অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कुजबुजणारे सज्जे

कुजबुजणारे सज्जे

ठराविक दोन बिंदूंजवळ उभे राहून एका बिंदूजवळ कुजबुजले असता दुसऱ्या बिंदूजवळ स्पष्ट ऐकू येईल असा ध्वनिकीय गुणधर्म असणारा विवृत्ताकार (लंबवर्तुळाकार) किंवा गोलाकार घुमट वा सज्जा. उपरिनिर्दिष्ट दोन बिंदू सोडल्यास अन्यत्र हे बोलणे ऐकू येत नाही. विजापूरचा गोलघुमट, वॉशिंग्टन येथील कॅपिटॉल इमारत, सेंट पॉल कॅथीड्रल व ग्लोस्टर कॅथीड्रल या इमारतींत कुजबुजणारे सज्जे आहेत. विवृत्ताकार खोलीत विवृत्ताच्या एका केंद्राजवळ मनुष्य उभा राहून कुजबुजला असता, दुसऱ्या केंद्राजवळ उभ्या असलेल्या मनुष्यास पहिल्याचे बोलणे स्पष्ट ऐकू येते. इतरत्र एवढ्याच अंतरावर त्याच खोलीत हे बोलणे ऐकू येणार नाही.

सेंट पॉल कॅथीड्रल येथे भिंतीजवळ बोलले असता घुमटाच्या भिंतीजवळ असणाऱ्या सर्वांनाच हे बोलणे ऐकू जाते. लॉर्ड रॅली यांनी हा चमत्कार ध्वनीच्या गुणीत (एकामागून एक होणाऱ्या अनेक) परावर्तनामुळे घडतो असे सांगितले; परंतु सदर्लंड व सी.व्ही. रामन यांनी केलेल्या प्रयोगांवरून ही क्रिया यापेक्षा जटिल असावी असे दिसते.

लेखक : सु.स.शिरोडकर

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 4/16/2020

© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate