तंजावर संस्थान
तंजावर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मद्रास इलाख्यातील पूर्वीचे एक संस्थान. सध्या हा प्रदेश तमिळनाडू राज्यात समाविष्ट झाला आहे. क्षेत्रफळ १२,२७२ चौ. किमी. व लोकसंख्या २५,६३,३७५ (१९४१). पूर्वेस बंगालचा उपसागर, उत्तरेस कावेरीची उपनदी, पश्चिमेस तिरुचिरापल्ली व पुदुकोट्टई, दक्षिणेस रामनाड यांनी सीमित झाले होते.