অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

रक्ताचा कर्करोग

ल्युकेमिया, अर्थात रक्ताचा किंवा अस्थिमज्जेचा कर्करोग असतो आणि रक्तपेशींची, विशेषतः पांढ-या पेशींची असामान्य वाढ हे त्याची विशेषता असते. हिमॅटोलॉजिकल नीओस्पाज्म नांवाच्या रोगांच्या मोठ्या गटात याचा समावेश होतो.

लक्षणे

अस्थिमज्जेचे नुकसान. यात सामान्य अस्थिमज्जेच्या जागी मोठ्या संख्येनं पांढ-या रक्तपेशी येतात, त्यामुळं चपट्या पेशींची संख्या कमी होते, या पेशी रक्त गोठण्याच्या प्रक्रियेत महत्वाच्या असतात. याचा अर्थ, रक्ताचा कर्करोग असलेल्या लोकांना जखमा होतात, अधिक रक्त वाहते किंवा नीलत्वचा होते.

विषाणूंचा सामना करणा-या पांढ-या पेशी दाबल्या जातात किंवा अकार्यक्षम होतात.  त्यामुळं रुग्णाची प्रतिकार यंत्रणा अन्य पेशींवर हल्ला करायला सुरुवात करते.

अंततः, लाल रक्तपेशींची कमतरता होऊन अशक्तपणा येतो, परिणामी श्वास घेण्यात अडचण येते. सर्व लक्षणे ही अन्य रोगांशी जोडता येतात, निदानासाठी रक्ताची चाचणी आणि अस्थिमज्जेची तपासणी आवश्यक असते.

काही इतर संबंधित लक्षणेः
  • ताप, थंडी, रात्री घाम येणे आणि फ्लूसारखी इतर लक्षणे
  • अशक्तपणा आणि थकवा
  • भूक न लागणे आणि । किंवा वजन कमी होणे
  • सुजलेल्या किंवा रक्ताळलेल्या हिरड्या
  • अधिक रक्तस्त्राव (लहान जखमेतून)
  • चेतापेशीय लक्षणे (डोकेदुखी)
  • वाढलेले यकृत आणि प्लीहा
  • सहजपणे जखम होणे
  • वारंवार संक्रमण
  • हाडात वेदना
  • सांधेदुखी
  • टॉन्सिल्स सुजणे

ल्युकेमिया याचा अर्थ, पांढरे रक्त. रुग्णांमधे उपचारांच्या आधी पांढ-या पेशींची संख्या अधिक असते.  सूक्ष्मदर्शकाखाली ते सहजपणे पाहता येतं.  अनेकदा, या पांढ-या पेशी अपक्व किंवा अकार्यक्षम असतात.  अधिक प्रमाणातील या पेशी इतर पेशींच्या सामान्य कार्यात हस्तक्षेप करतात.

काही रुग्णांमधे, नियमित रक्त तपासणीत अधिक प्रमाणातील पांढ-या पेशी दिसून येत नाहीत. ही क्वचित आढळणारी स्थिती अल्युकेमिया म्हणून ओळखली जाते.  अस्थिमज्जेत तरीही कर्करोगक्षम पांढ-या पेशी असू शकतात, आणि त्या सामान्य रक्तपेशींच्या उत्पादन क्रियेत गडबड करतात. तथापि, त्या रक्तप्रवाहात शिरण्याऐवजी अस्थिमज्जेत राहतात, जिथे त्या रक्तचाचणीत दिसू शकतात. अल्युकेमिया असलेल्या रुग्णात, रक्तप्रवाहातील पांढ-या पेशींची संख्या सामान्य किंवा कमी असू शकते.  अल्युकेमिया हा ल्युकेमियाच्या चार मुख्य प्रकारांपैकी कशातही होऊ शकतो, आणि तो विशेषतः हेअरी सेल ल्युकेमियात दिसून येतो.

चार मुख्य प्रकार

ल्युकेमिया हा एक विस्तृत शब्द असून त्यात अनेक रोगांचा समावेश होतो.

चिकित्सा आणि प्रयोगशाळा यांच्या आधारे हा रोग तीव्र आणि जीर्ण प्रकारात विभागला जातो.

  • तीव्र रक्ताचा कर्करोग यामधे, अपक्व रक्तपेशींचा झपाट्यानं प्रसार होतो.  या गर्दीमुळं अस्थिमज्जा सुदृढ पेशींची निर्मिती करु शकत नाही.  हा प्रकार मुलं आणि युवा प्रौढांमधे होतो.  मारक पेशींची संख्या भरमसाठ वाढून त्या पसरल्याने त्यावर तत्काळ उपाय करणं आवश्यक आहे, या पेशी नंतर रक्तप्रवाहात उतरतात आणि अन्य अवयवांमधे जातात.  तथापि, केंद्रीय चेतासंस्थेचा सहभाग सामान्यतः नसतो, तथापि, काहीवेळा हा रोग क्रेनियल नर्व्ह पाल्सीजकरता कारणीभूत ठरतो.
  • जीर्ण रक्ताच्या कर्करोगात तुलनेनं पक्व, परंतु  अद्याप विकृत रक्तपेशींची संख्या वाढते.  हा रोग वाढायला अनेक वर्ष लागतात, यातील पेशी सामान्य पेशींपेक्षा अधिक गतीनं निर्माण होतात, त्यामुळं रक्तात अनेक विकृत पांढ-या पेशींची संख्या वाढते. जीर्ण रक्ताचा कर्करोग हा बहुधा वृध्द लोकांमधे होतो, परंतु सैध्दांतिकदृष्ट्या कोणत्याही वयोगटाला होतो.  तीव्र रक्ताच्या कर्करोगावर तातडीनं उपचार करणं गरजेचं आहे, तर जीर्ण प्रकार हा उपचार अधिक प्रभावी ठरण्यासाठी त्यावर काही वेळ देखरेख ठेवता येते.

कारणे आणि धोक्याचे घटक

विविध प्रकारच्या रक्ताच्या कर्करोगासाठी केवळ एकच असे कारण ज्ञात नाही.  विविध रक्ताच्या कर्करोगांची कारणे विविध असू शकतात, आणि ते कशामुळे होतात याबाबत खूपच कमी ठोस माहिती आहे.  संशोधकांना चार संभाव्य कारणांबाबत जोरदार संशय आहेः

  • नैसर्गिक किंवा कृत्रिम आयोनायझिग किरणोपचार
  • ठराविक प्रकारची रसायने
  • काही विषाणू
  • अनुवांशिक पूर्वस्थिती

इतर कर्करोगाप्रमाणे, रक्ताचा कर्करोग हा डीएनएतील शारीरिक उत्परिवर्तनामुळे होतो जो ऑन्को जनुकांना कार्यरत करतो किंवा गाठ नष्ट करणा-या जनुकांना अकार्यक्षम बनवतो आणि पेशी मरणे, त्यांचे वर्गीकरण करणे किंवा विभाजन करणे विस्कळीत करतो.  हे उत्परिवर्तन उत्स्फूर्तपणे होते किंवा किरणोपचाराच्या संपर्कामुळे होते किंवा कर्करोगजन्य पदार्थांमुळे होते आणि त्यांच्यावर जनुकीय घटकांचा प्रभाव असण्याची शक्यता असते.  गोत्र किंवा रोग-नियंत्रक अभ्यासातून असे दिसून आले आहे की पेट्रोरसायने, जसे, बेंझीन आणि हेयर डाईज यांच्यामुळे काही प्रकारचे रक्ताचे कर्करोग होऊ शकतात.

काही कर्करोगांचा संबंध हा विषाणूंशी जोडलेला आहे. उदाहरणार्थ, काही प्रकारच्या एएलएल प्रकरणी ह्यूमन इम्यूनोडिफीशियन्सी व्हायरस किंवा ह्यूमन टी-लिम्फोट्रॉपिक व्हायरस (एचटीएलव्ही-१ आणि २, ज्यांच्यामुळे प्रौढांमधे टी-सेल ल्युकेमिया किंवा लिम्फोमा होतो) यांच्यामुळे होणा-या विषाणूजन्य संक्रमणाशी संबंध जोडण्यात आला आहे.

तीव्र मायलोजीनस रक्ताचा कर्करोग होण्यासाठी फँकोनी अनिमिया हा देखील धोक्याचा घटक आहे.

रक्ताच्या कर्करोगाचे कारण किंवा कारणे सापडल्याखेरीज, हा रोग टाळण्यासाठी कोणताही मार्ग नाही.  कारणे जरी कळाली तरी, त्या अशा बाबी असू शकतात ज्यांचे सहज नियंत्रण होऊ शकत नाही.  जसे, नैसर्गिकरित्या होणारे किरणोत्सर्ग, आणि त्यामुळे प्रतिबंधात्मक कारणांसाठी त्यांचा विशेष उपयोग होत नाही.

 

स्त्रोत : पोर्टल क़ंटेंट टिम

अंतिम सुधारित : 4/29/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate