অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सिद्ध

सिध्दची उत्पत्ती

सिद्ध प्रणाली भारतीय चिकित्सा पद्धतीची एक प्राचीन प्रणाली आहे. शब्द ‘सिद्ध’ म्हणजे कार्यसिद्धि आणि ‘सिद्धार’ म्हणजे पुण्य व्यक्ति ज्यांनी औधषीत सिद्धि प्राप्त केली आहे असे. असे म्हटले जाते की या औषध प्रणालीच्या विकासात अठरा सिद्धारांनी योगदान दिले होते. सिद्ध साहित्य तमिळमध्ये आहे आणि ही विद्या तामिळ भाषिकांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते तसेच विदेशात जास्त प्रचलित आहे. सिद्ध प्रणाली सर्वसाधारणपणे नैसर्गिकरीत्याच चिकित्सीय आहे.

सिध्दचा इतिहास

जगंनियत्याद्वारे मानव जातीला दिले गेलेले मूळ आवंटित घर हे भारताच्या टोकाचे पुर्वेचे समशीतोष्ण आणि उपजाऊ क्षेत्र होय. इथूनच मानवजातीने आपली संस्कृती आणि कारकिर्दीला सुरुवात केली. भारताला म्हणूनच निश्चितपणे मानवी संस्कृती आणि सभ्यतेचे मूळ आणि प्रचार स्थान म्हणता येईल. भारतीय इतिहासाप्रमाणे आर्यांच्या स्थानान्तरणा आधी, द्रविडीयन हा भारताचा पहिला निवासी होता ज्यात तामिळ हे सर्वात प्रमुख होते. तमिळ हे नुसतेच पुरातन सभ्य नव्हते तर इतर कोणत्याही लोकांपेक्षा जास्त सभ्यतेत प्रगति आणणारे होते. भारतीय भाषा दोन महान वर्गांमध्ये वर्गीकृत केली गेली होती, उत्तरी भागात पूर्व विचार तत्त्वाप्रमाणे संस्कृत आणि दक्षिणी स्वतंत्र्य स्वरुपाने द्रविडियन भाषा वापरत असत.

चिकित्सा विज्ञान मनुष्यासाठी त्याच्या भल्यासाठी आणि त्याच्या उत्तरजीवितासाठी मौलिक महत्वाचे आहे म्हणूनच हे माणसाने उत्पन्न केलेले आणि सभ्यतेच्या रुपाने विकसित असावे. म्हणूनच कोणत्या घडीला किंवा टप्प्याला ह्या पद्धतिची सुरुवात झाली हे निश्चित करण्याचे कष्ट घेणे व्यर्थ आहे. ही अनंत आहे, हिची सुरुवात मनुष्यापासून झाली आणि मनुष्याबरोबरच याचा अंत होऊ शकतो. सिद्ध दक्षिणेत फुलली तर आयुर्वेद उत्तरेत प्रचलित झाले. या पद्धतिच्या शोधासाठी एका अमुक व्यक्तिचे जन्मदाता म्हणून नाव देण्यापेक्षा आपल्या पूर्वजांनी निर्मात्याला ह्याचा जबाबदार ठरविले. परंपरे नुसार शिवाने सिद्ध औषध प्रणालीचे ज्ञान त्याची सहचारिणी पार्वती हिच्यासमोर प्रकट केले जिने ते नंदीदेवाला दिले आणि त्याने सिद्धारांना. सिद्धार हे पुरातन काळातील महान शास्त्रज्ञ होते.

परंपरे प्रमाणे, सिद्ध औषध प्रणालीचे उपजिवी महान सिद्ध ‘अगस्त्यार्’ यांना मानले जाते. त्यांची काही औषध आणि चिकित्सेवरील पुस्तके ही अजुनही सिद्ध औषधींचा वापर करणा-या चिकित्सकांद्वारे दैनंदिन वापरली जातात.

सिद्धच्या मूळ संकल्पना

या प्रणालीतील सिद्धांत आणि मतं, मौलिक आणि लागू देन्हीमध्ये, आयुर्वेदासारखी, चिकित्साशास्त्र आणि रसायन शास्त्राशी समानता दिसते. या प्रणाली प्रमाणे मानव शरीर ही एक ब्रह्मांडाची प्रतिकृति आहे आणि अन्न आणि औषधीं ह्या अमोलिक आहेत. आयुर्वेदा प्रमाणे, ह्या प्रणालीचे असे मानणे आहे की मानव शरीरा सहित ब्रह्मांडातील सर्व वस्तू ह्या पाच तत्त्वांच्या बनलेल्या आहेत उदा. पृथ्वी, जल, अग्नि, वायु आणि आकाश. जे अन्न मानवी शरीर घेते आणि ज्या औषधीचे सेवन शरीर करते ते सर्व या पाच तत्त्वांचे बनलेले असते. औषधांमधील तत्त्वाचा अनुपात आणि त्याचे प्राधान्य बदलत असते किंवा काही कारवाई किंवा चिकित्सीय परिणामांवर हे अवलंबून असते.

आयुर्वेदा प्रमाणेच, सिद्ध प्रणालीत देखील मानवी शरीर हे तीन रस, सात मूळ मांसपेशी आणि शरीरातील अपचिष्ट उत्पाद जसे मल, मूत्र आणि घाम या सर्वाचे संघीक मानले जाते. अन्न ही मानव शरीराची मूळ निर्माण सामग्री मानली जाते जी रस, मांसपेशी आणि निचरा यांत परिवर्तीत होते. रसांच्या समतोलतेला स्वास्थ असे म्हणतात आणि त्यात अशांती आणि असंतुलन झाल्यास रोग किंवा आजार होतात. ह्या प्रणालीत मोक्षाची संकल्पना देखील मांडण्यात आली आहे. ह्या प्रणालीचे पुरस्कर्ते असे मानतात की औषधी आणि ध्यानामुळे मोक्ष मिळतो.

औषध विवरण

या प्रणालीने औषध ज्ञानाचा अद्वितीय आणि मौलिक असा खजिना विकसित केला आहे ज्यात धातु आणि खनिजांच्या उपयोगावर भर दिला आहे. या प्रणालीतील खनिजे, औषध प्रणालींच्या ज्ञानाच्या गहनतेवरील काही विचार, खालील प्रमाणे विस्तृत औषध वर्गीकरणाद्वारे केले जाते :

  • पाण्यात संपूर्णपणे विरघळली जाणारी 25 अजैविक मिश्रणे आहेत ज्याला ‘UPPU’ असे म्हणतात. यात क्षार आणि लवणांचे विभिन्न प्रकार आहेत.
  • खनिज औषधांचे 64 प्रकार आहेत जे पाण्यात संपूर्णपणे विरघळले जात नाहीत पण जे गरम केल्यास बाष्प होतात किंवा वाफ सोडतात. यातील बत्तीस नैसर्गिक आहेत आणि उरलेले अनैसर्गिक.
  • 7 अशी औषधे आहेत जी पाण्यात संपूर्णपणे विरघळली जात नाहीत पण गरम केल्यास वाफेत रुपांतरीत होतात.
  • या प्रणालीत जे वितळतात, गरम केल्यास बाष्प होतात किंवा थंड केल्यास कडक होतात अशांचे वर्गीकरण धातु आणि मिश्र धातु असे वेगळे केले आहे. सोने, चांदी, तांबे, टिन, शिसे, लोह यांचे वर्गीकरण देखील यांत आहे. जे खास पद्धतीने जाळून औषधांत वापरले जातात.
  • गरम केल्यावर उर्ध्वपातक गुण दाखविणा-या औषधांचा समुह आहे ज्यात पारा आणि त्याची वेगवेगळी रुपे जसे पा-याचे रेड सल्फाईड, मरक्यूरिक क्लोराईड आणि मरक्यूरीक रेड ऑक्साईड इ. चा देखिल समावेश आहे.
  • चिकित्सा विज्ञान आणि आरोग्य स्थिर ठेवण्याबाबतच्या प्रयोगांमध्ये, पाण्यात अघुलनशील अशा सल्फरची पा-याच्या बरोबरीने, सिद्ध मध्ये फार महत्वाची जागा आहे.
  • वरील वर्गीकरणावरुन घातूंच्या अध्ययनातून या प्रणालीसाठी उपचारांत विकसित केलेले विस्तृत ज्ञान मिळते. पशु स्रोतांपासून प्राप्त अशा ओषधांची देखील यात भर पडते. प्रणालीतील प्रकाशित पुस्तके देखील उपलब्ध आहेत ज्यात सिद्ध मधील सामान्य उपचार आणि इलाजांची माहिती आहे.

सिद्धमधील रसायन

सिद्ध प्रणालीतील रसायन शास्त्र जे औषधांचे साहायक विज्ञान आणि रसायन विद्या चांगल्या प्रकारे विकसित असल्याचे दिसते. हे शास्त्र तसेच मूळ धातूचे सोन्या मध्ये रुपांतर करण्यासाठी आणि औषधि तयार करण्यात उपयोगी असल्याचे दिसून आले आहे. वनस्पती आणि धातूंचे ज्ञान उच्च मानले जाते आणि ते विज्ञानाच्या सर्व शाखांत पूर्णपणे परिचित आहे. सिद्धारांना देखील अल्केमिक अशा कितीतरी प्रक्रिया अवगत होत्या जसे निश्चूर्णन, उर्ध्वपातक, स्त्रावण, विलय, विभाजन, संयोजन किंवा संमिश्रण, घनिकरण, सिबेशन, किण्वन, ऊन्नयन म्हणजे अ-वाष्पशील परिस्थितीत आणणे, सोने अधिक शुद्ध करण्याची प्रक्रिया, निर्धारण म्हणजे अ- वाष्पशील परिस्थितीत आणणे म्हणजे अग्नी, शुद्धि, धातुंचे भस्मिकरण,पातळ करणे, निष्कर्षण, प्रतिकार शक्ति वाढविणे इ.

रसायन विद्येतील एक महत्वाची प्रक्रिया ज्यात सोने चांदी वितळविली जाते (जी अरबांनी शोधली असे म्हणतात) ती सिद्धारांना फार पुरातन काळापासून अवगत होतुददुता.मद.गल. ते फार्मासिस्ट देखील होते आणि तसेच ते ऊकळणे, विरघळवणे, गाळणे आणि रासायनिक पदार्थ जमा करणे अशी कामे देखील करत असत. त्यांच्या काही गुपित प्रक्रिया, खास करुन मरक्यूरी, सल्फर, ऑर्पिमेंट मेंट, व्हर्मिलीयन,आर्सेनिक इ. सारख्या काही अस्थिर पदार्थांचे स्थिरीकरण, अजूनही एक रहस्यच आहे.

सिद्धची ताकद

सिद्ध प्रणाली ही आणीबाणीची परिस्थिती सोडता इतर सर्व प्रकारच्या रोगांवर इलाज करण्यास सक्षम आहे. सर्वसामान्यपणे ही प्रणाली त्वचेच्या सर्व समस्या उदा. सोरायसिस ,लैंगिक संबंधांतून पसरणारे रोग, मूत्र मार्गाचे संसर्ग, जठराचे रोग आणि आमाशय मार्ग संबंधी रोग, सर्वसामान्य दुर्बलता, प्रसवोत्तर अरक्तता, अतिसार आणि संधिवात व अलर्जी विकारां बरोबरच सर्वसामान्य ताप उपचारांमध्ये प्रभावी आहे.

