ढम -ढम -दम-ढम -ढोल वाजे टीम टीम टिमकी । हसत नाचत गाऊ सारे घेऊ गिरकी हो--- घेऊ गिरकी ---
श्री गणेश । जय गणेश । घण -घण -घण -घण घंटा वाजे वाजे चौघडा वाजे चौघडा ।
हासत नाचत गाऊ सारे घालू कोंबडा हो-- घालू कोंबडा --- श्री गणेश ।
जय गणेश । डम -डम -डम -डम डफरी वाजे छुन -छुन पैंजण हो -- हो -- छुन छुन पैंजण । हासत नाचत गाऊ सारे घेऊ रिंगण --- श्री गणेश । जय गणेश ।
चीप-चीप चीप चीप -चिपळी वाजे टीम-टीम- संबळ हो टीम टीम संबळ ।
हासत नाचत गाऊ सारे घालू गोंधळ -हो -- घालू गोंधळ --- श्री गणेश ।
जय गणेश । तीरी -किटी -धा तीरी - किटी - धा मृदुंग वाजे वाजे तिकडी हो -- वाजे तिकडी ।
हासत नाचत गाऊ सारे घालू फुगडी - हो घालू फुगडी --- श्री गणेश । जय गणेश ।
ढिंग -टाक -ढिंग -टाक दीमटी वाजें वाजती चाळ हो वाजती चाळ ।
हासत नाचत गाऊ सारे खेळू नवे खेळ हो -- खेळू नवे खेळ --- श्री गणेश जय गणेश ।
ढण -ढण -ढण -ढण मशाल पेटे --करू जागर हो -- करू जागर ।
हासत -नाचत गाऊ सारे करू गजर हो -- करू गजर -- श्री गणेश ।जय गणेश ।
श्री गणेश । जय गणेश ।
माहिती संकलन: प्राची तुंगार
अंतिम सुधारित : 10/7/2020
"गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया" या जय घोषान...