অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

प्रसिद्ध टेक कंपनींना अशी मिळाली नावे

मोठमोठ्या टेक्नॉलॉजिकल कंपनींना त्यांची नावे कशी मिळाली हा प्रश्न कधी पडला का आपल्याला. या कंपनींची नावे कोणी ठेवलीत किंवा या कंपनीचे नाव असे का ? काही नावे मजेशीर असतात. काही त्यांच्या उत्पादनांना साजेशी असतात तर काही एकदम वेगळीच असतात. पण आपण या सर्व गोष्टींचा विचार कधी करत नाही. आपण फक्त उत्पादन आणि त्याची गुणवत्ता यावरच भर देतो. कारण काही असो, या सर्व कंपनींना आपली नावे मिळण्याची कथा रोचक आहे.

ॲपल

ॲपल या कंपनीचे मालकी हक्क ‘कपरतीनो टेक’ यांच्याकडे आहेत. ही कंपनी सुरुवातीला फक्त संगणक बनवत असत. त्या संगणकाचे नाव ॲपल ठेवण्यात आले. पण त्यांना मनासारखे यश मिळाले नाही.
1976 साली स्टीव जॉब्स, स्टीव वोझनिक आणि रोनॉल्ड वेन या त्रिकुटाने ही कंपनी उभारली होती. हे छान मित्र आहेत. प्रथम घरगुती वापरासाठी संगणक बनवण्याचा त्यांचा मानस होता. त्यानंतर त्यांनी स्मार्ट-फोन आणि टॅबलेट बनवण्यास सुरुवात केली.

खरी गंमत अशी झाली कि स्टीव जॉब्सला सफरचंद खूप आवडतात. तो एकदा सफरचंदाच्या मळ्यातून आला आणि त्यांनी हे नाव सुचविले. 2007 साली संगणक हे नाव वगळण्यात आले आणि अॅपल हे नाव कंपनीला मिळाले. त्या दिवसापासून विश्वामध्ये हे एक अजरामर नाव झाले.

सॅमसंग

कोरियन भाषेमध्ये सॅमसंग म्हणजे त्रिस्टार. हे नाव ठेवण्याचे प्रयोजन असे कि त्रिस्टारची वैशिष्ट्ये जशी शक्तिशाली, मोठे आणि असंख्य आहेत तशीच या कंपनीची वाटचाल असावी.

1993 सालापर्यंत सॅमसंग कंपनीचे चिन्ह देखील त्रिस्टार स्वरूपाचे होते. आता ते बदलून निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा बॅच केला आहे.

एलजी

1995 साली इलेक्ट्रॉनिक्स कंपनी गोल्डस्टार आणि लाक-हुई यांचे एकीकरण झाले. त्यामुळे त्यांनी संयुक्त नाव लक्की गोल्डस्टार असे ठेवले. जे नंतर एलजी म्हणून प्रसिद्ध झाले.

एल-जी या शब्दांचे स्पष्टीकरण अलिकडेच लाइफ गुड अर्थात जीवन मस्त आहे असे करण्यात आले.

स्पोटीफाय

अनेक कंपन्या व त्यांची नावे ही व्यापक ब्रँडिंग किंवा ऐतिहासिक विलीनीकरणाचे प्रमाण आहे. पण काही एखाद्या सुखद घटनेप्रमाणे असतात किंवा फक्त एक पूर्ण अनपेक्षित घटना. स्वीडिश संगीत ब्रँडचे असेच काही झाले.

स्पोटीफायचे संस्थापक डॅनियल एक आणि मार्टिन लोरेणटझोन हे आपल्या कंपनीचे काय नाव ठेवावे या विचारात होते, तेव्हा अजब झाले. त्यांच्या कानावर स्पोतीफ्य हा शब्द पडला आणि ते त्याकडे आकर्षित झाले.