सिद्ध मधील निदान आणि उपचार

रोगाच्या निदानात रोगाचे कारण शोधले जाते. प्रेरणेच्या कारकाची पहाणी म्हणजेच रोग निदान हे नाडी परिक्षण, मूत्र, डोळे, आवाजाचा अभ्यास करुन, शरीराचा रंग पाहून, जिभ आणि पचनाच्या क्रियेचा विचार करुन केले जाते. प्रणालीत मूत्र तपासणीसाठी ठरावीक सखोल प्रक्रिया असते ज्यात मुत्राचा रंग, वास, घनता, मात्रा आणि तेलकट स्वरुप यांचा समावेश असतो. यात समग्र दृष्टिकोण ठेवला जातो आणि निदानात एक पूर्ण स्वरुपात व्यक्तिचे आणि त्याच्या रोगाचे अध्ययन सामिल केले जाते.

सिद्ध चिकित्सा प्रणालीचा जोर चिकित्सा उपचार केवळ रोगासाठी उन्मुख नसून त्यात रोगी, त्याच्या आजूबाजूचे वातावरण, मौसमी बदल, त्याचे वय, लिंग,जात, सवयी, मानसिक परिस्थिती, राहण्याचे ठिकाण, खाणे, शारिरीक आवस्था, शारिरीक संविधान इ. चा विचार देखील केला जातो. याचा अर्थ असा आहे की उपचार हा व्यक्तिगत आसतो, ज्यात असे पाहिले जाते की निदानात आणि उपचारात कमीत कमी चुका होवोत.

सिद्ध प्रणालीत महिला आरोग्यावर परिणाम करणा-या समस्यांचा देखील समावेश आहे आणि सिद्ध शास्त्रात खूप सूत्र उपलब्ध आहेत जी चांगल्या प्रतिच्या जीवनासाठी सर्व समस्यांचा विरोध करु शकतात. महिला स्वास्थाची देखरेख ही तिच्या जन्माच्या पहिल्या दिवसापासूनच सुरु होते. बाळाला तिन महिन्यांपर्यंत मातेने दुग्धपान करण्याच्या सल्ल्याला सिद्ध प्रणालीत जोर दिला गेला आहे. सिद्ध प्रणालीचे मानणे आहे की दुग्धपानातून मिळणारे अन्न हेच महत्वाचे औषध आहे आणि दुग्धपान करण्याच्या या कालावधीत दुग्धपान करणा-या मातांना लोह, प्रोटीन आणि फाइबर भरपूर प्रमाणात असलेल्या अन्नाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो ज्याने माता व बाळ या दोघांचे काही पोषण संबंधी विकारांपासून संरक्षण होईल. पंधवडयातून एकदा, मातांना सामान्य उपचार घेण्याचा सल्ला दिला जोतो जेणे करुन त्यांचे रक्तहीन अवस्थे पासून संरक्षण होते.

संक्रमणाद्वारे किंवा इतर कारणाने झालेल्या कोणत्याही रोगा साठी, उपचार हे प्रत्येकासाठी व्यक्तिगत असतात जे त्याचे परिक्षण केल्यावर ठरविले जातात. एकदा मुलगी रजोदर्शन करु लागली की, सिद्ध प्रणालीत तिची प्रजनन प्रणाली मजबूत करण्यासाठी विविध औषधे उपलब्ध आहेत जेणे करुन भविष्यात ती विनाअडथळा प्रसूत होते. तसेच रजोनिवृत्ति संलक्षणे होतांनासाठी खासकरुन हार्मोनल असंतुलनावर देखील प्रभावी उपचार उपलब्ध आहेत.

जठर, त्वचा रोग खास करुन सोरायसिस, वातरोगासंबंधी तक्रारी, रक्ताल्पता, वाढलेल्या पुरस्थग्रंथी, रक्ती मूळव्याध आणि आतड्याचा पेप्टिक कँसर सारख्या जुन्या मामल्यांच्या उपचारांमध्ये सिद्ध प्रणाली प्रभावी आहे. सिद्ध औषधींमध्ये पारा, चांदी, आर्सेनिक, शीसे आणि सल्फर या सारखी खनिजे काही संक्रामक रोगांतील उपचारांवर ज्यात मैथुनसबंधी रोग देखील समाविष्ट आहेत अशा रोगांसाठी वापरल्याचे दिसून आले आहे. चिकित्सकांचा असा दावा आहे की सिद्ध औषधी ही अत्याधिक दुर्बल करणा-या समस्या जसे एचआईवी / एड्स ज्यात स्वतःला प्रकट करतात असे रोग कमी करण्यासाठी प्रभावी आहे. या औषधींवर अजून जास्त परिणामकारी संशोधन प्रगतिपथावर आहे.

राष्ट्रीय सिध्द संस्था, चेन्नई

राष्ट्रीय सिध्द संस्था, (NIS), चेन्नई ही स्वायत्त संगठना आहे जी भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या आयुष विभागातर्फे निंयत्रित आहे. हिचे निर्माण 14.78 एकर जागेत झाले होते. हे संस्था सामाजिक अधिनियमांतर्गत पंजीकृत केले गेले होते. या संस्थेतर्फे सिद्ध विद्यार्थ्यांसाठी स्नातकोत्तर अभ्यासक्रम राबविले जातात तसेच संस्थेतर्फे चिकित्सा देखभाल पुरविली जाते आणि या विज्ञानाचा प्रचार, विभिन्न पातळींवर संशोधन आणि विकासाद्वारे केला जातो. तामिळ जनता आणि जीवनाच्या सर्व स्थरातील लोकांसाठी चिकित्सेसाठीचे, ही एक प्रमुख संस्था आहे, जी संशोधनाचा देखील प्रचार करते. हे संस्था सरकार द्वारे तमिळनाडु सरकार बरोबर संयुक्त उद्योग म्हणून स्थापित करण्यात आले होते. भारत सरकार आणि राज्य सरकारच्या पूंजीगत व्ययाचा हिस्सा 60:40 असा असून आवर्ती खर्च हे 75:25 इतके आहे. 3-9-05 रोजी ही संस्था आपल्या भारताचे माननीय पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांनी राष्ट्रास समर्पित केली.

प्रत्येक वर्षी,या संस्थेत, 46 विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो आणि त्यांना स्नातकोत्तर- M.D (सिद्ध), मरुथूवम (सामान्य औषधी), गुणपाडम (औषध विज्ञान), सिरप्पू मरुथूवम (खास औषधी), कुझंदाई मरुथूवम (बाल चिकित्सा), नोई नदल (सिद्ध औषध विज्ञान) आणि नान्जू नुलूम मरुथूव निती नुलम (विष विज्ञान आणि चिकित्सा न्याय – शास्त्र), अशा सिद्धच्या सहा शाखां अभ्यासक्रमां मधून गुणवत्ता शिक्षण प्रदान केले जाते. या संस्थेला केन्द्र स्वरुपाने तमिळनाडु Dr. MGR चिकित्सा विश्वविद्यालय, चेन्नई तर्फे सिध्द मधील पी.एच.डी. डिग्री देण्याची मंजूरी दिली आहे.

अधिक माहिती साठी वेबसाईटला भेट द्या : www.nischennai.org

आयुष विभागाची प्रकाशने

  • सिद्ध औषधप्रणाली
  • आयुष प्रणालीतील रोग-वार माहिती
  • आयुष बाबतच्या कल्पना आणि सत्य
  • आयुष मधील मार्गदर्शन आणि आयईसी सामग्री

 

स्त्रोत : आयुष विभाग, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार

अंतिम सुधारित : 9/14/2019



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate