थ्यूसिडिडीझ
थ्यूसिडिडीझ : (सु.४७१ ?–३९९ इ. स. पू.). प्राचीन ग्रीस मधील एक प्रसिद्ध इतिहासकार व शास्त्रशुद्ध इतिहासलेखनपद्धतीचा जनक. त्याच्या जन्ममृत्युच्या काळाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि आधुनिक इतिहासकार त्याचा जन्म इ. स. पू. ४६० ते ४५० च्या दरम्यान मानतात.