भरपूर शोध घेतल्यावर त्यांच्या लक्षात आले कि हा शब्द दुर्मिळ आणि लक्षवेधी आहे. त्यामुळे मग या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. हेच कंपनीचे नाव ठेवण्यात आले. प्रसिद्धी मिळाल्यानंतर कंपनीने नावाचा अर्थ स्पॉट + आयडेन्टिफाय असा आहे हे जाहीर केले.

फेसबुक

प्रसिद्ध सामाजिक नेटवर्क साइट फेसबुक ही 1994 साली जन्माला आली. मार्क झुकेरबर्ग आणि त्याच्या हावर्डमधील मित्रांनी फेसमैष साईट बनवलेली होती. यावर आपण किंवा आपले मित्र किती सुंदर आणि छान दिसतात हे छायाचित्र पाहून ठरवत असे.

त्यांनी त्यात एक बदल केला आणि नवीन नाव द फेसबुक.कॉम असे ठेवले. यावर फक्त विद्यार्थी नोंदणी करू शकत होते. 2005 साली फेसबुकने आपले दार सर्वांसाठी उघडले आणि ती एक सार्वजनिक साईट बनली.

सोनी

सोनी कंपनीचे पहिले उत्पादन होते एक छोटा रेडिओ. हा रेडिओ 1955 साली बनवण्यात आला. 1958 साली कंपनीचे नाव सोनी असे ठेवण्यात आले.

टोकियो दूरसंचार इंजिनियरिंग कॉर्पोरेशन हे कंपनीचे मूळ नाव होते. सोनी या शब्दाचे मूळ लॅटिन भाषेचे आहे आणि त्याचा अर्थ आहे ध्वनी.

1950 साली जपानमध्ये एखाद्या तरुण सुंदर पुरुषाला सोनी बॉय म्हणून संबोधित असे, या गोष्टींसुद्धा सोनी कंपनीला आपले नाव मिळवण्यास कारणीभूत ठरल्या.

ट्विटर

आपले सर्वांचे लाडके ट्विटर 10 वर्षांचे झाले आहे. प्रसिद्ध सामाजिक नेटवर्क साईट ट्विटरचे संस्थापक, सुरुवातीला या नावावर शाश्वत नव्हते. त्या सर्वांना फ्लिकर हे नाव खुणावत होते. भरपूर विचाराअंती जेव्हा नावाचा शब्दकोश संपला तेव्हा एकमताने त्यांनी ट्विटर असे नामकरण केले.

गुगल

गुगल इंटरनेट शोध इंजिन म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. गणितात 1 आकड्यानंतर अनेक शून्य येतात या सिद्धांतावर गुगलचे नाव ठेवण्यात आले आहे. संस्थापक सर्जी ब्रिन आणि लॅरी पेज यांचा असा प्रयत्न होता कि सर्व माहिती मुबलक प्रमाणात आपल्या उपभोक्त्यांना उपलब्ध करून द्यावी.

सुरुवातीला संस्थापक शोध इंजिनचे नाव काही वेगळे ठेवणार होते. नंतर अतिशय योग्य पद्धतीने डोमेन नाव नोंदणी करण्यापूर्वी त्यांनी गुगल असे केले.

मायक्रोसॉफ्ट

1975 साली बिल गेट्स आणि पॉल ॲलन यांनी एका संगणक कंपनीची स्थापना केली. त्यांनी मायक्रोसॉफ्ट हे नाव मायक्रोप्रोसेसर आणि सॉफ्टवेअर या दोन शब्दांच्या मेळीने बनवले. पहिले या कंपनीचे मूळ नाव मायक्रो-सॉफ्ट असे ठेवण्यात आले. कालांतराने ते मायक्रोसॉफ्ट असे झाले.

याहू

1994 साली जेरी आणि डेव्हिडचे मार्गदर्शक म्हणून वर्ल्ड वाईड वेबची स्थापना झाली. याचेच याहू म्हणून नामकरण 1994 साली करण्यात आले.

याहू या शब्दाचा मूळ अर्थ डावलून संस्थापकाने हे नाव निवडले.



लेखिका - सुजाता चंद्रकांत.

स्त्रोत : महान्युज

अंतिम सुधारित : 8/8/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate