रणजितसिंग
रणजितसिंग : (१३ नोव्हेंबर १७८० – २७ जून १८३९). पंजाबातील शीख सत्तेचा संस्थापक. त्याचा जन्म अजोळी म्हणजे जीदनजीकच्या बुद्रुखान या खेड्यात झाला; तथापि गुजराणवाला हेही त्याचे जन्मगाव असल्याचे एक मत आहे. त्याचे वडील महासिंग (महासिंह) आणि आईचे नाव बिबी राजकौर.