অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

समुद्रातील लाटा

समुद्राच्या पाण्यामधून वा त्याच्या पृष्ठभागावरून सरकत पुढे जाणाऱ्या क्षोभाला किंवा खळबळीला लाट म्हणतात. मुख्यत्वे समुद्रावरून वाहणाऱ्या वाऱ्या मुळे जागच्या जागी होणाऱ्या या आंदोलनामुळे पाण्याचा पृष्ठभाग उंचसखल दिसतो. लाटेने तिचा आकार (अनियमित उंचवटे व खळगे) पुढे गेलेला दिसतो. तथाति यामध्ये पाण्याची वाहतूक जवळजवळ होत नाही. वाऱ्याचा वेग,  तो वाहण्याचा कालावधी,  त्याच्या प्रभावक्षेत्राची वा त्याने कापलेल्या अंतराची लांबी आणि पाण्याची खोली यांच्यावर लाटांची गुणवैशिष्ट्ये अवलंबून असतात. वारा थांबल्यावर मागे राहणाऱ्या लाटांना ‘ मृत लाटा ’  म्हणतात.

वाऱ्याच्या प्रभावाने लाटांची संख्या व आका रमान वाढते आणि समुद्रपृष्ठाला अतिशय अनियमित स्वरूप येते, तेव्हा त्याला तरंगाकुल समुद्र म्हणतात. वाऱ्याच्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पडलेली लाट पुढे जाते तेव्हा तिला महातरंग अथवा दीर्घतरंग म्हणतात. दीर्घ अंतर कापल्यावर तिच्यापासून लांब,  कमी उंचीच्या व पुष्कळशा नियमित आंदोलनांची मालिका निर्माण होते. पृष्ठभागी नव्याने निर्माण होणाऱ्या आखूड,  अनियमित लाटांनी ही मालिका झाकली जाऊ शकते. उथळ पाण्यात आल्यावर या मालिकेतील प्रत्येक रंगाचे शीर्ष ( शृंग ) पाण्याच्या पातळीच्या वरचे वर येऊन अरूंद व उभट होत जाते आणि अखेरीस कोसळून ते फुटते. यामुळे फेसाळ,  पांढरे तरंग वा फेनिल लाटा निर्माण होताता. अशा तऱ्हेने तरंगाकुल समुद्र,  महातरंग व फेनिल लाटा ही लाट आविष्काराच्या विविध टप्प्यांना दिलेली नावे आहेत.

लाटेच्या सर्वांत उंच भागला तरंगशीर्ष किंवा शीर्ष व सर्वात खोल भागाला तरंगपात ( गर्त ) म्हणतात. या दोन्हीमधील उभ्या दिशेतील अंतराला लाटेची उंची, तर लागोपाठच्या दोन तरंगशीर्षामधील (वा तरंगपादामधील) अंतराला लाटेची लांबी वातरंगलांबी म्हणतात. अनियमित लाटांच्या बाबतीत वैशिष्ट्यदर्शक उंचीला सार्थ उंची म्हणतात. एखाद्या विशिष्ट बिंदूकडून चांगली विकसित झालेली लागोपाठची देन शीर्षे जाण्यास लागणाऱ्या कालावणीला लाटेचा आर्वतकाल म्हणतात. ठराविक ( उदा. सेकंदात ) एखाद्या बिंदूसमोरून जाणाऱ्या शीर्षाची संख्या म्हणजे लाटेची वारंवारता ( कंप्रता ) होय आणि ठराविक वेळात विशिष्ट शीर्ष जेवढे पुढे जाते तो लाटेचा वेग होय.

इतिहास

वाऱ्याने निर्माण होणाऱ्या लाटांचे निरीक्षण हजारो वर्षापासून करण्यात येत असले,  तरी अद्यापि लाटांविषयी पूर्ण माहिती झालेली नाही व अजून पुष्कळ मुलभूत प्रश्नांची उकल व्हावयाची आहे. उदा.अनियमित लाटा असलेल्या समुद्रपृष्ठाची हालचाल दर्शविणारी नेमकी समीकरणे अजून मांडता आलेली नाही. लाटांचे निरीक्षण दर्यावर्दी व गणितीय दृष्टीको णां तून करण्यात येते; मात्र हे निरीक्षक परस्परांच्या निष्कर्षांचा एकत्रितपणे विचार करीत नाहीत.(उदा. तरंगगती हे गणिताच्या दृष्टीने आकर्षक अध्ययन क्षेत्र असले,  तरी यातील निष्कर्ष प्रत्यक्ष लाटांच्या अभ्यासासाठी वापरण्याची दक्षता घेण्यात आली नाही. उलट दर्यावर्दी निरीक्षकांना लाटांविषयी विलक्षण कुतूहल असले, तरी गणितीय संशोधनातून उपलब्ध झालेल्या सुविधा साधने त्यांना वापरता आली नाही त वा ती वापरण्याची त्यांची इच्छा नव्हती).

सर्वप्रथम लिओनार्दो दा व्हींची यांनी लाटांची काळजीपूर्वक निरीक्षणे केली. शेतातील गव्हाच्या लोंब्याप्रमाणे लाटा जागच्या जागी हलतात, असे त्यांनी दाखवून दिले होते. तरंगगतीचे पद्धतशीर अध्ययन प्रथम आयझॅक न्यूटन यांनी केले. व त्याला एकोणिसाव्या शतकात भक्कम गणितीय आधार मिळाला. याकरिता जी. जी . स्टोक्स ( १८४७ ),  जे . वाउझिनेस्क ( १८७२ ), वलॉर्ड रॅली ( १८७६ ) यांची मदत झाली.  टाकीमधील लाटांचे अध्ययन प्रथम वेवर बंधूनी केले, तर लाटाविषयींच्या अध्ययनाचा आपला अहवाल जे. कॉट रसेल यांनी १८४४ साली सादर केला. यांचा नंतरच्या संशोधनावर चांगलाच प्रभाव पडला आहे. टी. स्टीव्हनसन ( १८५० ),  ए .पॅरीस ( १८७१ ),  जी. शॉट ( १८९३ ),  ए. शुमेकर ( १९२८ ),  व्ही. कॉर्निश  ( १९३४ ) यांनी लाटांचा निरीक्षणा त्मक अभ्यास केला;  तर अभियांत्रिकी य सं रचनां वर लाटांच्या होणा ऱ्या परिणामां विषयीचे संशोधन डी . डी . गेलार्ड ( १९०४ ) यांनी केले. हॅ रल्ड जेफ्रीज यांनी लाटांविषयींच्या निरीक्षणात्मक व सैद्धांतिक अभ्यासात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. यां शिवाय जी. ई. आर्. डीकन, एन् . एफ्. बार्बर,  एम्. एस्. लॉंगेट -हिगिन्झ ,  एफ्. अर्सेल ( १९४६-४८ ), विलार्ड एफ्.  पीअर्सन ( १९५०-५२ ),  कार्ल एकर्ट ( १९५३ ), एल् .जे. टिक, एम्. एस्. चँग,  ओ.एम् .फिलिप्स आणि के. हासेलमान यांनी लाटा व त्यांचे गुणधर्म यां विषयी संशोधन केले. तसेच फिलिप्स व जे. डब्ल्यु. माइल्स यांनी लाटा निर्मितीमागील भौमिकीय प्रक्रियेचे सैद्धांतिक अध्ययन केले.

निर्मितीप्रक्रिया

संथ पाण्यावर मंद वारा वाहू लागला की,  वीची किंवा केशाम तरंग निर्माण होतात. या लाटांची तरंगलांबी काही मि मी. ते १ सेमीं. दरम्यान असते व कमी तरंगलांबीच्या लाटा अधिक जलदपणे पुढे जातात. वी चीं वर पाण्याच्या पृष्ठताताणाचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे वारा थांबल्यावर त्या अल्पकाळच टिकतात. अधिक जोराचा वारा काही काह वाहात राहिल्यास लाटा मोठ्या होत जाऊन दीर्घतर लाटा गुरूत्वीय लाटा निर्माण होतात. ही क्रिया पुरेशी वाढल्यावर सर्व प्रकारच्या म्हणजे विविध आवर्तकाळ,  तरंगलांबी व उंची असणाऱ्या लाटांचे मिश्रण होते. वाऱ्याचा वेग वाढताना आधीच्या लाटा नसल्यास ही स्थिती निर्माण होण्यास दीर्ध काळ लागतो. उलट आधीच्या लाटा असताना वाऱ्याचा वेग वाढला की ही स्थिती यायला कमी वेळ लागतो. दीर्घ गुरूत्वीय लाटांवर वीची वाहून नेल्या जातात. या लाटांच्या पुढील पृष्ठावर त्या एकवटलेल्या असतात. गुरूत्वीय लाटांची अखंड वाढ होण्याच्या दृष्टीने वीची महत्वाच्या असून त्यांच्यामुळे गुरूत्वीय लाटांमध्ये ऊर्जा मोठ्या प्रमाणात साचते. वादळानंतर लाटा पांगतात. ८ ते १० सेकंद एवढ्या जास्त आवर्तकालाच्या लाटा अंतर्गत घर्षणाने संदमित होतात. दीर्घतर लाटा सर्वात जोरदार वाऱ्याने निर्माण होतात. त्या जरी नंतर निर्माण झाल्या, तरी किनाऱ्या वर आधी पोहोचतात. कारण दीर्घतर लाटा अधिक जलदपणे पुढे जातात. लाट पुढे जाण्याचा वेग खोलीनुसारही वाढतो .

लाटेमुळे पाणी जागच्या जागी खालीवर होत असते व ति चा आकार तेवढा पुढे जातो. लाटेमुळे पाण्याची वाहतूक जवळजवळ होत नाही. म्हणजे लाटेच्या वेगाच्या १ टक्क्यापर्यंत एवढी क्षुल्लक हालचाल होऊ शकते. लाटेतील पाण्याचे कण वा तरंगणारी वस्तू तिच्या उंचीइतक्या व्यासाच्या उभ्या वर्तुळात वा कक्षेत फिरत असतात. लाटेच्या आवर्तकालात वस्तू ची एक फेरी पूर्ण होते.  पृष्ठभागी हे वर्तुह वा कक्षा सर्वात मोठी असून पाण्याखाली ती कमी होत जाऊन  १ /२  तरंगलांबी एवढ्या खोलीवर ती शून्य होते. दीर्घ व लहान लाटेत ते शीर्षाबरोबर पुढे जातात व गतीबरोबर मूळ ठिकाणी परत येतात. उंच लाटेतील कणांचा मार्ग मात्र पूर्ण वर्तुळाकार नसतो. ते गतीपेक्षा शीर्षावर अधिक वेगवान असतात. प्रत्येक लाटेबरोबर कण थोडेथोडे पुढे जाऊन पृष्ठभागी मंद प्रवाह निर्माण होतो आणि अनुकूल परिस्थितीत त्यामुळे किनाऱ्या वरील पाण्याची पातळी वाढते. अशा प्रकारे पाण्यात तरंगणाऱ्या वस्तू  लाटेने किनाऱ्या कडे ढकलल्या जातात.

वाऱ्याची ऊर्जा लाटेला नेमक्या कोणत्या यंत्रनेने मिळते,  हे पूर्णपणे कळलेले नाही. वाऱ्याच्या ओढीने वातावरणातील गतिज ऊर्जेचा काही भाग लाटेच्या ऊर्जेत परिवर्तित होतो. लाटेच्या पुढील व मागील पृष्ठांवरील दाबांमधील फरकाने लाटा निर्माण होत असाव्यात. लाटेचे शीर्ष पुढे जाऊन लाट फुटताना लाटेतील ऊर्जा अधिक प्रमाणात बाहेर पडते. बुडबुड्यांचे वा फेसाचे भर समुद्रातील पट्टे हे या उर्जेचे निदर्शक होत.

प्रकार

लाटा विविध प्रकारच्या असून येथे मुख्यत्वे गुरूत्वाने स्थिर होणाऱ्या लाटांची माहिती दिली आहे .  यांचे पृष्ठीय व अंतर्गत लाटा हे मुख्य प्रकार असून त्यांचे पुढे जाणाऱ्या ( प्रगतनशील ) व स्थिर लाटा असे उपप्रकार करतात. वाऱ्याने निर्माण होणा ऱ्या लाटा व महातरंग,  वाऱ्याने निर्माण होणाऱ्या महालाटा  ( सर्ज ),  भूकंपीय लाटा व त्सुनामी हे पृष्ठीय लाटांचे प्रकार असून याशिवाय अंतर्गत,  स्थिर,  भरती - ओहोटी व उथळ पाण्यातील इतर प्रकार यांची माहिती पुढे दिली आहे.  वाऱ्याने निर्माण होणाऱ्या लाटा व महातरंग: दोन्ही प्रकार वाऱ्याने निर्माण होऊन नंतर वाऱ्याने शक्तिशाली होतात .  त्यांचे नियमन वाऱ्याने होते. वारा मंद झाला,  अन्य क्षेत्रात गेला वा लाटाच वाऱ्या च्या प्रभावक्षेत्रातून बाहेर पडल्या की,  हे महातरंग स्वतंत्रपणे पुढे जातात.

वाऱ्याने निर्माण होणा ऱ्या लाटांचे स्वरूप अनियमित असून तत्वत: त्यांना संयुक्त वा संमिश्र लाटा म्हणता येईल. कारण त्यांच्यात विविध तरंगलांबीच्या व आवर्तकालांच्या लाटा असून पुढे जाण्याच्या त्यांच्या दिशाही भिन्न असतात. मात्र नोंदणी व भाकीत करताना लाटांचा एक प्रातिनिधिक आवर्तकाल व उंची दर्शवितात.

लाटेचे आकारमान वाऱ्याच्या तीव्रतेवर अवलंबून असते व दोन्हींमधील परस्परसंबंध अतिशय गुंतागुंतीचे असतात. हे संबंध बोफर्ट माप प्रमाणाव्दारे दर्शविले जातात.  वाऱ्याचा वेग,  वाहण्याचा कालावधी व त्याने समुद्रावर कापलेले अंतर ( प्रभावक्षेत्र ) यांच्यावर लाटेचे आकारमान अवलंबून असते. यांच्यात वाढ झाली की , लाटेची उंची वाढते. उंचीबरोबर निष्पन्न ( फलित ) तरंगलांबी वाढते.  मात्र कमाल उंचीनंतर वऱ्याचा कालावधी व त्याने कापलेले अंतर यांत वाढ झाली तरी उंची वाढत नाही. याशिवाय वेलीय प्रवाहांनी लाटांत लक्षणीय बदल होऊ शकतात. तसेच वर्ष ण आणि मध्यम व उच्च अंक्षाशाच्या प्रदेशातील तापमान यांचाही लाटांवर परिणाम होतो.

महातरंग हजारो किमी. पर्यंत जाऊ शकतात. विशेषतः मध्यम व उच्च अक्षांशांच्या प्रदेशातील मोठ्या वादळाने उद्भवलेले दीर्घतरंग उपोष्ण कटिबंधापर्यंत, तर व्यापारी वाऱ्यांनी निर्माण होणारे दीर्घतरंग विषुवृत्तीय पट्ट्यापर्यंत जातात. यांच्यात स्थानिक लाटाही मिसळल्या जातात. महातरंगांचा वेग तरंगलांबीनुसार ठरतो व त्यांची उंची हळूहळू कमी होत जाते. ( सु . १,५०० किमी. अंतरानंतर उंची निम्मी होते.) महातरंग मूळ लाटांहून अधिक लांब,  गोलसर व नियमित असतात उलट्या वाऱ्याने त्यांचा जलदपणे ऱ्हा स होतो. तसेच अंतर्गत घर्षण,  हवेचा रोध व प्रसरणाच्या दिशेतील बदल यांच्यामुळे त्यातील ऊर्जा घटते. अशाप्रकारे जुना महातरंग अधिक लांब असतो. अर्थात महातरंगांची दीक्स्थि ती क्वचित व सावकाश बदलते. म्हणून त्यांची उंची व दिक्स्थि ती यांवरून महातरंगास कारणीभूत असणाऱ्या वादळाचे केंद्र ठरविता येते. त्यामुळे हवामानाच्या निरीक्षणां त महातरंगांचा अंतर्भाव करतात. समशीतोष्ण प्रदेशातील महासागरांच्या पूर्व किनाऱ्या वरील प्रचलित वारे पश्चिमेकडून येतात व तेथे लाटांचा विशेष परिणाम जाणवतो.  उदा. आफ्रिकेच्या वायव्य किनाऱ्यावर वरचेवर निर्माण होणारे फेनिल तरंग हे न्यू फाउंडलंड बेटांच्या भागात काही दिवस आधी वादळाने निर्माण झालेल्या ३ मी. उंच महातरंगांनी निर्माण होतात.

उथळ पाण्यात शिरताना महातरंगांची लांबी व वेग घटतो;  पण आवर्तकाल तोच रहातो. परिणामी त्याची उंची वाढते. अखेरच्या टप्प्यात याचा आकार बदलतो. याचे शीर्ष अधिक निरूंद व उभट होत जाऊन शेवटी त्यापासून किनारीभागातील भंगतरंग वा फेनिल तरंग निर्माण होतो. लाटेच्या उंचीच्या १ /३  एवढ्या पाण्यात असे घडते. पाण्याची खोली तिच्या उंचीएवढी झाल्यावर तिचा  खालचा भाग समुद्रतळाला टेकून त्याची गती थांबते. मात्र तिचे शीर्ष पुढेपुढे जाते. आणि खालचा आधार नाहीसा झाल्याने ते कोसळते व फेनिल तरंग किनाऱ्या कडे जाऊ लागतो. यालाच लाट फुटणे असे म्हणतात. यामुळेच मोठ्या वस्तूही उंच फेकल्या जातात. कारण दीर्घ अंतर पार करताना साचलेली ऊर्जा फेनिल तरंगाच्या निरूंद भागात एकवटलेली असते. नंतर पाणी किनाऱ्या कडे जाते व गुरुत्वाकर्षणाने परत मागे येते. लाटा किनाऱ्याला तिरप्या दिशेने येऊन आदळल्यास त्या हळू हळू किनाऱ्याशी समांतर होत जातात. अन्य महासागरांत आणि कोठेना कोठे वारे वहात असतात. त्यामुळे समुद्रात प्रत्येक भागात किंवा त्याच्यासमोरील किनाऱ्यावर महातरंगयुक्त लाटा नेहमीच असतात. परिणामी महातरंग शांत हवामानाच्या वेळी समुद्रात असणाऱ्या नेहमीच्या लाटांप्रमाणे दिसतात.

महालाटेला ( सर्ज ) मोठी वा दिर्घ उसळी लाट असेही म्हणतात. वारा किंवा दाबक्षेत्र यांमुळे पाण्याचे मोठे क्षेत्र फुगीर होते व ही लाट निर्माण होते.  उदा. उष्ण कटिबंधीय चक्रवाताबरोबर पुढे जाणारी विनाशकाली महालाट.  हरिकेन व टायफून या जबरदस्त वादळांशी निगडित असलेल्या महालाटांनी प्रचंड हानी होते.

अंतर्गत लाट

गुरुत्वामुळे पृष्ठभागावरील लाटा पूर्वस्थितीवर येण्यास मदत होत असते. कारण पाणी व हवा यांच्या मधील आंतरपृष्ठाच्या हालचालीला गुरुत्वाने विरोध होत असतो. घनतेनुसार पाण्याचे थर निर्माण झालेले असल्यास घनता स्थिर असणाऱ्या आंतरपृष्ठालाही गुरुत्वाचा असा विरोध होतो. या पुनःस्थापक यंत्रणेमुळे पाण्याच्या आत क्षोभ वा हालचाल उत्पन्न होऊन लाट पुढे नेली जाते. या क्षोभाला अंतर्गत गुरुत्वीय लाट वा सीमावर्ती लाट म्हणतात. घनतेनुसार पाण्याचे थर निर्माण झालेल्या ठिकाणी व खोलीनुसार घनता एकसारखी वाढत जाते. अशा ठिकाणी अंतर्गत लाटा आढळतात.  भर महासागराप्रमाणे जेथे पाण्याचे स्पष्ट थर बनलेले आहेत अशा किनारी भागां तही त्या आढळतात. पाण्याचा वरचा थर उथळ, मचूळ असल्यास जहाजामुळेही कधी कधी अशा लाटा निर्माण होतात.

गरम व मचूळ अशा हलक्या आणि थंड व जादा खारट अशा जड पाण्याच्या थरांच्या सीमेवर आढळणाऱ्या अंतर्गत लाटांमुळे ही सीमा १५ मी . पर्यंत सरकू शकते. त्यांचा वेग सु. २ नॉट ( क्वचित अधिक) असून यांची कमाल ऊर्जा पृष्ठभागापासून काही खोलीवर असते. हलके व जड पाणी विभागणाऱ्या आंतरपृष्ठाने ही लाट पुढे जाते. या लाटा ज्या थराभोवती एकवटलेल्या  असतात,  तो थर खालीवर होऊन लाट प्रकट होते. परीणामी यांच्यामुळे समुद्रपृष्ठाच्या उंचीत क्वचितच बदल होतो व त्या पृष्ठभागी दिसत नाहीत. पृष्ठीय लाटांहून या कमी गतिमान असून दोन्हींची एकच तरंगलांबी घेतल्यास अंतर्गत लाटेचा आवर्तकाल दीर्घ व प्रसारणाचा वेग कमी असतो.

अंतर्गत लाटा ओळखण्यासाठी विविध संवेदक साधने वापरतात. यासाठी घनता,  तापमान अथवा प्रवाहसंवेदक साधने वापरतात. सामान्यतः पाण्याचे तापमान खोलीनुसार घटते व घनता वाढते. अंतर्गत लाटांमुळे या परिस्थितीत बदल होतो व तोच अशा साधनांनी लक्षात येतो.

पूर्वी बऱ्याच लोकांनी समुद्रातील काही भागांचे वर्णन ‘ मृत पाणी ’  असे केलेले आढळते. या भागात सागरी दैत्य जहाज रोखून धरतो,  अशी त्यावेळी दर्यावर्दी लोकांची समजूत होती. कारण अशा ठिकाणी जहाज थांबवून धरल्यासारखे भासते वा त्याचा वेग घटून ते थोडेच पुढे जाते. उदा.  अशा प्रकारे एकदा जहाजाचा वेग ५  वरून १ नॉट इतका कमी झाल्याचे आढळले होते. विशेषे करून आर्क्टिक महासागरात हा अनुभव येतो. तेथे बर्फ वितळून जवळजवळ शुद्ध पाण्याचा जहाजाच्या डुबीएवढा जाड थर तयार होतो. या आणि खालील थरांमधील रोध,  तसेच समुद्रपृष्ठालगतचा हवा व पाणी यांच्या आंतरपृष्ठालगतचा नेहमीचा रोध पार करण्यात जहाजाची अधिक शक्ती खर्च होऊन ते रोखल्यासारखे वा थांबविले गेल्यासरखे वाटते.

भूकंपीय लाटा

पाण्याखालील किंवा किनारी भागातील भुकंप,  भूमीपात अथवा ज्वालामुखीचा उद्रेक यांमुळे समुद्रपृष्ठाचे विस्थापन होऊन या लाटा निर्माण होतात. यांना जपानी भागात ‘ त्सुनामी ’ ( बंदरातील लाट व क्षोम ) म्हणतात. या लाटांची तरंग लांबी प्रचंड ( १००-२०० मी.) आवर्तकाळ दीर्घ ( १०-३० मिनीटे )  व भर समुद्रातील वेग प्रचंड ( उदा. ४ हजार मी. खोलीवर सेकंदाला २०० मी. वा ताशी ७२० किमी.) असू शकतो. भर समुद्रात यांची उंची ३० ते ६० सेंमी. असून त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ही जात नाही. मात्र खंडीय निघायाजवळ येताना त्यांचा वेग घटला,  तरी उंची खूप वाढते. ( १५ ते ३५ मी.) परिणामी त्या अतिशय विध्वंसक होतात आणि किना ऱ्या वर लाटेच्या शीर्षाचा आघात होऊन प्रचंड प्रमाणात जीवित व वित्त हानी होते. विशेषत पॅसिफिक महासागरात निर्माण झालेल्या अशा लाटा तेथून हजारो किमी. दूर असलेल्या किनाऱ्यां वर जाऊन आदळतात. म्हणून त्यांची पूर्वसूचना देणारी यंत्रणा पॅसिफिकमध्ये उभारली आहे. अशा तऱ्हेने त्या केवळ महासागरच पार करीत नाहीत,  तर कधीकधी संपूर्ण पृथ्वीलाही वळसा घालतात. समुद्रतळावरील भूकंपाने सेकंदाला १५०० मी. आघात तरंग निर्माण होऊ शकतात व त्यांच्या आघाताने जहाज खडकावर आपटते की काय,  असे वाटते.

