कॅरिबियन समुद्र
कॅरिबियन समुद्र : अटलांटिक महासागराचा दक्षिण व मध्य अमेरिकेजवळील फाटा. क्षेत्रफळ सु. २७,१९,००० चौ. किमी. याच्या पश्चिमेस मेक्सिकोचे यूकातान द्वीपकल्प, ब्रिटिश हॉंडुरस, ग्वातेमाला, हॉंडुरस व निकाराग्वा; दक्षिणेस कोस्टा रीका, पनामा, कोलंबिया व व्हेनेझुएला; पूर्वेस त्रिनिदाद व टोबॅगो, बाबेर्र्डोस, ग्वादेलूप इ. वेस्ट इंडीजपैकी लेसर ऍंटिलीस बेटे आणि उत्तरेस प्वेर्त रीको, डोमीनिकन गणराज्य, हैती, जमेका, क्यूबा इ. ग्रेटर ऍंटिलीस बेटे आहेत