मलेशिया
मलेशिया : आग्नेय आशियातील एक सार्वभौम देश. क्षेत्रफळ ३,३३,५५६ चौ.किमी. आणि लोकसंख्या १,४७,४०,००० (१९८३ मध्य अंदाज). १६ सप्टेंबर १९६३ रोजी स्वतंत्र झालेल्या या देशात प्रारंभी मलाया, सिंगापूर व सारावाक, साबा (बोर्निओ बेटाचा उत्तर भाग) यांचा समावेश होता.