नवाश्मयुगाच्या शेवटी (इ. स. पू. ८००० ते इ. स. पू. ३०००) ईजिप्शियन राजांच्या शवपेटिका दगडांच्या, भव्य व रंगीत होत्या; त्यांवर पपायरसचे आच्छादन करून शवाचे चरित्रात्मक टिपण चित्रलिपीत करीत. नंतरच्या काळात लाकडी किंवा चुनखडीच्या शवपेटिका वापरता आल्या. ⇨ तूतांखामेन (इ. स. पू. १३६६ ?– १३५० ?) यांच्या काळात सोन्याच्या किंवा चांदीच्या शवपेटिका तयार करीत. प्राचीन ग्रीक समाजात भाजक्या मातीच्या घटाकार, षटकोणी किंवा त्रिकोणी आकाराच्या शवपेटिका वापरत. ख्रिस्ती धर्माच्या उदयानंतरच्या युरोपात दगडांच्या शवपेटिका होत्या. रोमन लोक चुनखडीच्या दगडांच्या शवपेटिका वापरीत.
मध्ययुगीन युरोपात रंगविलेल्या व नक्षीकाम केलेल्या, लाकडी शवपेटिका वापरत. सतराव्या शतकात लोखंडी शवपेटिकांचा वापर सुरू झाला. अमेरिकेत काही मृत झालेल्या पाळीव प्राण्यांसाठीही शवपेटिका वापरतात.
वीरमरण आलेल्या सैंनिकांचा पार्थिव देह त्यांच्या जन्मगावी नेण्यासाठीही शवपेटिकांचा वापर करण्यात येतो.
पहा : अंत्यविधी व अंत्यसंस्कार.
अवचट, प्र. प्र.
स्त्रोत: मराठी विश्वकोश
अंतिम सुधारित : 1/29/2020
सामान्यपणे दगड, माती, लाकूड, लोखंडादी धातू अशा विव...