অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

स्वाइन इन्फ्लूएंझा

स्वाइन इन्फ्लूएंझा

स्वाइन फ्लू म्हणजे काय?

स्वाइन इन्फ्लूएंझा (स्वाइन फ्लू) डुकरांमध्ये नियमित स्वरूपात आढळणारा एक श्वसनसंबंधी रोग आहे.  हा रोग ए प्रकारच्या इफ्ल्युएन्झा व्हायरसमुळे होतो व डुकरांमध्ये याची साथ पसरणे सामान्य असते. लोकांना साधारणपणे स्वाइन फ्लू होत नाही पण माननाला याचा संसर्ग होऊ शकतो व होतो. स्वाइन फ्लूचे विषाणू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीकडे पसरल्याचे उदाहरणे आहेत, परंतु पूर्वी हे स्थित्यंतर सीमित होते व सहसा तीनपेक्षा जास्त लोकांपर्यंत हा रोग पोचत नसे.

मार्चच्या शेवटी आणि एप्रिल 2009च्या सुरूवातीला दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये आणि टेक्सास येथील सॅन ऍंटोनियोच्याजवळ स्वाइन इन्फ्लूएंझा ए (एच1एन1) (H1N1) च्या मानवी संसर्गाबाबत वृत्तांत मिळाला. अमेरिकेमधील इतर राज्यांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरदेखील मानवांमध्ये स्वाइन फ्लू संसर्गाच्या घटना घडत असल्याचा वृत्तांत आहे.

लोकांमध्ये स्वाइन फ्लूची लक्षणे आणि चिन्हे कोणती

स्वाइन फ्लूची चिन्हे आणि लक्षणे नेहमीच्या मानवी फ्लूसारखीच असतात आणि त्यामध्ये खोकला, घसा बसणे किंवा खवखवणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा ह्यांचा समावेश आहे. काही लोकांना स्वाइन फ्लू बरोबरच उलट्या आणि जुलाब झाल्याचे देखिल आढळले आहे. पूर्वी लोकांना स्वाइन फ्लू बरोबरच गंभीर रोग (न्युमोनिया आणि श्वसनसंस्था निकामी होणे) आणि मृत्यू झाल्याचे वृत्तांत आहेत. हंगामी फ्लूप्रमाणेच, स्वाइन फ्लूदेखील गंभीर रोगाचे स्वरूप घेऊ शकतो.

प्रामुख्याने इंफ्लूएंझा झालेल्या व्यक्तीच्या शिंकण्यातुन किंवा खोकण्यातुन फ्लूचा विषाणू एका व्यक्तीपासून दुस-या व्यक्तीकडे पसरतो. काही वेळा फ्लूचा विषाणू असलेल्या एखाद्या वस्तूला हात लावून तोच हात नाक किंवा तोंडाला लावल्यानेदेखिल संसर्ग होतो.

फ्लू झालेल्या व्यक्तीपासून दुसर्यांना कशाप्रकारे संसर्ग होऊ शकतो

संसर्ग झालेल्या व्यक्ती आजारी पडण्याच्या एक दिवस आधी ते आजारी पडल्यानंतर सात किंवा जास्त दिवस इतरांपर्यंत हा रोग पसरवू शकतात. म्हणजे आपण आजारी आहोत हे माहित व्हायच्या आधीच आणि आजारी असतांना देखील तुम्ही इतरांना संसर्ग करू शकता.

फ्लू होऊ नये म्हणून मी काय करावे

प्रथम आणि सर्वांत महत्वाचे: तुमचे हात धुवा (म्हणजे स्वच्छ ठेवा). आरोग्य चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. भरपूर झोप घ्या, सक्रिय रहा, तणाव दूर ठेवण्याचा प्रयत्न करा, भरपूर प्रमाणात पेये घ्या आणि पौष्टिक आहार घ्या. फ्लूचा विषाणू असण्याची शक्यता असलेल्या जागी स्पर्श करणे टाळा. आजारी लोकांचा संपर्क टाळा.

आजारी पडण्यापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी मी काय करू

सध्यातरी स्वाइन फ्लू ह्या रोगापासून बचाव करण्यासाठी कोणतीही लस उपलब्ध नाही. मात्र दैनंदिन व्यवहारातील काही उपायांमुळे श्वसनासंबंधी विकारांचा संसर्ग होण्यापासून तुमचा बचाव होऊ शकतो. तुमच्या आरोग्याची काळजी खालीलप्रमाणे घ्या

  • खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड झाकून घ्या.
  • साबण व पाण्याचा वापर करून हात वारंवार धुवा, विशेषत: खोकल्यावर किंवा शिंकल्यावर. अल्कोहोल-आधारित हस्तप्रक्षालक (हँड क्लीनर) प्रभावी ठरतात.
  • डोळे, नाक आणि तोंड यांना स्पर्श करणे टाळा. अशानेच जंतूंचा प्रसार होतो.
  • आजारी माणसांचा संपर्क टाळा.
  • जर तुम्हांला इंफ्लुएंझा झाला तर, तुम्ही बाहेर न पडता घरातच बसून राहावे म्हणजे रोगाचा प्रसार जास्त होणार नाही.

खोकणे किंवा शिंकणे यांपासून व्हायरसचा प्रसार होऊ नये या साठी उत्तम उपाय कोणता

जर तुम्ही आजारी असाल तर, शक्यतो लोकांशी संपर्क टाळा. आजारी असल्यास शाळेत किंवा कामावर जाऊ नका. खोकताना आणि शिंकताना नाक आणि तोंड टिपकागदाने झाकून घ्या. तुमच्या सभोवती असलेल्या व्यक्तींचा ह्यामुळे या रोगापासून बचाव होऊ शकतो. वापरलेला टिपकागद केराच्या डब्यात टाका. टिपकागद नसल्यास शिंक किंवा खोकला हाताने झाका. त्यानंतर हात स्वच्छ धुवा आणि असे प्रत्येक वेळी करा.

फ्लूपासून बचाव व्हावा यासाठी हात धुण्याची उत्तम पध्दत कोणती?

वारंवार हात धुण्याने तुम्हांला जंतूंपासून संरक्षण मिळते. साबण आणि पाण्याने हात धुवा किंवा अल्कोहोल-आधारित हँड क्लीनरने हात धुवा. हात कोमट पाणी आणि साबण वापरून धुत असाल तर ते कोमट पाण्याने 15 ते 20 सेकंद स्वच्छ धुवावेत. जर साबण आणि पाणी उपलब्ध नसेल तर अल्कोहोल-आधारित डिस्पोजेबल हँड क्लीनर वाइप्स किंवा जेल सॅनिटायझर्स वापरा. हे तुम्हाला सुपर मार्केट किंवा औषधांच्या दुकानामध्ये मिळतील. जेलचा वापर केल्यास हात कोरडे होईपर्यंत चोळत राहा. जेलसाठी पाण्याची गरज नसते, यांतील अल्कोहोल तुमच्या हाताच्या जंतूंचा नाश करते.

जर तुम्ही आजारी असाल आणि खालीलपैकी कोणती ही लक्षणे आढळली तर, ताबडतोब वैद्यकीय मदत घ्या.

मुलांमध्ये आढळणारी आणि ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज असलेली लक्षणे खाली दिली आहेत

  • जलद श्वास घेणे किंवा श्वासोच्छवास करण्यास त्रास होणे
  • त्वचेचा रंग निळसर होणे
  • पुरेसे द्रवपदार्थ न पिणे
  • जागे न होणे किंवा न बोलणे
  • मूल इतके चिडचिडे होणे की त्याला उचलून घेणे देखील आवडत नसणे
  • फ्लू सारखी लक्षणे आढळणे पण त्यानंतर ताप आणि भयंकर खोकल्यासह परतणे
  • पुरळ येऊन ताप येणे

प्रौढांमध्ये, ताबडतोब वैद्यकीय मदतीची गरज असलेली लक्षणे खाली दिली आहेत

  • श्वास घेण्यास त्रास होणे किंवा श्वास न घेता येणे
  • छाती किंवा पोटात दाब पडल्यासारखे वाटणे किंवा दुखणे
  • अचानक चक्कर येणे
  • संभ्रम पडणे
  • गंभीर किंवा वारंवार उलट्या होणे

 

 

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 6/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate