घाणेरी
घाणेरी : (टणटणी; गु. घाणी दालिया, इंद्रधनु; क. हेसिके; इं. लँटाना; लॅ. लँटाना कॅमरा; कुल-व्हर्बिनेसी). ह्या काटेरी क्षुपाचे (झुडपाचे) मूलस्थान अमेरिकेतील उष्ण प्रदेश असून त्याचा श्रीलंकेत १८२४ साली प्रवेश झाला. भारतात ते प्रथम शोभेकरिता आणले गेले पण आता प. महाराष्ट्र, कर्नाटक इ. राज्यांत कोठेही व उप्ण कटिबंधात सामान्यपणे आढळते.