मंडला
मंडला : मध्य प्रदेश राज्यातील याच नावाच्या जिल्ह्याचे व तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या ३७,५३८ (१९८१). हे रस्त्याने जबलपूरच्या आग्नेयीस सु. १०० किमी. आणि नैनपूर प्रस्थानकापासून ईशान्येस ३६ किमी. नर्मदा नदीच्या उजव्या काठावर वसले आहे. याचे प्राचीन नाव ’माहिष्मती’ आहे.