অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साप संबंधित माहिती

साप-प्राथमिक माहिती

पर्यावरणामध्ये प्रत्येक गोष्टीला वेगळे महत्व आहे.आणि या महत्वपूर्ण गोष्टीमधील साप हा सुद्धा महत्वाचा घटक आहे.

आता.साप हा प्रकार मानवाच्या मनात इतक्या खोलवर भिती निर्माण करून बसला आहे की,एखाद्या व्यक्तीला समजवणे फार कठीण होते.याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या पूर्वजांच्या काळात दवाखाने,हॉस्पीटल,डॉक्टर उपलब्ध नव्हते.जंगले मोठी व घनदाट होती.लोकवस्ती लहान व घरे साधी होती.रस्ते व पायवाटा तितक्याशा उपलब्ध नव्हत्या.यामुळे वन्यजीवांची प्रामुख्याने सापांच्या हालचाली जास्त होत होत्या.अशामुळे एखाद्या व्यक्तीला विषारी सर्पदंश झाला असावा.औषधोपचार उपलब्ध नसल्याने काही वेळात ती व्यक्ती मृत्यूमुखी पडली असावी.या घटनेमुळे तिथल्या लोकांमध्ये सापांविषयी भिती निर्माण झाली असावी व स्वतःचा जीव वाचवण्यासाठी आपल्या पूर्वजांनी दिसेल तो साप मारायला सुरूवात केली असावी.पुढे पिढ्यान्‌पिढ्या हि गोष्ट पसरत जाऊन संपूर्ण भारतभर अशा गोष्टींचा प्रसार झाला.

भारतामध्ये 278 जातीचे साप सापडतात.यापैकी फक्त 72 साप विषारी आहेत.महाराष्ट्रामध्ये 52 जातीचे साप सापडतात त्यापैकी फक्त 10 सापच विषारी आहेत.या 10 सापांपैकी मानवाचा फक्त 4 विषारी सापांसोबत सामना होतो.बाकीचे 6 साप दूर्मिळ असून त्यातील 2 साप महाराष्ट्राच्या समुद्रकिनारी तर 4 साप सह्याद्री पर्वतात सापडतात.पावसाळ्यामध्ये उंदिर,बेडूक,सरडे,पाली अशा प्राण्यांची संख्या व हालचाली वाढतात व हे प्राणी आपल्या घराजवळ येण्याची शक्यता असते.परिणामी साप या भक्ष्यावर आकर्षित होऊन आपल्या घरापर्यंत येतात.महाराष्ट्रामध्ये आढळणारे 52 जातीच्या सापांपैकी 42 साप बिनविषारी आहेत.या सापांमधील काही दुर्मिळ जातीचे साप जे दिसायला काहिसे विषारी सापांसारखे असतात.असे साप आपल्या घराजवळ येऊ शकतात.पण हे साप बिनविषारी असून या सापांपासून मानवाला काही अपाय नसतो.पण "सापांबद्दलची अनुवांशिक भिती,शास्त्रीय अज्ञान व माहितीचा अभाव" यामुळे लोक दिसेल तो साप मारून टाकतात.सापाला मारण्याची काहीच गरज नसते कारण साप कधीच मानवाला उगाच चावत नाही किंवा डूख धरत नाही किंवा मागावरही येत नाही.कारण सापांच्या मेंदूचा विकास झालेला नाही त्यामुळे त्यांच्या स्मरणात काहीच राहत नाही.सापांना आपली प्रतिमा कृष्णधवल दिसते.सापांना लांबी व रूंदी कळते.जाडी कळत नाही कारण,सापांची दृष्टी द्विमितीय असते.सापांना 6 फूटापलिकडे अंधूक दिसते त्यामुळे साप व्यक्ती ओळखू शकत नाही.यातही आता गावोगावी दवाखाने,हॉस्पीटल झाले आहेत.प्रत्येक गावांमध्ये सर्पमित्र तयार झाले आहेत.त्यामुळे सापांपासून घाबरण्याचे कारण राहिलेले नाही.सापांबद्दलची माहिती आता डॉक्युमेंटरी,पुस्तके,जनजागृती कार्यक्रम,बॅनर्स,पोस्टर्स द्वारे दिली जाते.यामुळे साप तितका भयावह प्राणी राहिलेला नाही.प्रत्येक माणसाने सापांना जाणून घेऊन त्यांची शास्त्रीय माहिती वाचली तर साप किती शांत व भित्रा प्राणी आहे हे लक्षात येते.

उपाय

साप आपल्या घराजवळ येऊ नये म्हणून काय कराल ?

  • घराजवळ पालापाचोळा साचू देऊ नका.भिंतीच्या भेगा व बिळे बुजवावीत.गोवय्रा व सरपणाची लाकडे घरापासून दूर व उंचावर ठेवावीत.
  • शेतात किंवा घराबाहेर झोपताना शक्यतो जमिनीवर झोपू नये.कॉटचा पलंगाचा वापर करावा.खरकटे व कचरा घरापासून लांब अंतरावर टाकावा.
  • पाळीव प्राणी,ससे,पोपट,कोंबड्या घरापासून दूर व उंचावर ठेवावेत.

साप-गैरसमज

मार्च,एप्रिल,मे या महिन्यांमध्ये रूका,नानेटी,धामण या सापांचा मिलनाचा काळ असतो तर धामणचे लढाईचे दृश्यहि सहज नजरेस पडतात.मार्चच्या शेवटच्या आठवड्यापासून ते (15/04/2014) पर्यंत मी लढाई करणारे 11 जोडपे दिवसा पकडले तर मिलन करणारा 1 जोडपा रात्री पकडला.यावरून असे लक्षात येते की,धामणची लढाई दिवसा होते तर मिलन रात्री होते हे गेल्या काही वर्षांच्या RECORD मुळे समजते.

पण नानेटी सापांबद्दल गंमत अशी वाटते की,ते लोकांच्या गैरसमजुतीला खरे उतरतात.कारण मार्च पासून एप्रिलच्या मध्यापर्यंत मला नानेटी सापाचे 9 कॉल असे होते ज्यात नानेटीचे मिलन सुरू होते पण 9 मधील 3 कॉल असे होते की मादीच्या मागावर येणाय्रा नरांची संख्या 6 होती आणि मादी धरून 7.लोकांना समजवणे आधीच कठीण असते त्यात 7 नानेटी किंवा रूका लोकांच्या नजरेस पडले कि त्यांना कितीही समजवा 'पालथ्या घड्यावर पाणी':-):-)

कारण

या काळात मादीच्या शरीरातून एक प्रकारचा द्रव निघत असतो.या द्रवाच्या वासावर नर आकर्षित होतात व मादी ज्या ठिकाणी जाईल तिच्यामागावर नर जातात.अशी मादी जर एखाद्या घराच्या आसपास पोहोचली तर तिच्यामागावर नर तिथपर्यंत पोहोचतात.हे साप लोकांच्या हालचाली पाहून जिथे जागा मिळेल तिथे लपतात.यातील एखादा नानेटी/रूका माणसाला दिसला कि माणूस त्याला ताबडतोब मारतो.सापांना कंपणे (Vibrations) पटकन जाणवत असल्याने माणूस ज्या सापाला मारत आहे त्यामुळे निर्माण होणारी कंपणे इतर ठिकाणी लपलेल्या सापांना जाणवतात व ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करतात.अशावेळी माणूस घाबरतो व जितके साप दिसतील तितक्या सापांना मारतो.यातून जर एखादा साप पळून गेला कि मग मारणारी व्यक्ती इतकी घाबरते की त्याला वाटते आता साप डूख धरणार,मागावर येणार यामुळे त्या परिसरात भयानक भिती पसरते.पण लोकांच्या लक्षात हे येत नाही की आधीच इतका शांत स्वभावाचा साप ज्याला त्रास झाला तरी चावत नाही त्यात तो बिनविषारी. ज्याप्रकारे आपण वाघासमोर जाणार नाही कारण वाघ आपल्यावर हल्ला करून आपल्याला मारू शकतो.त्याप्रमाणे एक साप मरत असताना दुसरा साप उगाच मरायला येईल का ? यावर एक प्रभावी उपाय आहे तो म्हणजे "कोणीही कोणत्याच सापाला मारू नये."

साप जतन

सापांबद्दलच्या अंधश्रद्धा,गैरसमज,शास्त्रीय माहितीचा अभाव,अज्ञान आणि भीतीमुळे सर्पहत्या होते.पण काही वेळेस सापाला इतक्या भयानक परिस्थीतीला सामोरे जावे लागते जी परिस्थीती मरणापेक्षा जास्त त्रासदायक असते.जर साप घरात,घराजवळील बिळात किंवा अशा काही ठिकाणी लपून राहतो ज्यातून मानव त्या सापाला बाहेर नाही काढू शकत.जर साप बाहेर नाही आला तर साप रात्री बाहेर पडेल आणि घरात घुसून दंश करेल,सापाने डूख धरले असेल म्हणून तो बाहेर पडत नाही,साप कुणाच्यातरी मागावर आला आहे त्यामुळे तो लपला आहे.असे विचार आणि गैरसमज मानवाच्या मनात येतात पण कोणी असे बोलत नाही की साप त्याचा जीव वाचवण्यासाठी लपला आहे.अशा परिस्थीतीमध्ये सापाला बाहेर काढण्यासाठी विविध उपाय योजले जातात.यामध्ये बिळ खोदणे,भिंती फोडणे,झाड तोडणे इ.पण असे करूनही साप बाहेर येत नसेल तर ज्या बिळात साप आहे त्या बिळात किंवा ज्या ठिकाणी साप असेल त्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर,फिनेल किंवा अशा काही केमिकल्सचा वापर केला जातो ज्यापासून सापांना त्रास होईल.पण यामुळे सापांना फक्त त्रास नाही तर REACTION,ALLERGY,OVERHEATING अशा गोष्टींना सामोरे जावे लागते.या केमिकल्सचा इतका वाईट परिणाम सापांना भोगावा लागतो ज्यामुळे साप जिवंत असूनही मरतो.इतक्या STRONG वासाच्या केमिकल्समुळे साप बेशुद्ध होणे,लकवा मारल्यासारखे हालचाली करणे,श्वास घेण्यास त्रास होत असल्याने जीव जाणे असे वाईट परिणाम सापांना भोगावे लागतात.यातून असे लक्षात येते की मानव सापांच्यामागे हात धुवून लागला आहे.मानवाने सापांना समजले पाहिजे.!त्यांच्याबद्दल विचार केला पाहिजे.!इतर प्राण्यांप्रमाणे सापांप्रति लोकांनी आपुलकी दाखवली पाहिजे.! सापांना वाचवणे खूप गरजेचे आहे.साप वाचला तरच माणूस वाचेल हे मानवाने लक्षात ठेवले पाहिजे.त्यामुळे जर कधी साप घरात घुसला तर त्यावर जीवघेण्या गोष्टींचा प्रयोग करण्याऐवजी त्याला घरातून सुरक्षितपणे कसे काढता येईल यावर भर दिला पाहिजे.किंवा वनविभाग,पोलिस किंवा सर्पमित्रांना कळवले पाहिजे.

'इतर जनावरांना औषध करता येते पण सापांवर नाही.'

इतर प्राण्यांसाठी DOCTOR'S,HOSPITAL'S,CLINIC'S आहेत पण यामध्ये सापांवर उपचार केले जात नाहीत.त्यामुळे सापाला उपचार करून वाचवणे शक्य असले तरी साप नाही वाचू शकत.यापेक्षा वाईट काय असू शकेल ?? यामुळे कृपया "साप वाचवा

माहिती संकलन - सदफ कडवेकर

अंतिम सुधारित : 7/26/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate