घेवडा, चौधारी
घेवडा, चौधारी : ( हिं. चार कोनी सेम; इं. विंग्ड-गोवामॅनिला-प्रिन्सेस-बीन; लॅ.सोफोकार्पस टेट्रॅगोनोलोबस; कुल-लेग्युमिनोजी). भाजीकरिता सर्वत्र सामान्यपणे पिकविली जाणारी ही वेल मूलतः मॉरिशस बेटातून आणली गेली आहे. हिची सामान्य शारीरिक लक्षणे⇨गोकर्ण, ⇨ अगस्ता, ⇨घेवडा इत्यादींच्या कुल आणि उपकुल (लेग्युमिनोजी-पॅपिलिऑनेटी) वर्णनात दिल्याप्रमाणे असतात.