অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्यूनशोथ

सांधे आणि अस्थी ( हाडे ) यांच्या जवळच्या प्रदेशात जेथे दोन ऊतकांमध्ये ( समान रचना व कार्ये असणार्‍या कोशिकांचा) अतिरिक्त घर्षण होत असते, तेथेया नावाने ओळखला जाणारा द्रवयुक्त कोश ( लहानशी पिशवी ) तयार होतो; उदा., स्नायू , अस्थिबंध किंवायांचे अस्थीच्या पृष्ठभागाशी होणारे घर्षण. स्यूनाच्या कोशामध्येद्रव पदार्थ असतो. सांध्यां-मधील संधिद्रवाप्रमाणेच तोसंघर्षण प्रतिबंधक कार्य करतो. त्यामुळे ऊतके एकमेकांवर घासून त्यांचीहोत नाही.

स्यूनशोथ रोगाची लक्षणे

स्यून असलेल्या अवयवाची दीर्घ काळ अतिरिक्त हालचाल झाल्या-मुळे त्यावर ताण पडून स्यूनशोथ उद्भवू शकतो. तसेच जंतुसंक्रामण, आघात यांमुळे झालेली दुखापत, संधिवाताभ विकार, गाऊट यांसारख्या इतर कारणांनीही अशी स्थिती निर्माण होते. शोथप्रवण स्थानांमध्ये अल्पकालिक तीव्र स्यूनशोथात अचानक तीव्र वेदना जाणवते. तेथील पृष्ठभागावर ( त्वचेवर ) लाली येऊन ती सुजल्यासारखी दिसते व स्पर्श असह्य होतो. किंचित हालचालीनेहीवेदना झाल्यामुळे अवयव आखडल्यासारखा होतो; उदा., टाच न टेकता येणे किंवा खांद्यापासून हात हलविणे अशक्य होणे.शोथात वारंवार दुखापत झाल्याने किंवा तीव्र शोथाचे प्रसंग अनेक वेळा निर्माण झाल्यामुळे स्यूनाच्या कोशांचे आवरण जाड झालेले असते.

उपाययोजना

हालचालीवर दीर्घकाळ मर्यादा पडल्यामुळे आसपासचे स्नायू बारीक व अशक्त होतात. तसेच या कोशाच्या आत खडूसारखा कॅल्शियमयुक्त घट्ट द्रव पदार्थाचा स्यूनशोथाचे निदान कोशातील द्रवाच्या तपासणीने होऊ शकते. त्यामध्ये कॅल्शियम निक्षेप असल्यास क्ष-किरण चित्रणात त्याचेकळून येते. जाड सुई घालून अतिरिक्त द्रव काढून टाकणे, पूर्ण विश्रांती आणि वेदनाहारक औषधे यांमुळे त्वरित आराम वाटू लागतो. जंतुसंक्रमण असल्यास प्रतिजैविकांचा उपयोग मुखावाटे किंवा कोशात अंतःक्षेपण देऊन करावा लागतो. तीव्र वेदनांसाठी बधीर करणारी द्रव्ये आणि कॉर्टिकोस्टेरॉइड किंवा अन्य शोथहारक औषधे यांचा अवलंब करणेपडते. कॅल्शियम क्षारांचे थर काढण्यासाठी द्रव पदार्थाने स्यूनाचाधुवून काढणे किंवा त्याचाघेवून अंतर्भाग स्वच्छ करणे किंवाकोश काढून टाकणे यांसारखेवापरता येतात. तीव्र शोथाचीसंपल्यानंतर हालचाल सुधारण्यासाठी विशेष प्रकारचे व्यायाम आणि भौतिकीसुरू करता येतात; उदा., शेकणे, ऊतकतापन चिकित्सा ( डायाथर्मी ) इत्यादी.

 

लेखक : दि. शं. श्रोत्री

स्त्रोत : मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 6/27/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate