অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

औषधिस्वरूपविज्ञान

औषधिस्वरूपविज्ञान

औषधिस्वरूपविज्ञान

या विज्ञानात प्राणिज व वनस्पतिज अशा नैसर्गिक औषधिद्रव्यांचे उद्‌गम तसेच या औषधिद्रव्यांतील क्रियाशील घटकांचे जैव संश्लेषण (घटक द्रव्यांपासून सजीवांच्या शरीरात आवश्यक पदार्थ तयार करणे) व त्यांचे अभिज्ञान (अस्तित्व ओळखणे) यांच्या संबंधीच्या अभ्यासाचा समावेश होतो. ही संज्ञा गेल्या दीड शतकातच वापरात असली, तरी ह्या शास्त्राचा उगम मात्र फार प्राचीन काळी झालेला आहे. त्यामध्ये वनस्पती व औषधे ह्यांचे गुणधर्म व उपयोग वर्णिलेले आहेत. औषधी वनस्पतींचे ज्ञान मुख्यत्वे धर्मपीठ व विद्यालये ह्यांच्या द्वारेच प्रसारित झाले. सोळाव्या शतकाच्या सुरुवातीस वनस्पतिशास्त्रज्ञांनी वनस्पतींची वर्णने, त्यांने गुणधर्म व उपयोगांविषयी चर्चा केलेली आढळते. वनस्पतिविज्ञान व रसायनशास्त्र ह्यांच्या प्रगतीमुळे औषधिस्वरूपविज्ञान हे एक वेगळे शास्त्रच झाले.

ह्या विज्ञानाचा संबंध वनस्पतिज व प्राणिज कच्च्या औषधींशी येतो. या औषधी सुकविण्याच्या वा गोठविण्याच्या पद्धती व वनस्पतींच्या निरनिराळ्या भागांच्या गुणधर्मांचा साकल्याने अभ्यास करणे या विज्ञानात आवश्यक ठरतेच.

प्रथमतः औषध ज्या वनस्पतीपासून किंवा प्राण्यापासून मिळविण्यात आले असेल त्याचे लॅटिन भाषेतील नाव व कुल वर्णावे लागते. कुलच पुष्कळशा गुणधर्मांविषयी सांगू शकते. त्यानंतर कोणत्या भौगोलिक भागात ते आढळते व त्याची वाहतूक कशी करावयाची ते सांगावे लागते. नंतर लागवड व संवर्धन (वाढ), संग्रह करणे व बाजारपेठेसाठी योग्य ते स्वरूप देणे ह्या गोष्टींकडे काळजीपूर्वक पहावे लागते, कारण बाह्य स्वरूप व दर्जा ह्या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात. औषधांची स्थूल रचना व त्यातील लहानसहान बाबींचेही ज्ञान आवश्यक असते. तसेच सूक्ष्मदर्शीय गुणधर्म व त्यांचा विशेष अभ्यास हे औषधिस्वरूपविज्ञानाचे महत्त्वाचे अंग आहे. बाजारात विकल्या जाणाऱ्या औषधाचा नमुना अभ्यासावयाचा असेल तेव्हा त्याचा दर्जा ठरविणे, त्याऐवजी कोणता पदार्थ बेमालूमपणे वापरणे शक्य आहे त्याचे ज्ञान व भेसळ हे सर्व समजणे आवश्यक असते. औषधाची शुद्धता व गुणधर्म ठरविणे हेही महत्त्वाचे कार्य असते.

औषधिस्वरूपविज्ञानामध्ये वनस्पतिज व प्राणिज औषधींच्या उगमस्थानाविषयीच्या माहितीपासून बाह्य व आंतर गुणधर्म व शुद्ध आणि दर्जेदार औषध तयार करण्यास आवश्यक अशा प्रक्रियांचे ज्ञान अंतर्भूत असते.

काही औषधे केवळ योग्य लागवड व संवर्धनानेच प्राप्त केली जातात. वेलदोडे, दालचिनी, अफू, गांजा ही काही उदाहरणे देतायेतील. अरण्यात वाढणाऱ्या वनस्पतींपासून त्यांच्या तुरळकपणामुळे व काही वेळा दुर्गमतेमुळे औषधे पुरेशा प्रमाणात प्राप्त होतनसल्यामुळे लागवड व संवर्धनाचा मार्ग स्वीकारावा लागतो. सरकारी नियंत्रण असलेली अफूसारखी औषधे देणाऱ्या वनस्पतीहीमुद्दाम संवर्धित करणे श्रेयस्कर असते. ह्यामुळे औषधाची गुणवत्ताही वाढते कारण जमिनीची योग्य मशागत, वनस्पतींची निगा वकिडीपासून संरक्षण ह्या गोष्टी वनस्पतींच्या वाढीला फारच उपकारक ठरतात. तसेच संग्रह केल्यानंतर ठराविक तापमानालासुकविणे वगैरे गोष्टीही फार सुलभ होतात.

औषधांच्या मूळ स्थानावरून त्यांच्या काही जाती पाडता येतात. वनस्पतिज, प्राणिज, खनिज व संश्लेषणात्मक (कृत्रिमरीत्यातयार केलेले) असे वर्ग करता येतील. संश्लेषण पद्धतीने तयार करण्यात येणाऱ्या औषधांची संख्या अगणित आहे. रसायनशास्त्रज्ञाचीप्रयोगशाळा हे औषधांचे प्रमुख उत्पत्तिस्थान होय. उदाहरणेच द्यावयाची तर अफू, डिजॉक्सिन, इन्शुलीन ही देता येतील.प्राणिज औषधांपैकी यकृतार्क अनेक वर्षे पांडुरोगाच्या (अ‍ॅनिमियाच्या) उपचारासाठी वापरण्यात येत होता. गंधक, लोह, आयोडीनह्यांसारखी खनिज द्रव्येही चिकित्सेत वापरण्यात येतात, पण पूर्वीच्या काळातील पुष्कळशी औषधे वनस्पतींच्या निरनिराळ्याभागांपासून तयार करण्यात आलेली आढळतात.

औषधी वनस्पतींपासून उपचारासाठी अनेक घटक उपलब्ध होतात. अनेकदा रासायनिकदृष्ट्या शुद्ध स्वरूपातील औषधे वापरलीजातात असे नाही, तर रासायनिक संघटन माहीत नसतानाही ती वापरली जातात. वैद्यकीयदृष्ट्या महत्त्वाचे असलेले वनस्पति-घटक हे रासायनिकदृष्ट्या विविध प्रकारचे असतात. वनस्पती सुकविणे, साठविणे व त्यांचा अर्क काढणे ह्या सर्वांकरितासर्वसाधारण वनस्पति-घटकांच्या गुणधर्मांविषयी माहिती असणे आवश्यक असते.

वसाम्‍ले, स्थायी तेले, वसा, मेण, फिनॉले, टॅनिने, प्रथिने, अल्कलॉइडे, कार्बोहायड्रेटे, ग्‍लायकोसाइडे, डिंक, म्युसिलेजे व पेक्टीनल,बाष्पनशील (लवकर उडून जाणारी) तेले, रेझिने, डिंक-राळ, रंजकद्रव्ये, व प्रतिजैव (अँटिबायॉटिक) पदार्थ असे वनस्पति-घटकांचेवर्गीकरण करता येईल. ह्यांतील काही वनस्पति-घटकांविषयी विशेष माहिती खाली दिली आहे.

 

स्त्रोत: मराठी विश्वकोश

अंतिम सुधारित : 7/30/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate