Skip to content. | Skip to navigation

Vikaspedia


T2 2019/09/16 22:48:38.481401 GMT+0530
शेअर करा

T3 2019/09/16 22:48:38.486995 GMT+0530
Views
  • स्थिती: संपादनासाठी खुला

T4 2019/09/16 22:48:38.516137 GMT+0530

गुढी पाडवा

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो.

चैत्र शुद्ध प्रतिपदेस गुढी पाडवा असे नाव असून हिंदूंच्या साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी तो एक शुभ मुहूर्त मानला जातो. शालिवाहन शकारंभही (इ. स. सु. ७८ वर्षांनंतर) याच दिवशी असून दक्षिण भारतात तसेच महाराष्ट्रातही नूतन वर्षारंभ याच दिवशी मानतात. ‘शालिवाहन’ ‘सातवाहन’ चा अपभ्रंश असावा. सातवाहनांपैकी कोणी व कोणत्या प्रसंगी हा शक सुरू केला, हे निश्चितपणे सांगता येत नाही. शक हे परकीय असून त्यांच्यावर सातवाहनांनी मिळविलेल्या एखाद्या महत्त्वाच्या विजयदिनापासून ह्या शकाची सुरुवात झाली असावी, असे काही विद्वान मानतात.

गुढी

संत ऋतूचा आरंभ याच दिवशी होतो. कोणत्याही नवीन कार्यारंभास हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. चौदा वर्षांच्या वनवासानंतर आणि लंकाविजयानंतर रामाने याच दिवशी अयोध्येत प्रवेश केला, अशी एक कथा रूढ आहे. या दिवशी घरोघर गुढ्या-तोरणे उभारतात. या दिवशी मंगलस्नान करून कडुलिंबाची पाने, मिरे, हिंग, लवण, जिरे व ओवा यांसह खाल्ली असता आरोग्य, बल, बुद्धी व तेजस्विता प्राप्त होते, अशी समजूत आहे. या दिवशी ब्रह्मदेवाने जग निर्माण केले, म्हणून ब्रह्मपूजा हा या दिवशी महत्त्वाचा विधी मानतात. बांबूच्या टोकास रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर चांदीचे वा पितळेचे भांडे पालथे घालून त्याला कडुलिंबाची डहाळी व फुलांची माळ बांधतात आणि पूजापूर्वक ती सजवलेली गुढी दारात उभारतात. गुढी उभारण्यावरूनच या दिवसास ‘गुढी पाडवा’ म्हटले जाते. पुराणांत या दिवशी बरेच विधी सांगितले आहेत.

करंदीकर, ना. स.

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ

स्त्रोत : मराठीविश्वकोश

3.11363636364
आपल्या सूचना पोस्ट करा

(वरील विषयासाठी जर तुमच्या काही प्रतिक्रिया किंवा सूचना असतील तर या ठिकाणी नोंदवा)

Enter the word
नेवीगेशन

T5 2019/09/16 22:48:38.743249 GMT+0530

T24 2019/09/16 22:48:38.752319 GMT+0530
Back to top

T12019/09/16 22:48:38.413804 GMT+0530

T612019/09/16 22:48:38.432140 GMT+0530

T622019/09/16 22:48:38.470799 GMT+0530

T632019/09/16 22:48:38.471700 GMT+0530