অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

सुरक्षित मातृत्वची खात्री करणे

सुरक्षित मातृत्वची खात्री करणे

सुरक्षित मातृत्व म्हणजे सर्व महिलांना गर्भधारणा आणि बाळाचा जन्म या प्रक्रियेतून सुरक्षितपणे जाण्यासाठी माहिती आणि सेवांची सुविधा उपलब्ध असण्याची खात्री करणे. त्यात पुढील बाबी समाविष्ट होतात –

  • सुरक्षित मातृत्वाबाबत शिक्षण
  • उच्च धोका असलेल्या गर्भधारणांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन जन्मपूर्वनिगा आणि समुपदेशन
  • मातेच्या पोषाहाराबाबत जागृती
  • सर्व प्रकरणांत प्रसुतिसाठी पुरेशी मदत
  • गर्भधारणा, बाळाचा जन्म आणि गर्भपाताची गुंतागुंत यांच्यासाठी संदर्भात्मक सेवांसह प्रसुतीकालीन आणीबाणीच्या प्रसंगांसाठी तरतूद
  • बाळजन्मानंतरची निगा

मातांच्या मृत्युमागील सामान्य कारणे

माता मृत्युची कारणे 3 श्रेणींमधे विभागता येतील – सामाजिक, वैद्यकीय आणि वैद्यकीय निगाविषयक सोयींची उपलब्धता.

सामाजिक कारणे

वैद्यकीय कारणे

वैद्यकीय निगाविषयक सोयींची उपलब्धता.

  • लवकर विवाह आणि गर्भधारणा
  • वारंवार बाळंतपण
  • मुलगा होण्यासाठीच आग्रह
  • अशक्तपणा
  • धोक्याची चिन्हे आणि लक्षणे याबाबत अज्ञान
  • तपासणी करण्यात विलंब
  • प्रसुतिदरम्यान अडचणी
  • रक्तस्त्राव (कळांदरम्यान प्रसुतिपूर्व आणि प्रसुतीनंतर
  • विषरक्तता
  • संक्रमण किंवा पू होणे
  • केंद्रांमधे अत्यावश्यक पुरवठा आणि प्रशिक्षित आरोग्य कर्मचा-यांचा अभाव
  • आरोग्य कर्माचा-यांची अनास्था
  • गुंतागुंतीच्या प्रसंगात अपुरा वैद्यकीय उपचार
  • वैद्यकीय कर्मचा-यांव्दारे अपुरी कार्यवाही

प्रसुतिपश्चात् निगा म्हणजे एखाद्या गर्भवती महिलेला दिलेलं आरोग्य शिक्षण आणि नियमित वैद्यकीय तपासणी, जेणेकरुन लवकर निदान आणि ऊपचाराव्दारे गर्भधारणेचा निष्कर्ष सुरक्षित लावणे, मातेमधे विकृती आणि मृत्यु होण्याची प्रकरणं कमी करता येतील. उच्च धोका असलेली गर्भधारणा आणि उच्च धोक्याची प्रसुति वेदना लक्षणे तपासण्यासाठी देखील प्रसुतिपश्चात् निगा आवश्यक आहे. प्रसुतिपश्चात् निगेचे महत्वाचे भाग पुढीलप्रमाणे आहेतः

लवकर नोदणी करणेः गर्भधारणेची शंका आल्यानंतर लगेचच प्रसुतीपूर्व केंद्रात एखाद्या गर्भवती महिलेनं नोंदणीसाठी पहिली भेट दिली पाहिजे. पुनरुत्पादकक्षम वयातील प्रत्येक विवाहित महिलेनं, तिला आपण गर्भवती असल्याचे वाटल्यास तिला आपल्या आरोग्यसेवा केंद्रात भेट देण्यास किंवा माहिती देण्यास प्रोत्साहन द्यावे. आदर्शवत, पहिली भेट ही पहिल्या तिमाहीत (गर्भधारणेच्या पहिल्या तीन महिन्यांमधे), गर्भधारणेच्या 12 व्या आठवड्यापूर्वी किंवा त्यावेळी देण्यात यावी. तथापि, एखादी महिला आपल्या गर्भधारणेची नोंद उशीरा करण्यास आली असेल, तरी तिची नोंदणी करण्यात यावी आणि गर्भाच्या वयानुसार तिला निगा देण्यात यावी.

जी प्रसुतिपूर्व केंद्रं सुनियोजित आहेत तिथं काही गर्भवती महिला स्वतःहूनच येतील. तथापि अनेकजणी येणार नाहीत. अशावेळी आरोग्य निगा प्रदानकर्त्याने, आंगणवाडी कार्यकर्ता, पारंपरिक सुईण । दाई, महिला मंडळांचे सदस्य, स्वयंसहायता गट, पंचायत आणि ग्राम आरोग्य समित्या अशा गर्भवती महिलांबाबत माहिती असू शकणा-या समुदाय आधारित व्यक्तिंच्या मदतीनं यादी सुधारुन त्यानुसार सेवा पुरवावी.

लवकर नोंदणी करण्याचे महत्व
  • मातेच्या आरोग्याचे मूल्यमापन करता येते आणि रक्तदाब, वजन इत्यादी मूलभूत माहिती गोळा करता येते.
  • गुंतागुंतीची चाचणी लवकर करता येते आणि तपासणीसाठी पाठवून त्याचे योग्य व्यवस्थापन करता येते.
  • संबंधित महिलेला तिच्या मासिक पाळीची तारीख आठवण्यात मदत होते.
  • संबंधित महिलेला, टीटॅनस टॉक्सॉईडच्या इंजेक्शनचा पहिला डोस वेळेतच देता येतो (गर्भधारणेच्या 12 आठवड्यानंतर)
  • संबंधित महिलेला आपली गर्भधारणा पुढे चालू ठेवायची नसेल तर लगेचच आणि सुरक्षितपणे गर्भपात करण्यासाठी सोयींचा लाभ घेण्यास मदत करता येते.
  • संबंधित गर्भवती महिला आणि आरोग्य कार्यकर्ता यांच्या दरम्यान मजबूत नातं निर्माण करता येते.

शारीरिक तपासणी

वजन

एखाद्या गर्भवती महिलेचं वजन प्रत्येक भेटीच्या वेळेस तपासून पाहावे. सामान्यतः गर्भधारणेदरम्यान त्या महिलेचं वजन 9-11 किलोंनी वाढतं. पहिल्या तिमाहीनंतर, प्रत्येक गर्भवती महिलेचं दर महिन्याला 2 किलो किंवा दर आठवड्याला अर्धा किलो वजन वाढतं. तिचा आहार जर योग्य नसेल, आवश्यक कॅलरीजपेक्षा कमी असेल, तर त्या महिलेचं वजन गर्भधारणेदरम्यान केवळ 5-6 किलोंनीच वाढेल. त्या महिलेचं वजन दर महिन्याला 2 किलोपेक्षा कमी वाढलं असेल तर तिला पुरेसा आहार मिळत नाही अशी शंका घेता येईल. तिला पूरक आहारावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. कमी प्रमाणात वजन वाढण्याचा हा संकेत असतो की गर्भाशयातील वाढ मंदावली आहे आणि त्याचा परिणाम बाळाच्या जन्मावेळी त्याचं वजन कमी राहण्यात होतो. अधिक वजन वाढण्यानं (एका महिन्यात 3 किलोपेक्षा जास्त) अशी शंका घेता येईल की प्रि-एक्लॅम्पसिया / जुळे असण्याची शक्यता आहे. तिला वैद्यकीय अधिका-यांकडे पाठवण्यात यावे.

उंची

मातेची उंची आणि प्रसुतिचा निष्कर्ष यांच्या दरम्यान एक संबंध आहे, किमान एखाद्या अगदी कमी उंचीच्या महिलेत लहान कटीभाग असण्यामुळे धोका वाढण्याची आंशिक शक्यता असते. 145 सेंटीमीटरपेक्षा कमी उंची असलेल्या नल्लीपॅरस महिलांना प्रसुतिच्या वेळी आकारमान बिघडण्याचा वाढीव धोका असतो आणि म्हणून त्यांना उच्च धोका असलेल्या माता म्हटलं जातं आणि त्यांच्यासाठी रुग्णालयात प्रसुति करवून घेण्याची शिफारस केली जाते.

रक्तदाब

गर्भधारणेतील अतितणावाच्या व्याधींची शहानिशा करण्यासाठी गर्भवती महिलांचा रक्तदाब नोंदवणे महत्वाचे आहे. हा रक्तदाब उच्च असेल (140/90 एमएम किंवा डायस्टोलीक 90 एमएम पेक्षा अधिक असेल) आणि लघवीमधे अल्ब्युमिन उपस्थित असेल तर त्या महिलेला प्रि-एक्लॅम्पसिया असल्याचे निदान करता येऊ शकते. जर डायस्टोलीक रक्तदाब 110 एमएम पेक्षा जास्त असेल तर त्या महिलेला हमखास एक्लॅम्पसिया झाल्याचा गंभीर इशारा मिळतो. अशा महिलेला तत्काळ CHC/FRU कडे पाठविण्यात यावे. एखाद्या महिलेला गर्भधारणेमुळं उच्च रक्तदाब / प्रि-एक्लॅम्पसिया निर्माण झाला असेल तर तिला रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते.

पॅलर

गर्भवती महिलेचे पाल्पेब्रल नेत्रश्लेष्म, हातांचे तळवे आणि नखे, तोंडातील लाळ आणि जीभ फिकट दिसत असतील तर, त्या महिलेला अशक्तपणा असल्याचं सूचित होतं.

श्वसनाचादरः

संबंधित महिला श्वास लागण्याची तक्रार करत असेल तर तिचा श्वसनाचा दर मोजणे महत्वाचे आहे. जर हा दर प्रति मिनिट 30 श्वासापेक्षा जास्त असेल आणि फिकटपणा दिसत असेल तर त्या महिलेला तीव्र अशक्तपणा असल्याचं सूचित होतं आणि तिला तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

सामान्य जलशोफ

सामान्य जलशोफाची उपस्थिती, चेह-यावर खरखरीतपणातून दिसते आणि प्रिएक्लॅम्पसियाची शंका घेण्यास वाव असतो.

ओटीपोटाची तपासणीः

गर्भधारणेची प्रगती आणि गर्भाची वाढ तसंच गर्भाची स्थिती यांवर देखरेख ठेवण्यासाठी ओटीपोटाची तपासणी करण्यात यावी.

लोह – फॉलीक असिड (आयएफए) पूरक पुरवठाः

गर्भधारणेदरम्यान लोहाची वाढीव गरज आणि गर्भवती महिलांना अशक्तपणाचे धोके भर देऊन सांगावेत. सर्व गर्भवती महिलांना, गर्भधारणा झाल्यानंतर 14-16 आठवड्यांनी पहिल्या तिमाहीनंतर, किमान 100 दिवस दररोज आयएफएची एक गोळीची (100 मिलिग्रॅम मूलभूत लोह आणि 0.5 मिलीग्रॅम फॉलीक असिड) गरज असते. अशक्तपणा टाळण्यासाठी देण्यात येणारा हा आयएफएचा डोस आहे (रोग-प्रतिबंधक डोस). एखादी महिला अशक्त असेल (Hb<g/dl) किंवा तिला फिकटपणा असेल, तर तिला 3 महिने दररोज आयएफएच्या दोन गोळ्या द्या. याचा अर्थ गर्भधारणेत अशक्तपणा असणा-या महिलेला किमान 200 आयएफए गोळ्या घेणे आवश्यक आहे. आयएफएचा हा डोस अशक्तपणा बरा करण्यासाठीचा आहे (उपचाराचा डोस). ज्या महिलांना तीव्र स्वरुपाचा अशक्तपणा आहे ((Hb<7g/dl) किंवा ज्यांना अशक्तपणामुळे श्वसनाचा त्रास आणि टॅकीकार्डीआ आहे, त्यांना आयएफएचा उपचारात्मक डोस चालू करावा आणि पुढील व्यवस्थापनासाठी डॉक्टरकडे पाठविण्यात यावं.

टीटॅनस टॉक्सॉईड इंजेक्शन देणेः

नवजात बालकाला धनुर्वात होणे टाळण्यासाठी एखाद्या गर्भवती महिलेला TT इंजेक्शनचे दोन डोस देणे हे महत्वाचे आहे. यापैकी टीटॅनसचा पिहला डोस हा पहिल्या तिमाहीनंतर, किंवा ती महिला प्रसुतिपूर्व निगेसाठी नांव नोंदवेल त्यावेळी लगेच, यापैकी जे आधी असेल त्यावेळी देण्यात यावा. टीटीचे इंजेक्शन हे गर्भधारणेच्या पहिल्या तिमाहीत द्यायचे नसते. दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या एक महिन्यानंतर, परंतु अपेक्षित प्रसुती तारखेच्या किमान एक महिना आधी देण्यात आला पाहिजे.

गर्भधारणेतील पोषाहार

उदरात वाढणारा गर्भ मातेच्या आरोग्याची देखभाल, कळांदरम्यान लागणारी शारीरिक शक्ती आणि यशस्वीपणे दूध येण्यासाठी सर्व गरजा पूर्ण होतील असा एखाद्या गर्भवती महिलेचा आहार असावा. गर्भाच्या वाढीसाठी प्रथिनंयुक्त पदार्थ अत्यावश्यक असतात. शक्य असेल तर, गर्भवती महिलेनं भरपूर प्रमाणात दूध, अंडी, मासे, कोंबडी मांस आणि मांस आहारात घ्यावे. ती शाकाहारी असेल तर, तिला विविध प्रकारची कडधान्ये, भरपूर प्रमाणात डाळी आणि बदाम-अक्रोड आवश्यक आहेत.

लोह हे बाळाच्या रक्तनिर्मितीसाठी खूप महत्वाचे आहे आणि अशक्तपणा कमी करण्यासाठी / टाळण्यासाठी, तिने साखरेऐवजी गूळ खावा, रागी किंवा बाजरीचे पदार्थ खावेत, तिळ आणि भरपूर प्रमाणात गर्द हिरव्या पालेभाज्या खाव्यात. यकृत आणि मूत्रपिंड हे देखील लोहाने समृध्द असतात.

कॅल्शिअम हे बाळाच्या हाडं आणि दातांच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत. कॅल्शिअमचा सर्वात चांगला स्रोत म्हणजे दूध. कॅल्शिअम हे रागी आणि बाजरीतसुध्दा उपलब्ध असते. तिला लहान वाळवलेले मासे खाण्यास देखील प्रोत्साहन द्यावे. गर्भवती महिलेसाठी जीवनसत्वं महत्वाची आहेत. तिने भरपूर प्रमाणात पालेभाज्या (विशेषतः गर्द हिरव्या पालेभाज्या) आणि लिंबूर्गीयसह फळे खावीत.

