीचा उपयोग करतात. अशा रीतीने हे भुंगेरे मानवाचे मित्र आहेत व त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त उत्पत्ती कशी होईल, याची काळजी घेतात.

उपद्रव

इपिलॅक्‌ना  वंशातील जातींचा बटाटा, वांगे, भोपळा इ. पिकांना उपद्रव होतो.

लेखक-रा. ना.पोखरकर

स्रोत- मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 5/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate