व्हँकूव्हर बेट
व्हँकूव्हर बेट : कॅनडामधील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील एक बेट. उत्तर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील हे सर्वांत मोठे बेट असून, ते कॅनडाच्या पॅसिफिक किनाऱ्यावर, ब्रिटिश कोलंबियाच्या नैर्ऋत्येस आहे. क्षेत्रफळ ३१,२८५ चौ. किमी., लोकसंख्या ५,१०,३३३ (१९८६). कॅनडाच्या मुख्य भूमीजवळ वायव्य-आग्नेय दिशेत पसरलेल्या या बेटाची रुंदी ५० ते १३० किमी. व लांबी ४६० किमी. आहे.