सुधारितआहार

जलशोफ टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी आहारातील मिठाचे प्रमाण कमी असावे. गर्भवती महिलेचा आहार सामान्य असेल परंतु तिने खारट पदार्थ टाळावेत, आणि अन्न शिजवताना थोडे मीठ वापरावे किंवा अजिबात वापरु नये. विशेषतः लघवीमधे श्वेतक असेल तर, विषबाधा टाळण्यासाठी उच्च प्रथिनंयुक्त आहार घ्यावा. मातेनं प्रथिनंयुक्त पदार्थांचे सेवन वाढवण्यासाठी तिला सल्ला देण्यात यावा.

कामाचे प्रमाण विश्रांती आणि झोप

गर्भधारणेदरम्यान अति प्रमाणात शारीरिक श्रम केल्याने गर्भाधारणेशी संबंधित समस्या उद्भवतात, जसे, गर्भपात होणे, अवेळी कळा येणे किंवा कमी वजनाचे बाळ जन्मणे, विशेषतः त्या मातेचा आहार कमी असेल तर अशा समस्या होतात. त्यामुळं महिलांना गर्भधारणेदरम्यान अति प्रमाणात शारीरिक श्रम टाळण्यास सांगावे. जर त्यांना काम पूर्णपणे टाळता येत नसेल तर, कामांच्या दरम्यान त्यांना शक्य तितकी विश्रांती मिळण्याची खात्री करावी. एखाद्या गर्भवती महिलेला देखील शक्य तितकी विश्रांती मिळणे आवश्यक आहे. तिने आडवे पडून आराम करावा.

गर्भधारणे दरम्यान लक्षणे

अस्वस्थता दर्शविणारी लक्षणे

गुंतागुंत होऊ शकते असे सूचित करणारी लक्षणे

  • मळमळणे आणि उलट्या होणे
  • छातीत जळजळ
  • बध्दकोष्ठ
  • वारंवार लघवीला लागणे
  • ताप
  • योनीमार्गातून स्त्राव
  • धडधडणे, सहजपणे थकणे आणि आराम करताना श्वास लागणे
  • एकंदर शरीरावर सूज येणे, चेहरा फुलणे
  • थोडीथोडी लघवीला होणे
  • योनीतून रक्तस्त्राव होणे
  • गर्भाची हालचाल मंदावणे किंवा नसणे
  • योनीवरुन पाण्यासारखा द्रव वाहणे

आजार

गर्भवती असताना आजारी पडणे अस्वस्थ करणारे आणि न आवडणारे असते, अंशतः यासाठी की हा गर्भधारणेचा काळ असतो आणि अंशतः यासाठी की या काळात काही औषधे टाळायची असतात. आणखी म्हणजे हिवतापासारखे काही रोग गर्भधारणेदरम्यान गंभीर समस्या निर्माण करु शकतात. या कारणांमुळं महिलांनी त्या गर्भवती असताना रोग आणि संक्रमणं टाळण्याची काळजी घेतली पाहिजे. उदाहरणार्थ, झोपतेवेळी मच्छरदाणीचा वापर करावा आणि पाणी जे शिस्टोसोमियासिस सारखे रोग पसरवण्याची शक्यता असते, ते टाळावे.

वैयक्तिक स्वच्छता

दररोज अंघोळ करण्याने ताजेतवाने वाटते आणि त्यामुळे एखादे संक्रमण किंवा आजार टाळता येतो. स्तन आणि गुप्तांगांना स्वच्छ पाण्याने धुऊन त्यांची काळजी घेण्यासाठी ते विशेषत्वानं आवश्यक आहे. खरखरीत रसायनं किंवा डीटरजन्टस् आवश्यक नाहीत आणि ती नुकसानकारक ठरु शकतात. हलक्या कॉटनपासून बनवलेले ढीले कपडे वापरायला चांगले. योग्य मापाच्या ब्रेसिअर्स स्तनांना, ते जसजसे मोठे आणि नाजूक होतात तसे, आधार देण्यात मदत करतात.

गर्भधारणेदरम्यान समागम

गर्भधारणा सामान्य स्वरुपाची असेल तोवर त्या संपूर्ण काळात समागम करणे सुरक्षित असते. गर्भपाताचा धोका असेल (पूर्वी वारंवार आपोआप गर्भपात होण्याचा इतिहास असेल) किंवा मुदतपूर्व प्रसुतिचा धोका (यापूर्वी मुदतपूर्व प्रसुतिचा इतिहास असेल) असेल तर याकाळात समागम टाळावा. काही महिलांना गर्भधारणेदरम्यान समागमाची इच्छा कमी झाल्याचा अनुभव येतो. असं वाटणं हे सामान्य आहे आणि समागम करण्यापूर्वी आपल्या पत्नीची संमती घ्यावी असा सल्ला पुरुषाला देण्यात यावा. काही दाम्पत्यांना या काळात समागम करणं अवघड वाटतं. समागमादरम्यान महिलेच्या पतीने तिला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.

बाळजन्माची आणि संकटाला तोंड देण्याची तयारी

दहापैकी चार गर्भवती किंवा प्रसुति झालेल्या मातांना त्यांच्या गर्भधारणेशी संबंधित काही गुंतागुंतीचा अनुभव येतो. यापैकी 15 टक्के महिलांना ते जीवाला घातक ठरु शकतं आणि त्याना तत्काळ प्रसुतीकालीन नीगेची गरज लागू शकते. यापैकी बहुतांश गुंतागुंतींचं आधीच निदान करता येत नसल्यानं, प्रत्येक गर्भधारणा ही संभाव्य आपात्कालीन स्थितीच्या तयारीनेच पाहावी लागते.

बाळजन्माची तयारी

सर्व गर्भवती महिलांना एक संस्थात्मक प्रसुतिसाठी प्रोत्साहित करण्यात यावे. प्रसुतिदरम्यान कोणतीही गुंतागुंत उद्भवू शकते. गुंतागुंत ही नेहमीच आधी कळू शकेल असं नाही, त्यांच्यामुळं मातेचं आणि किंवा बाळांचं जीवन धोक्यात येऊ शकतं.

एखाद्या आरोग्य सुविधा केंद्रात, कर्मचारी, उपकरणं, पुरवठा आणि औषधं आवश्यक तेव्हा चांगली निगा पुरविण्यासाठी उपलब्ध असतात. तपासणीची गरज निर्माण झाल्यास त्यामधे तशी यंत्रणा देखील असते.

आधार कर्मचा-यांची माहिती घेणेः संबंधित महिलेला तिच्या मुलांची निगा घेण्यात, आणि किंवा तिच्या घराची काळजी घेण्यात, वाहतुकीची व्यवस्था करण्यात, एखाद्या आपात्कालीन स्थितीत त्या महिलेसोबत आरोग्य केंद्रापर्यंत घेऊन जाण्यात हे कर्मचारी मदत करतात. जवळचे नातेवाईक किंवा समुदाय-आधारित आरोग्य कार्यकर्ते जसे, AWW आणि TBA यांच्याकडून मदत घ्यावी.

आर्थिक खर्च

प्रसुति आणि तत्संबंधी गोष्टींच्या खर्चाचा अंदाज संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबाला देण्यात यावा. एखादी आपात्कालीन स्थिती उद्भवल्यास किंवा आधीच्या अंदाजापेक्षा अधिक खर्च आल्यास तयारी म्हणून त्यांना वरकड पैसै किंवा तातडीनं पैसे उभे करण्याची सोय करुन ठेवण्यास सांगावे. माता आरोग्यासाठी निधी पुरविणा-या विद्यमान योजना आणि वेळोवेळी सुरु करण्यात येणा-या योजनांची माहिती त्यांना करुन देण्यात यावी.

कळा सुरु होण्याची लक्षणेः कळा सरु होण्याचे सूचित करणारी पुढीलपैकी कोणतीही चिन्हे दिसून आल्यास त्या महिलेला आरोग्य सुविधा केंद्रत जाण्यास किंवा SBA ला संपर्क करण्यास सांगावे.

  • एक रक्तयुक्त चिकट स्त्राव
  • दर 20 मिनिटांनी किंवा कमी अंतरानं वेदनायुक्त ओटीपोटात आकुंचन येणे
  • पाण्याची पिशवी फुटून योनीतून पाणी बाहेर येणे

गुंतागुंतीच्या स्थितीची तयारी

धोक्याची चिन्हेः गर्भधारणा, प्रसुती आणि प्रसुतिपश्चात् काळातील संभाव्य धोक्याची चिन्हे दिसल्यास त्याची माहिती संबंधित महिलेला आणि तिचे कुटुंबीय / काळजीवाहक यांना देण्यात यावी. गर्भधारणा, प्रसुती आणि प्रसुतिपश्चात् काळातील संभाव्य धोक्याची चिन्हे दिसल्यास तिने वाट न पाहता, तत्काळ एखाद्या रुग्णालयाला भेट द्यावी हे तिला हमखास सांगण्यात यावे.

पुढीलपैकी कोणत्याही परिस्थितीत त्या महिलेने एखाद्या FRU ला भेट द्यावीः

  • गर्भधारणेदरम्यान कोणताही रक्तस्त्राव, प्रसुतिदरम्यान आणि पश्चात् योनीमार्गे अत्याधिक (500 मिलीपेक्षा जास्त) रक्तस्त्राव
  • तीव्र डोकेदुखी सोबत अंधुक दिसणे
  • उलट्या होणे किंवा शुध्द हरपणे
  • कळा येण्याची स्थिती 12 तासांपेक्षा जास्त राहणे
  • प्रसुतिनंतर 30 मिनिटांच्या आंत नाळ बाहेर न येणे
  • मुदतीपूर्वीच कळा येणे (गर्भधारणेचे 8 महिने होण्यापूर्वीच कळा सुरु होणे)
  • पडदा वेळेपूर्वीच किंवा कळा येण्यापूर्वीच फाटणे
  • सतस ओटीपोटात वेदना होणे

संबंधित महिलेने खालीलपैकी कोणत्याही स्थितीत 24-तास प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट द्यावीः

  • ओटीपोटात वेदनेसह किंवा त्याविना उच्च ताप, आणि बिछान्यातून बाहेर न येण्याइतका अशक्तपणा येणे
  • जलद अथवा अवघड श्वासोच्छवास होणे
  • गर्भाची हालचाल मंदावणे किंवा नसणे
  • अति प्रमाणात उलट्या होणे, ज्यामधे त्या महिलेला तोंडावाटे काहीही घेणे शक्य न होणे, त्यामुळे लघवीचे प्रमाण कमी होणे.

जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र / FRU चे ठिकाण

संबंधित महिला आणि तिच्या कुटुंबियांना नजिकच्या आरोग्य सेवा केंद्राबाबत माहिती असणे आवश्यक आहे, यापैकी प्राथमिक आरोग्य केंद्रात 24 तास आपात्कलीन स्त्रीरोग उपचार सेवा उपलब्ध असतात आणि FRU मधे रक्त देण्याची आणि शस्त्रक्रियेच्या सुविधा उपलब्ध आहेत.

वाहतुकीच्या सोयींची निश्चिती करणे

आरोग्यसेवा केंद्रात पोहोचण्यात उशीर होणे हा मातामृत्युसाठी कारणीभूत ठरणारा एक महत्वाचा मुद्दा आहे. जर त्या महिलेनं एखाद्या आरोग्य सुविधेत प्रसुती करवण्याचं ठरवलं असेल तर जेव्हा तिला त्या ठिकाणी जाण्याची गरज पडेल तेव्हा उपलब्ध करण्यासाठी एक वाहन निश्चित करावे. एखाद्या महिलेनं घरीच प्रसुति करवण्याचं ठरवलं असेल तरीसुध्दा एक वाहन निश्चितपणे तयार ठेवावं जेणेकरुन गुंतागुंतीची समस्या उद्भवल्यास आणि ताबडतोब तपासणी आणि निगेची गरज पडल्यास तिथं नेता येईल. एखाद्या आपात्कालीन स्थितीत एखादं वाहन कसं मिळवता येईल ते ठरविण्यासाठी पंचायत ग्राम आरोग्य समिती, महिला मंडळं, युवा मंडळं किंवा अन्य अशा मंडळांची मदत घेता येईल. महिलांना वाहून नेण्यासाठी मदत करण्याकरिता सध्या उपलब्ध असलेल्या विविध योजना लक्षात ठेवाव्यात.

रक्तदानासाठी तयारी

प्रसुतिपूर्व आणि पश्चात् रक्तस्त्राव होणे हे मातांच्या मृत्युचं एक महत्वाचं कारण आहे. अशा प्रकरणांमधे रक्त देण्यानं जीव वाचू शकतो. रक्त हे विकत घेता येत नसल्यानं रक्त चढवण्यासाठी ते मिळण्यापूर्वी त्याच्या बदली रक्त देण्यासाठी एक ऐच्छिक दाता मिळवणं गरजेचं आहे. रक्त चढवण्याची गरज भासल्यास असे रक्तदाते (2-3) तयार ठेवावेत.

प्रसुतिपश्चात् निगा

मातामृत्युंपैकी 50 टक्के मृत्यु हे प्रसुतिपश्चात् काळात होत असल्याचे संशोधनात दिसून आलं आहे. परंपरेनं प्रसुतिपश्चात् 42 दिवस (6 आठवडे) हा प्रसुतिपश्चात् कालावधी मानला जातो. योपैकी पहिले 48 तास आणि त्यानंतर पहिला आठवडा, हा माता तसंच तिच्या नवजात बालकाच्या आरोग्य आणि जिवीत्वासाठी सर्वात महत्वाचा काळ समजला जातो कारण सर्वाधिक माता आणि नवजात अर्भकविषयक जीवाला धोकादायक आणि जवळपास धोकादायक गुंतागुंत या काळात होते.

माता तसंच बाळाच्या आरोग्य निगेच्या सर्व पैलूंपैकी जन्मपश्चात् निगा आणि नवजात बालकाची प्रारंभिक निगा हे सर्वात दुर्लक्षित पैलू आहेत. भारतात केवळ सहापैकी एका महिलेला प्रसुतिपश्चात् काळात निगा मिळते. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार घरी प्रसुति करवणा-यापैकी केवळ 16 टक्के महिलांना प्रसुतिनंतर दोन महिन्यांच्या काळात तपासणी करण्यात आली होती. त्यातही घरी प्रसुति करवणा-या महिलांपैकी केवळ २ टक्के महिलांना प्रसुतिच्या दोनच दिवसांच्या आत तर केवळ 5 टक्के महिलांना पहिल्या 7 दिवसांच्या आत प्रसुतिपश्चात् निगा देण्यात आली. या तुटपुंज्या प्रमाणातील महिलांपैकी बहुतांश महिलांना प्रसुतिपश्चात् भेटीच्या वेळी पुरवावयाची संपूर्ण माहिती आणि सेवा पुरवण्यात आल्या नाहीत.

प्रसुतिनंतर एखाद्या महिलेला शारीरिक आणि भावनिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि तिला आधार तसंच समजुतीची आवश्यकता असते. या काळात उद्भवणा-या काही वैद्यकीय व्याधींमधे प्युएरपेरल सेप्सिस किंवा गर्भाशयाचे आणि आसपासच्या उतींचे संक्रमण, मूत्रमार्गात संक्रमण, गर्भाशय खाली उतरणे तसंच प्युएरपेरल मनोविकृती आजार यांचा समावेश आहे. या स्थितींचे निदान आणि उपचार शक्य तितक्या लवकर करणे महत्वाचे आहे. यापैकी काहींमुळे गंभीर / जीवाला घातक गुंतागुंत निर्माण होऊ शकते.

प्रसुतिनंतर सहा महिन्यांच्या काळात, मातेला अनेक शारीरिक आणि भावनिक बदलांचा सामना करावा लागतो.

  • गर्भधारणा आणि कळांच्या तणावानंतर तिला दुःखी किंवा रडण्यासारखं वाटू शकतं.
  • तिचे अंतर्गत अवयव, विशेषतः गर्भाशय, पूर्व आकारात येते.
  • गर्भाशयातून येणारं रक्त आणि अन्य द्राव यांचा कालांतराने लाल ते फिकट गुलाबी होतो आणि प्रसुतिनंतर चार आठवड्यांनी पूर्णतः थांबतो.
  • माता स्तनपान करवत नसेल तर 4-6 आठवड्यांनी, किंवा स्नपान करवत असेल तर अनेक महिन्यांनी मासिक पाळी पुन्हा चालू होते.

संभाव्य गुंतागुंत

प्रसुतिनंतरच्या काळात तीन गंभीर प्रकारची गुंतागुंत होऊ शकतेः विषबाधा (प्रसुतिनंतर पहिल्या दोन दिवसांत किंवा 48 तासांनी), संक्रमण आणि रक्तस्त्राव (अति रक्तस्त्राव). बराचवेळ कळा देण्यानं किंवा पडदा लवकर फाटण्यामुळं ब-याचदा संक्रमण होतं. प्रसुतिदरम्यान स्वच्छता नीट न पाळल्यानं देखील ते होऊ शकतं (उदाहरणार्थ, प्रसुति सहाय्यकाचे हात किंवा उपकरणं स्वच्छ नसतील तर), किंवा सीझेरियन शस्त्रक्रियेनंतर ते होऊ शकतं. तीव्र स्वरुपाच्या संक्रमणाच्या चिन्हांमधे, ताप, खालच्या ओटीपोटात वेदना, घाण वासासह योनीतून स्त्राव आणि उलट्या किंवा अतिसार यांचा समावेश आहे. ही चिन्हे गंभीर स्वरुपाची असून ती दिसताच संबंधित महिलेने तत्काळ एखादे चिकित्सालय किंवा रुग्णालयात जावे.

रकत्स्त्राव हा प्रसुतिनंतर दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळपर्यंत होऊ शकतो. प्रसुतिनंतर नाळ पूर्णतः बाहेर न आल्यास, रकत्स्त्राव चालूच राहून तो अतिप्रमाणात होऊ शकतो. लोकिया हा योनीतून होणारा स्त्राव असून तो प्युरपेरिअम दरम्यान होतो. सुरुवातीला ते शुध्द रक्त असते, नंतर ते फिकट बनते, त्याचे प्रमाण कमी होते आणि अंततः ते थांबते. प्रसुतिनंतर अशक्तपणा आणि भगंदरचा त्रास निर्माण होऊ शकतो. भगंदर म्हणजे योनी आणि मूत्राशयाचा मार्ग किंवा गुदव्दार यांच्यादरम्यान भोकं निर्माण होतात.

गंभीर गुंतागुंत

प्रसुतिपश्चात् धोक्याची चिन्हेः

एखाद्या महिलेनं बाळाला जन्म दिल्यानंतर तिला पुढीलपैकी कोणतीही धोक्याची चिन्हे दिसून येत असल्यास, तिने तत्काळ निगा घ्यावीः

  • शुध्द हरपणे, फिट्स किंवा धाप लागणे
  • कमी होण्याऐवजी वाढणारा रक्तस्त्राव किंवा त्यात अनेक मोठ्या गुठळ्या किंवा उतींचे तुकडे असणे.
  • ताप
  • ओटीपोटात तीव्र वेदना किंवा वाढत जाणारी वेदना
  • उलट्या आणि अतिसार
  • घाण वासासह योनीतून रकत्स्त्राव किंवा द्राव
  • छातीत तीव्र वेदना किंवा श्वास लागणे
  • पाय किंवा स्तनांमधे वेदना, सूज, आणि / किंवा लालसरपणा
  • एखाद्या छेदाच्या ठिकाणी (जर त्या महिलेची एपिसिओटॉमी किंवा सीझेरिअन शस्त्रक्रिया केली असल्यास) वेदना, सूज, लालसरपणा आणि / किंवा स्त्राव
  • योनीतून लघवी किंवा मल (पोटाच्या हालचालीमुळं मल येणे) गळून बाहेर येणे
  • लघवी करताना वेदना होणे
  • हिरड्या, डोळ्यांच्या पापण्या, जीभ, किंवा तळवे फिकट पडणे.

प्रसुतिपश्चात् चिकित्सालयाची भेट
सामान्यतः एखाद्या नूतन मातेनं तिच्या पहिल्या प्रसुतिपश्चात् भेटीसाठी एखाद्या आरोग्य सुविधा केंद्रात जावे, किंवा प्रसुतिच्या पश्चात् 7-10 दिवसांच्या आत तिला एखाद्या आरोग्य कार्यकर्त्यानं घरी जाऊन भेट द्यावी. तिनं घरी प्रसुति करवली असेल तर हे विशेषत्वानं आवश्यक आहे. संबंधित महिला आणि तिचं बाळ हे प्रसुतिच्या वेदना आणि त्रासातून बरे होत आहेत याची खात्री करण्यासाठी ही पहिली भेट महत्वपूर्ण आहे. सर्वकाही ठीक असेल तर, पुढची भेट बाळाच्या जन्मानंतर सहा आठवड्यांनी करण्यात यावी. माता तसंच बाळाची तपशीलवार शारीरिक तपासणी करण्यात यावी आणि बाळाला लसीकरण करण्यात यावं. त्याशिवाय, त्या मातेला स्तनपान, समागम, कौटुंबिक बाबी इत्यादींविषयी काही प्रश्न असल्यास त्यांची उत्तरे देण्याकरिता ही एक उत्तम संधी आहे.

आहार आणि विश्रांती

बाळाच्या जन्मानंतर मातांना पुन्हा शक्ती मिळवण्यासाठी आणि प्रसव वेदना तसंच प्रसुतिमधून बरं होण्यासाठी चांगला आहार घेण्याची गरज असते. प्रसुतिदरम्यान त्यांचे रक्त वाया गेलेलं असल्यानं त्यांनी अशक्तता टाळण्यासाठी लोहाच्या गोळ्या घेणे चालूच ठेवावे. एखादी महिला स्तनपान करवत असेल तर तिच्या आहारात अतिरीक्त अन्न आणि पेयांचा समावेश असला पाहिजे. स्तनपान करवण्यामुळं शरीरातील पोषणाच्या साठ्यावरील मागणी वाढते त्यामुळं स्तनदा मातांना त्या गर्भवती असताना लागायचा त्यापेक्षा अधिक आहार त्यांना घ्यावा लागतो. उष्मांक, प्रथिनं, लोह, जीवनसत्वं आणि अन्य पोषक घटकांनी समृध्द आहार घ्यावा. उदाहरणार्थ, कडधान्यं, दूध आणि दुधाचे पदार्थ, हिरव्या पालेभाज्या आणि अन्य भाज्या, फळे, मांस, अंडे आणि मासे. प्रसुतिपश्चात् लगेच आणि स्तनपान करवण्याच्या दरम्यान अन्नाबाबतचे निर्बंध सामान्यतः दृढ असतात आणि गर्भधारणेच्या वेळेपेक्षा संख्येनं अधिक असतात. असे निर्बंध टाळावेत. त्यानी भरपूर प्रमाणात पेयंपदार्थ घेण्याची देखील खात्री करावी. संबंधित महिलेला तिची शक्ती परत मिळवण्यासाठी प्रसुतिपश्चात् कामात पुरेशी विश्रांती मिळण्याची देखील गरज आहे. तिनं स्वतःची काळजी घेण्याव्यतिरीक्त अन्य कोणतेही अवजड काम करण्याची तिला परवानगी देऊ नये असा सल्ला तिचे पती आणि अन्य कुटुंबियांना देण्यात यावा.

स्वच्छता

संबंधित महिलेला तिच्या योनीमार्गात काहीही न ठेवण्यास आणि दररोज गुदव्दाराचा भाग मलविसर्जनानंतर स्वच्छ करण्याबद्दल सल्ला द्या आणि समजावून सांगा. योनीमार्गातून मोठ्या प्रमाणात स्त्राव असेल तर अधिक वारंवारपणे किंवा दर 4-6 तासांनी तिथले पॅडस् बदलावेत. कापडाच्या घड्या वापरल्या असतील तर त्या भरपूर साबण आणि पाण्याने धुऊन उन्हामधे वाळवाव्यात. तिला नियमितपणे अंघोळ करण्यास आणि बाळाला घेण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुण्याचा सल्ला देण्यात यावा.

स्त्रोत : पोर्टल कंटेंट टिम

अंतिम सुधारित : 8/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate