सांकाश्य
संकिश-वसंतपुर. उत्तर प्रदेश राज्यातील एक प्राचीन बौद्घ तीर्थक्षेत्र. ते कनौजच्या वायव्येस सु. ७३ किमी. व फतेगढच्या पश्चिमेस ३७ किमी.वर फरूखाबाद जिल्ह्यात, काळी (इक्षुमती) नदीकाठी वसले आहे. संकिशा (सा), कपिथा, सकसपुर इ. भिन्न नावांनीही त्याचा पाली बौद्घ ग्रंथांत उल्लेख आढळतो.