स्थिर लाटा

बंदिस्त अथवा जवळजवळ बंदिस्त जलराशीत ( उदा.  उपसागर,  बंदर,  सरोवर )  संपूर्ण जलराशी हेलकावते व या मुक्त आंदोलनाला  स्थिर वा अप्रगमनशील लाट म्हणतात या लाटेचा सखोल अभ्यास प्रथम जिनीव्हा सरोवरातील पाण्याच्या आंदोलनाच्या अभ्यासाच्या वेही करण्यात आला होता व तेव्हा या लाटेचे नामकरण ‘ सेश ’  असे करण्यात आले होते. मोठ्या उथळ पात्रातील पाणी जसे डचमळते तशी ही हालचाल आहे. जलराशीचा समतोल ज्याप्रेरणेने ढळतो,  तिच्यावर हिचा आवर्तकाळ अवलंबून असतो. आंदोलनाचा कालावधी काही मिनिटे ते तास असून तो मुख्यत्वे जलराशीच्या आकारमानावर अवलंबून असतो.

उघडा उपसागर व सीमावर्ती समुद्र येथील पाणीही मुक्त स्थिर लाटेप्रमाणे आंदोलू शकते. मात्र याबाबतीत पाण्याची सर्वाधिक आडवी हालचाल मध्यभागी न होता मुखाजवळ होते. तात्पुरता वारा व दाबक्षेत्र यांमुळे ही आंदोलने निर्माण होतात आणि त्यांच्यामुळे समुद्रपृष्ठ क्षैतिज पातळीबाहेर पडून अचानकपणे स्थिर होते. परीणामी जलराशी असंतुलित होते.

वेलीय लाटा

भरती -ओहोटी हाही गुरुत्वीय लाटेचा प्रकार असून या लाटा धावत्या,  स्थिर किंवा अंशतः  दोन्ही प्रकारच्या असतात. यांच्यामुळे समुद्रपृष्ठ उभ्या दिशेत खालीवर होते. या प्रेरीत प्रकारच्या लाटाही म्हणता येतील कारण त्यांचे आवर्तकाल ठराविक असून ते चंद्र, पृथ्वी व सूर्य यांच्या परस्परसापेक्ष गतीने ठरतात.

लाटांचे परीणाम

लाटा व किनारी प्रवाह हे झीज आणि भर यांचे महत्वाचे कारक आहेत. लाटारोधक तसेच बंदरातील व किनारी भागातील बांधकामे यांच्या दृष्टीनेही ते महत्वाचे ठरतात. कारण त्यांच्यामुळे किनाऱ्या चे स्वरूप एकसारखे बदलत असते व त्यामुळे अनेक भूमि रूपे,  संरचना ( तरंग चिन्हे ,  रोधक भित्ती )  निर्माण होतात. याबाबतीत वाऱ्याने व भरती - ओहोटीने निर्माण होणाऱ्या लाटा महत्वाच्या आहेत.  त्सुनामी लाटा कधीतरी निर्माण होत असल्याने त्यांच्या किनाऱ्याच्या जडणघडणीतील वाटा महत्वाचा नसतो;  पण त्यांच्यामुळे किनारी भाग पाण्याखाली जाऊन मोठी हानी होते. किनाऱ्याशी समांतर होत जाणाऱ्या लाटांनी प्रवाह निर्माण होतात व त्यांच्याद्वारेही झीज आणि भर होते जेथे लाटा फुटतात,  तेथे तळावर मोठी खळबळ होऊन फेनिल तरंगाबरोबर वाळू,  खडे,  दगडगोटे,  इ. पदार्थ किनाऱ्याकडे नेले जातात.  हे पदार्थ स्वत: झिजतात व किनाऱ्याचीही त्यांच्यामुळे झीज व भर होते.

लाटांची नोंदणी

दुसऱ्या महायुद्धापासून लाटांच्या अचूक व सलग नोंदी पुरेशा प्रमाणात ठेवण्यात येऊ लागल्या. त्यांच्यावरून लाटांची नेमकी माहिती मिळू शकते. लाटांची गुणवैशिष्ट्ये मोजून नोंदण्यासाठी दोन प्रकारची उपकरणे वापरतात. पहिल्या प्रकारात पृष्ठभागी वापरण्यायोग्य ( उदा.  लाटांची उंची मोजणारे )  व दुसऱ्या त पाण्याच्या आत वापरता येतील अशी ( उदा. ,  लाटांमुळे जलपृष्ठाखाली दाबात होणारे बदल नोंदणारे ) उपकरणे येतात. तीस मी . पेक्षा कमी खोल भागात संवेदनशील दाबमापक वापरतात. ते समुद्र तळावर ठेवलेले असून विजेच्या केबलद्वारे दाबां तील फरक किना ऱ्या वरच्या केंद्रात नोंदला जातो. या फरकां वरून लाटेची उंची ,  तरंग लांबी व पाण्याची खोली यां विषयी माहिती मिळते.  यासाठी प्रतिध्वनीमापक लाटा नोंदणी उपकरणेही वापरतात. लाटांची मापने घेण्यासाठी वोय ऱ्या च्या तळा शी लांब केबलने दाब नोंदणी उपकरण बांधून ते खोल पाण्यात लोंबकळत ठेवतात, तर वोयरे व जहाजे यांच्यावरही लाटांची नोंदणी पक्की करणारी साधने बसवलेली असतात.

लाटांचे पूर्वानुमान

दुसऱ्या  महायुद्धाच्या काळात लाटांचे लष्करी,  भूवैज्ञानिक आणि आभियांत्रिकीय महत्व लक्षात आले. त्यामुळे लाटांविषयीच्या पुर्वानुमानाचा अभ्यास करण्यात येऊ लागला. यातून लाटा,  महातरंग,  फेनिल तरंग,  त्सुनामी यांचया भाकितांची तंत्रे पुढे आली. मुख्यतः अनुभवां तून व उपकरणांद्वारे मिळालेली लाटांची माहिती यासाठी वापरतात. शिवाय वारे व लाटा यांच्यातील परस्पर - संबंधाविषयीची निश्चित सैध्दांतिक माहितीही लाटांच्या भाकितात उपयुक्त ठरते. यामध्ये मुख्यत्वे महासागरी हवामान - नकाशांची मदत घेतात. एच्. व्ही. स्व्हर्डुप व डब्ल्यु . एच्. मुंक यांनी केलेल्या संशोधनामुळे या नकाशां च्या आधारे लाटांची उंची आणि आवर्तकाळ यांविषयी आगाऊ अ नुमान करता येते. याचा दुसऱ्या महायुद्धात उपयोग करून घेण्यात आला होता. एखाद्या ठिकाणच्या लाटांच्या स्थितीविषयी अनुमान करण्यासाठी वाऱ्याची गती,  दिशा,  कालावधी व त्याची वाहण्याच्या दिशेतील लांबी ही माहिती भाकिताच्या दृष्टीने उपयुक्त असते. कारण या बाबी वाढल्या की,  लाटेची उंची वाढते. उलट वारा मंद होत जाताना लाटेची उंची कमी कशी होत जाईल,  याचाही अंदाज बांधता येतो. निर्मितीच्या ठिकाणातून लाट महातरंगाच्या रूपात कशी बाहेर पडेल याचे अनुमान करण्याचे प्रयत्नही चालू आहेत,  तर पॅसिफिक महासागरात त्सुनामी लाटांची पूर्वसूचना देण्यासाठी यंत्रणा उभारली आहे.

 

संदर्भ  :  1. Dietrich, G. Genera Oceanography, New York, 1973.

2. Gorsky, N.The Sea-Friend and Foe, Moscow, 1961.

3. Groves, D. G.; Hunt, L.M. The Ocean World Encyclopaedia, New York, 1980.

4. Knauss, J. A. Introduction to Physical Oceanography, Englewood Cliffs, N. J.1978.

5. Sverdrup. H. V.; Johnson, M. W.; Fleming, R.H.The Ocean, New York, 1962.

 

लेखक: अ. ना. ठाकूर

माहिती स्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 8/2/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate