वामके
जठरात गेलेल्या विषारी पदार्थांचे रक्तात शोषण होण्यापूर्वीच उलटी करून ते बाहेर काढण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांना वामके म्हणतात. आधुनिक वैद्यकात विषबाधेशिवाय इतर कोठेही वमनाचा उपचार म्हणून उपयोग करीत नाहीत. आयुर्वेदामध्ये मात्र दोष शोधना-साठी केल्या जाणाऱ्या पंचकर्मांपैकी वमन ही एक क्रिया आहे. [⟶ ओकारी].